ग्रामीण भागात लसीकरणासाठी स्कूल बसचा उपयोग

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ग्रामीण भागातील नागरिकांना लसीकरण केंद्रापर्यंत आणून  लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी स्कूल बसचा उपयोग करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत झाला.             जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, डॉ.राहुल चौधरी आदी उपस्थित होते.             अहिंसा पब्लिक स्कूल ने एक, पी.जी.पब्लिक स्कूल नंदुरबार 2, के.आर.पब्लिक स्कूल नंदुरबार 2, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल नंदुरबार 2, नेमसुशिल  इंग्लिश स्कूल नंदुरबार 2, चावरा इंग्लिश स्कूल नंदुरबार 2 आणि खापर येथील ईरा इंटरनॅशनल स्कूलने 2 बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत.             जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा व्यवस्थापनाला सहकार्याबद्दल धन्यवाद दिले. नियोजनपूर्वक वाहनांचा उपयोग...

Read More

नवापूर तालुक्यातील लसीकरण कार्यक्रमाला गती द्या – जिल्हाधिकारी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नवापूर तालुक्यातील लसीकरण कार्यक्रमाला गती देण्यात यावी. फिरत्या पथकामार्फत गावपातळीवर ग्रामपंचायतीच्या सहकार्याने लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. नवापूर येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके,  तहसिलदार मंदार कुलकर्णी, मुख्याधिकारी महेश चौधरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश मावची आदी उपस्थित होते.  डॉ.भारुड म्हणाले, जनतेतील गैरसमज दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. शिक्षकांनी गावात जाऊन पात्र व्यक्तींची नोंदणी करावी आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने गावात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात यावे. गावात कोरोनाबाधित आढळल्यास त्यास त्वरीत संस्थात्मक अलगीकरणात...

Read More

‘मी लस घेतली तुम्हीदेखील घ्या’ उपविभागीय अधिकारी शाहूराज मोरे यांचे नागरिकांना आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : उपविभागीय अधिकारी शाहूराज मोरे यांनी तळोदा तालुक्यातील राजविहीर येथे कोरोना लसीची पहिला मात्रा घेऊन नागरिकांना लसीकरणासाठी आवाहन केले. राजविहीर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत लसीकरणाचे प्रमाण कमी असल्याने श्री.मोरे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून लस घेण्याचा निर्णय घेतला. त्यांचे वाहनचालक सुनिल पाटील यांनीदेखील त्याचठिकाणी नोंदणी करून लस घेतली. कोरोना लस पुर्णपणे सुरक्षित असून कोरोनामुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता 18 वर्षावरील सर्वांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन यावेळी श्री.मोरे यांनी केले. त्यांनी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत सर्वेक्षणाची माहितीदेखील घेतली. गावातील लोकप्रतिनिधी ग्रामस्थांना लसीकरणसाठी प्रोत्साहीत करीत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त...

Read More

जिल्ह्यात सीवायडीए तर्फे लसीकरणाबाबत जनजागृती

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सीवायडीए, फिनीश सोसायटी, नॅशनल स्टॉक एक्स्जेंज, जिल्हा परीषद नंदुरबार, राष्ट्रीय सेवा योजना आणि शहादा वरिष्ठ विज्ञान महाविद्यालयातर्फे जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या जनजागृती रथाला  जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी हिरवी झेंडी दाखवून उपक्रमाचा शुभारंभ केला.  जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, जिल्हा शल्य चिकीत्सक रघुनाथ भोये, प्राचार्य शांताराम बडगुजर, प्रा.माधव कदम, सीवायडीएचे मनोज शेवाळे, वसीम शेख  आदी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी या उपप्रमाचे कौतुक केले. दुर्गम भागात लसीकरणाबाबत जनजागृतीची आवश्यकता असून युवकांच्या माध्यमातून नागरिकांमधील गैरसमज दूर करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. त्यादृष्टीने चित्ररथ व बलूनद्वारे चांगली जनजागृती होईल असेही डॉ.भारुड यांनी...

Read More

विमला सुखिदेवी चंपालालजी तातेड ओसवाल परिवारतर्फे एक रुग्णवाहिका भेट

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : विमला सुखिदेवी चंपालालजी तातेड ओसवाल परिवारतर्फे जिल्ह्यासाठी एक रुग्णवाहिका भेट देण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत सुखिदेवी तातेड यांनी रुग्णवाहिका जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये यांच्याकडे सुपूर्द केली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, बीजेएसचे गौतम जैन तातेड, अशोक तातेड, सुरेश तातेड आदी उपस्थित होते. तातेड ओसवाल परिवाराने यापूर्वीदेखील जिल्ह्यासाठी 100 ऑक्सिजन कॉन्स्टन्ट्रेटर भेट दिले...

Read More

मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करावी-डॉ.राजेंद्र भारुड

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : शासकीय यंत्रणांनी मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करावी आणि आरोग्य विभागाने कोरोना परिस्थिती लक्षात घेता आवश्यक दुरूस्तीची कामे त्वरीत करून घ्यावी, असे निर्देश  जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत,  मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वसंत बोरसे आदी उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, मान्सूनपर्वू रस्ता दुरुस्ती, गटार व नालेसफाई, विद्युत दुरुस्तीची कामे वेळेत करावी. कुठलेही नवे काम सुरू करू नये, केवळ दुरूस्तीची कामे करण्यात यावी. पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये.  संबंधित विभागांनी नियंत्रण कक्ष स्थापन करावे आणि त्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावी. आपत्तीच्या वेळी आवश्यक असणारे साहित्य तपासून घ्यावे. धोकादायक ठिकाणांची निश्चिती करून त्याठिकाणी सूचना फलक लावण्यात यावेत. पूरग्रस्त व दरडग्रस्त  गावांसाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. धरणनिहाय संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात यावे. कृषी विभागाने हवामान खात्याकडून येणारा इशारा तात्काळ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा. आरोग्य विभागाने पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या रोगाबाबत पुरेसा औषधसाठा करून ठेवावा. प्रथमोपचार गटाची बांधणी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय करावी. कार्यकारी अभियंता आणि तहसिलदार यांनी संयुक्तपणे लघु व मध्यम प्रकल्पाची पाहणी करून आवश्यकता असल्यास कार्यकारी अभियंता यांनी तात्काळ दुरूस्ती करून घ्यावी.  सार्वजनिक बांधकाम विभागाने भूस्खलनाचे ठिकाणांची निश्चिती करून आवश्यक उपायययोजना कराव्यात. रस्त्याच्या दुतर्फा असलेली धोकादायक झाडे व झाडाच्या फांद्यांबाबत आवश्यक कार्यवाही करावी. रस्त्याच्या बाजूच्या पट्ट्या मुरूम टाकून भराव्यात. नगरपालिकेने शहरातील नालेसफाईबाबत आढावा घ्यावा व कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण द्यावे.पाटबंधारे विभागाने दैनंदिन पाणीसाठा,...

Read More
Loading

सुंदर विचार

▬▬▬▬ 🎧🎵🎧 ▬▬▬▬
🎵 〇 सुंदर विचार – १३६२ 〇 🎵
═════ 🦋;🦋 ═════

चांगले मित्र हे नेहमी
गुरु समान असतात.
मग ते वयाने
लहान असोत वा मोठे !
➖➖➖➖➖➖➖➖➖
Good friends are
always like gurus .
Whether they are
young or old !

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
घरीच रहा,
सुरक्षित रहा !
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी
आवश्यक असेल तरच बाहेर पडा !
➖➖➖➖➖➖➖➖➖
२६ एप्रिल
जागतिक
बौद्धिक मालमत्ता दिन !
१९०८: भारताचे १३ वे
सरन्यायाधीश
सर्व मित्र सिकरी,
(मृत्यू: २४ सप्टेंबर १९९२)
१९४०: मोल्वी, राजकारणी
इफ्तिखार हुसैन अन्सारी,
(मृत्यू: ३० सप्टेंबर २०१४)
१९४८: अभिनेत्री
मौसमी चटर्जी.
यांचा जन्मदिन
१९२०: थोर गणिती
श्रीनिवास रामानुजन,
(जन्म: २२ डिसेंबर १८८७)
१९७६: साहित्यिक
चिंतामणी खानोलकर
ऊर्फ आरती प्रभू,
(जन्म: ८ मार्च १९३०)
१९८७: शंकर-जयकिशन
या जोडीतील संगीतकार
शंकरसिंग रघुवंशी.
(जन्म: ५ ऑक्टोबर १९२२)
यांचा स्मृतिदिन !
▪▪▪▪▪▪▪▪▪
टीप :- माहितीच्या महाजालावर
उपलब्ध माहितीनुसार
🍂🍂☘☘🍂☘☘🍂🍂
देवेंद्र बोरसे, नंदुरबार.
📱 9168232256 📱
📱 9422287633 📱
🍂🍂☘☘🍂☘ ☘🍂🍂
आपला दिवस मंगलमय होवो…!
🛑 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🛑
🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Number of visitors

0079551
Visit Today : 17
error: Content is protected !!