Author: Ramchandra Bari

अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या अनुदान येाजना आणि बीजभांडवल योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन  जिल्हा व्यवस्थापक ताराचंद कसबे यांनी केले आहे. चालू आर्थिक वर्षासाठी नंदुरबार जिल्ह्याकरीता 100 लाभार्थीचे अनुदान योजनेचे उद्दिष्ट व 2 लाभार्थींना बीजभांडवल योजनेअंतर्गत कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. या महामंडळामार्फत मातंग समाजात अंतर्भाव असणाऱ्या मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गारोडी, मादगी, मादिगा या 12 पोटजातीतील व्यक्तींना अर्थसहाय्य करण्यात येते. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार जिल्ह्याचा रहिवासी असावा, अर्जदाराचे वय 18 ते 50 वर्षापेक्षा जास्त नसावे. अर्जदार हा मातंग समाजातील 12 पोट जातीतील असावा. अर्जदाराने जो व्यवसाय निवडला असेल त्या व्यवसायाचे ज्ञान व अनुभव असावे. केंद्रिय महामंडळाच्या सर्व योजनांसाठी ग्रामीण, शहरी भागातील अर्जदाराचे वार्षीक उत्पन्न रु. 3 लाखापेक्षा कमी असावे. राज्य शासनाच्या सर्व योजनांसाठी ग्रामीण, शहरी भागातील अर्जदाराचे वार्षिंक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असावे. अर्जदाराने महामंडळाकडून यापुर्वी व इतर कोणत्याही शासकीय उपक्रमाकडून लाभ घेतलेला नसावा. कुटूंबातील पती वा पत्नी या दोघांपैकी एकालाच महामंडळाच्या योजनेचा लाभ घेता येईल. महामंडळाने वेळोवेळी घालून दिलेल्या अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहातील, अर्जाचा नमुना कार्यालयात मोफत उपलब्ध असून अर्जासोबत  जातीचा दाखला, अर्जदाराच्या कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट साईज दोन फोटो, अर्जदाराचा शैक्षणिक दाखला, रेशनकार्ड, आधारकार्ड, भ्रमणध्वनी क्रमांक, ज्या ठिकाणी व्यवसाय करावयाचा असेल त्या जागेचा पुरावा, जागेची भाडे पावती, करारपत्र किंवा मालकी हक्काचा पुरावा, वाहन व्यवसायकरीता ड्रायव्हींग लायसन्स व आर.टी.ओ. कडील प्रवाशी वाहतुक परवाना, वाहन व्यवसायाबाबत वाहनाच्या बुकींगबद्दल, किंमतीबाबत अधिकृत विक्रेता  कंपनीकडील...

Read More

मास्कच्या किंमत निश्चितीचा शासन निर्णय जाहीर

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी महत्वाचा घटक असलेल्या मास्कची किंमत निश्चित करून  योग्य त्या किमतीत नागरिकांना मास्क मिळावा यासाठी राज्य शासनाने शासन निर्णय जाहीर करून मास्कचे दर निश्चित केले आहेत. आता एन 95 मास्क  19 ते 49 रुपयांपर्यंत तर दुपदरी आणि तिनपदरी मास्क 3 ते 4 रुपयांना मिळणार आहे. विविध दर्जाच्या मास्कची विहित केलेली अधिकतम विक्री मुल्य मर्यादा ही साथरोग कायदा अंमलात असेपर्यंत लागू राहणार आहे. ही अधिकतम विक्री मुल्य मर्यादा राज्यातील सर्व मास्क उत्पादक कंपन्या, वितरक, किरकोळ विक्रेते यांना लागू राहील. राज्यातील सर्व मास्क उत्पादक कंपन्या, वितरक, किरकोळ विक्रेते यांनी मास्कचा दर्जा व त्याची निर्धारित कमाल विक्री किंमत दर्शनी भागावर लावणे आवश्यक राहील. एनआयओएसएच सर्टीफाईड एन-95 व्हीशेप मास्क 19 रुपये, एन-95 थ्रीडी मास्क 25 रुपये, एन-95 व्ही विदाऊट वॉल्व्ह 28 रुपये, मॅग्नम एन-95 एमएच कप मास्क 49 रुपये, व्हीनस सीएन एन-95 प्लस कप शेप मास्क विदाऊट वॉल्व्ह 29 रुपये, व्हीनस-713 डब्ल्यु-एन95-6 डब्ल्युई कप स्टाईल विदाऊट वॉल्व्ह 37 रुपये, व्हीनस-723 डब्ल्यु-एन95-6 आरई कप स्टाईल विदाऊट वॉल्व्ह 29 रुपये, एफएफपी 2 मास्क आयएसआय सर्टीफाईड 12 रुपये, 2 प्लाय सर्जिकल विथ  लूप 3 रुपये, 3 प्लाय सर्जिकल विथ मेल्ट ब्लोन 4 रुपये, डॉक्टर्स कीट 5 एन-95 मास्क 3 प्लाय मेल्ट ब्लोन मास्क 127 रुपये अशा किंमती निश्चित करण्यात आल्या आहेत. सॅनिटायझर व मास्कचे दर निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने उत्पादकाची किंमत,  त्यावरील किंमत तसेच प्रत्येकी विक्रेता व वितरकाचा नफा गृहीत धरून दर्जानुसार मास्कचे अधिकतम...

Read More

पंतप्रधान शिष्यवृत्ती (पीएमएसएस) करीता अर्ज करावे

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :   केंद्रीय सैनिक बोर्ड यांच्यामार्फत माजी सैनिक, विधवा यांच्या व्यावसायीक शिक्षण घेत असलेल्या पाल्यांनी सन 2020-2021 साठी पंतप्रधान शिष्यवृत्ती (पीएमएसएस ) करीता अर्ज करावे असे आवाहन असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  संजय गायकवाड यांनी केले आहे. पंतप्रधान शिष्यवृत्ती (पीएमएसएस ) योजनेअंतर्गत सन 2020-2021 साठी मुलींना 36 हजार तर मुलांना 30 हजार रुपयांची आर्थिक शिष्यवृत्ती दरवर्षी शिक्षण पूर्ण होईपर्यंत देण्यात येते. शिष्यवृत्तीकरीता इयत्ता 12 वी किंवा डिप्लोमामध्ये 60 टक्क्यांच्या वर गुण असणे आवश्यक आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील पात्र पाल्यांनी 31 डिसेंबर 2020 पर्यंत www.ksb.gov.in ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरुन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, माजी सैनिक विश्रामगृह आवार, संतोषी माता चौक जवळ,धुळे येथे सादर...

Read More

मनरेगाच्या माध्यमातून 21 लाख मनुष्य दिवस दिवस निर्मिती

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :   नंदुरबार जिल्ह्यात लॉकडाऊन परिस्थितीत जिल्हा प्रशासनाने  महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामांना सर्वोच्च प्राधान्य दिल्याने मागील सहा महिन्यात 21 लाख 30 हजार मनुष्य दिवस निर्माण झाले आहत. गेल्या संपूर्ण वर्षाच्या तुलनेत गेल्या तीन महिन्यातच 44 टक्के खर्च झाला असून 41 टक्के मनुष्य दिवस निर्मिती झाली आहे. आहे मनरेगा अंतर्गत अधिकाधिक मजूरांना काम देण्यासाठी  प्रशासनाने गाव पातळीवर सूक्ष्म नियोजन केले. यंत्रणानिहाय कामांचे नियोजन करून या मोहिमेला गती प्रदान करण्यात आली. यामुळे संकटाच्या परिस्थितीत एकाच दिवशी 64 हजारपेक्षा अधिक मजूरांना रोजगार मिळाला. मनरेगा अंतर्गत गेल्या आर्थिक वर्षात एकूण 66 कोटी 95 लाख खर्च झाला होता आणि एकूण 25 लाख 32 हजार मनुष्य दिवस  निर्माण झाले होते. चालू आर्थिक वर्षात पहिल्या 6 महिन्यातच 58 कोटी 35 लाख एवढा निधी खर्च करण्यात आला असून 21 लाख 30 हजार मनुष्य दिवस निर्माण झाले आहेत. मे महिन्यात  एकाचवेळी 47 हजार 488 कुटुंबातील व्यक्तींना रोजगार प्राप्त झाला होता. गेल्यावर्षीच्या मनुष्य दिवसाच्या तुलनेत या वर्षात 84 टक्के मनुष्य दिवस निर्मिती ही केवळ मागील सहा महिन्यात साध्य करण्यात आली आहे. तर मागील वर्षीच्या तुलनेत 87 टक्के खर्च केवळ मागील तीन महिन्यातच्या कालावधीत करण्यात आला आहे.  मनरेगाच्या कामात ग्रामपंचायत, वने, सामाजिक वनीकरण, कृषी आदी विविध विभागांनी कामे हाती घेतली आहेत. उन्हाळ्यात गाळ काढण्याची कामे मोठ्या प्रमाणात घेण्यात आली. त्यावर 5 कोटी खर्च करण्यात आला. या कामांमुळे जलस्त्रोतातील पाणीसाठा वाढला असून  त्याचा लाभ परिसरातील नागरिकांना होणार आहे. पावसाळ्यात वृक्षारोपण, नर्सरी, फळझाडे लागवड आदी कामांना...

Read More

शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पाणी अर्ज सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कार्यकारी अभियंता धुळे पाटबंधारे विभाग यांच्या अधिपत्याखालील धुळे जिल्ह्यातील पांझरा, मालनगांव, जामखेडी, बुराई, कनोली, सोनवद, अक्कलपाडा, वाडीशेवाडी, अनेर, करवंद, अमरावती मध्यम प्रकल्प असे एकूण 11 मध्यम प्रकल्प, 45 लघु प्रकल्प, 22 कोल्हापुरी बंधारे, 30 वळण बंधारे व नंदूरबार जिल्ह्यातील रंगावली, प्रकाशा, सारंगखेडा असे 3 मध्यम प्रकल्प, 33 लघु प्रकल्प, 6 कोल्हापुरी बंधारे,  20 वळण बंधारे अधिसूचित नदी-नाले तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजनांच्या पाण्याचा फायदा घेणाऱ्या बागायतदारांनी सुरु झालेल्या रब्बी हंगामासाठी 31 डिसेंबर 2020  पर्यंत पाणी अर्ज सादर करायचे आहेत.           सर्व बागायतदारांनी आपले नमुना नं. 7, 7 (अ), 7 (ब) चे पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात सादर करावेत. बागायतदारांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजूरी देण्यात येईल. बागायतदांरानी आपआपल्या शेतचाऱ्या स्वच्छ व सुस्थितीत ठेवाव्यात.  मंजूरी व पाणी पुरवठ्याबाबत अन्नधान्ये, भुसार, चारा पिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. पाण्याचा रितसर पास मिळाल्याशिवाय पाणी घेऊ नये. थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी व व्याज भरणे आवश्यक आहे. पाणी नाश, पाळ्या नसताना पाणी घेणे, मंजुरीपेक्षा अधिक क्षेत्र भिजविणे, विहीरीवरील पिकास कालव्याचे पाणी घेणे, पाटमोट संबंध दूर न करणे आदी प्रकाराबाबत नियमानुसार पंचनामे करून दंडाच्या दराने आकारणी करण्यात येईल. टंचाई परिस्थितीत ऐन हंगामात पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा लागल्यास पीक नुकसान भरपाई देता येणार नाही. लाभक्षेत्रातील तसेच कालव्यापासून 35 मीटर अंतराच्या हद्दीतील विहिरींबाबत नमुना 7 (ब) मागणी अर्ज न करता बिनअर्ज  क्षेत्र भिजविण्यात आल्यास प्रचलित नियमानुसार पंचनामे करण्यात येतील. हस्तांतर झालेल्या पाणी वापर संस्थांना घनमापन पद्धतीने पाणी देण्यात येईल. पिण्याच्या पाण्यासाठी...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!