आ.चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुराव्यातून नगरपरिषदेला २ अग्निशमन वाहने

*अग्निशमन आपत्कालीन सेवेचे बळकटीकरणासह सक्षमीकरण* नंदुरबार (प्रतिनिधी)- अग्निशमन आपत्कालीन सेवेच्या बळकटीकरणासाठी अग्निसुरक्षा अभियान योजनेअंतर्गत नंदुरबार नगरपरिषदेला २ अग्निशमन वाहन नगर विकास विभागाकडून मंजूर करण्यात आलेल्या आहेत अशी माहिती शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा विधान परिषद सदस्य आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी एका प्रसिद्धी पत्रकांद्वारे दिली आहे. अग्निशमन सेवेतील तूट भरून काढण्यासाठी व या सेवेचा सक्षमीकरणासाठी विविध उपाय योजना करण्याच्या दृष्टीने अग्निसुरक्षा अभियान राबविण्याचे निर्णय शासनाने यापूर्वीच घेतलेला आहे. नंदुरबार शहराचा विस्तार व लोकसंख्या पाहता अग्निशमन वाहनाची गरज लक्षात घेऊन शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी नगर विकास विभागाकडे वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्या दृष्टिकोनातून त्यांनी पाठपुरावाही केला होता. आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या मागणीची दखल घेत अग्निशमन आपत्कालीन सेवेच्या बळकटीकरणासाठी अग्निसुरक्षा अभियान योजनेअंतर्गत नंदुरबार नगरपरिषदेला ९० लाखाचे १ अशा २ वाहनांना १ कोटी ८० लाखाच्या निधी मंजूर केला आहे. नंदुरबार शहराच्या विस्तार मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे. काही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास वेळेवर उपाययोजना करण्यासाठी नगर विकास विभागाकडे अग्निशमन वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला असता नगरपरिषदेला २ अग्निशमन वाहनांना मंजुरी मिळालेली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानतो. – आमदार चंद्रकांत...

Read More

रक्तदान शिबिराच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम

नंदुरबार (प्रतिनिधी) – महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समाजहिताचे भान जपत भारतीय स्टेट बॅंक एस.सी., एस.टी., बी.सी. कर्मचारी संघटना शाखा नंदुरबार आणि महाराष्ट्र राज्य शिक्षक संघ, जिल्हा शाखा नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने एक प्रेरणादायी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाची संकल्पना भारतीय स्टेट बॅंक कर्मचारी संघटनेचे जनरल सेक्रेटरी श्री. गणेश वाघमारे, प्रेसिडेंट श्री. राकेश कांबळे, असिस्टंट जनरल सेक्रेटरी डॉ. मनोज पिंपळे तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. सतीश पाटील आणि सरचिटणीस श्री. अमोल शिंदे यांची होती. या शिबिरात नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमात विविध क्षेत्रातील प्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. या यशस्वी आयोजनासाठी श्री. उल्हास लांडगे, श्री. प्रवीण देवरे, श्री. आनंदराव करनकाळ, श्री. दीपक सोनवणे, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी श्री. वसंत पाटील, श्री. रावसाहेब पाटील, श्री. संजय बाविस्कर, श्री. बापू साळवे, श्री. नागसेन पेंढारकर, श्री. मनेश बिरारे आणि श्री. हरलाल मोरे यांचे विशेष योगदान लाभले. या शिबिराच्या नियोजनात श्री. देवेंद्र बोरसे यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी संपूर्ण उपक्रमाचे संयोजन, समन्वय व प्रचार या बाबींचे उत्कृष्ट व्यवस्थापन करत शिबिर यशस्वी होण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. कार्यक्रमात अनेकांनी स्वखुशीने रक्तदान केले. सामाजिक एकोपा, जबाबदारी आणि बांधिलकीचे दर्शन या उपक्रमाच्या माध्यमातून घडले. महामानवांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजासाठी काही तरी चांगले करावे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या रक्तदान शिबिराने बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक समतेच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून उजाळा दिला असून, हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरणार आहे. आयोजकांच्या सहकार्यामुळे आणि रक्तदात्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हे शिबिर अत्यंत...

Read More
Loading

[ditty_news_ticker id="624"]

Loading
Loading

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!