नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  नवापूर तालुक्यातील भादवड रेल्वे स्टेशन जवळ अनोळखी पुरुष मृतदेह आढळून आला असून  त्याबाबत माहिती असल्यास पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन सहाय्यक पोलीस निरिक्षक  विसरवाडी पोलीस स्टेशन यांनी केले आहे.

मृतदेहाची उंची 5 फुट 5 इंच, वय अंदाजे  30 ते 35 वर्षे असुन सडपातळ बांधा, गोल चेहरा,निमगोरा रंग, अंगात हिरव्या काळ्या पांढऱ्या रंगाचा कॉटनचा फूल बाहीचा शर्ट, काळ्या रंगाचा व आकाशी रंगाची बरमुडा पॅन्ट, बारीक केस, छातीच्या उजव्याबाजुस ममता नाव गोंधलेले आहे.