Author: Ramchandra Bari

स्थलांतर रोखण्यासाठी रोजगार निर्मितीचे प्रयत्न करा- ॲड.के.सी.पाडवी

नंदुरबार(जिमाका वृत्तसेवा) :  जिल्ह्यातील स्थलांतर रोखण्यासाठी स्थानिक स्तरावर रोजगार निर्मिती करण्याचे प्रयत्न विविध यंत्रणांनी करावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले.             जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ आदी उपस्थित होते.             ॲड.पाडवी म्हणाले, ग्रामीण भागात पाझर तलावाची कामे मोठ्या प्रमाणात घेण्यात यावी. यामुळे पाणीसाठा वाढण्यास मदत होईल आणि नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल. वन विभागाने वनाच्छादन वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे. जंगलातील उत्पादनाच्या माध्यमातूनदेखील दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांना रोजगार...

Read More

बाळाचे आरोग्य…बाळाचे पोषण…

नंदुरबार(जिमाका वृत्तसेवा) : बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी जन्मानंतर एक तासाच्या आत स्तनपान करू देणे आवश्यक आहे. आईचे पहिले पिवळे घट्ट दूध बाळासाठी पहिली लस असते. जन्मानंतर तात्काळ आईच्या घट्ट दुधात असणाऱ्या घटकांद्वारे बाळाला जीवनदायी संरक्षण मिळते. स्तनपान करु दिल्यामुळे आईच्या शरीरात दूध बनण्याच्या प्रक्रियेत वेग येतो आणि त्यामुळे आईसोबत बाळाचं नातं मजबूत होत. स्तनपान हे बाळातपणानंतर होणारा रक्तस्त्राव कमी करत. जन्मानंतर एका तासाच्या आत फक्त आईचे दूध पाजावे. सहा महिन्यांपर्यंत पाणी, मध, घुट्टी गाय किंवा बकरीचे दूध, पावडरचे दूध, सेरेलॅक किंवा नेस्टम इत्यादी बाहेरच्या गोष्टी देणे बाळासाठी हानीकारक होऊ शकते. बाळाचा जन्म  ऑपरेशनने झाला असला तरीही जन्मानंतर एका तासाच्या आत बाळाला दूध पाजू शकता. जर बाळ स्तनपान करत नसेल तर त्याला त्वरीत आरोग्य केंद्रात घेऊन जावे. सहा महिन्यांनतर बाळाला रोज दोन ते तीन वाट्या वरचा (बाकीचा) आहार द्यावा. त्यात घट्ट वरणासोबत भात, खिचडी, हिरव्या पालेभाज्या, पिवळी/नारंगी फळं आणि भाज्या,  दुधापासून बनवलेले खाद्यपदार्थ आणि तेल-तूप अशा पदार्थांचा समावेश असावा. बाळाचं आरोग्य आणि प्रगतीसाठी, घट्ट वरणासोबत भात, खिचडी, हिरव्या पालेभाज्या, पिवळी/नारंगी फळं आणि भाज्या, दुधापासून बनवलेले खाद्यपदार्थ बाळाला खायला देणं आवश्यक आहे. सहा महिने पूर्ण झाल्यानंतर फक्त स्तनपान बाळाच्या पोषणासाठी पुरेस ठरत नाही.  या कालावधीत योग्य प्रमाणात वरचा (बाकीचा ) आहार न मिळाल्यास बाळाच्या प्रगतीवर वाईट परिणाम होतो आणि ते आजारी आणि कुपोषित होऊ शकतं. वाढत्या बाळाला घरात उपलब्ध असलेले सगळ्या प्रकारचे पदार्थ खायला द्या, ज्यामुळे त्याला लागणाऱ्या पोषक घटकांची आवश्यकता पूर्ण होऊ शकेल. मांसाहारी कुटुंबात खाल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थामध्येही असे पोषक घटक...

Read More

कोविड-19 नियंत्रणासाठी संचारबंदी कालावधीत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढ

नंदुरबार(जिमाका वृत्तसेवा) : कोविड-19 आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी अनलॉक प्रक्रियेतील सुधारीत सूचना,  वेळोवेळी शिथिल करण्यात आलेले निर्बंध, सुट किंवा मुभा देण्यात आलेल्या बाबींसंदर्भातील आदेश कायम ठेवून  फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 च्या कलम 144 नुसार जिल्ह्यात 30 नोव्हेंबर 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदीस मुदतवाढ देण्याचे आदेशित केले आहे. सदर आदेशाचे सर्व नागरिकांनी पालन करावे. आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती किंवा संघटनांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा 1897 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कार्यवाही करण्यात येईल असे आदेशात नमूद करण्यात आले...

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयात महर्षी वाल्मिकी यांना अभिवादन

नंदुरबार – जिल्हाधिकारी कार्यालयात महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी अभिवादन केले. डॉ.भारुड यांनी भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, शाहूराज मोरे, तहसीलदार उल्हास देवरे आदी उपस्थित होते. यावेळी एकता दिनानिमित्त राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात...

Read More

पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांचा दौरा कार्यक्रम

नंदुरबार  – राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा‍ जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.         शनिवार 31 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 2.30 वाजता नाशिक येथून सारंगखेडाकडे प्रयाण. सायंकाळी 6 वाजता अत्याचारग्रस्त मुलीच्या कुटुंबियांची भेट. 6.30 वाजता सारंगखेडा येथून नंदुरबारकडे प्रयाण व नंदुरबार येथे मुक्काम.             रविवार 1 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 10.00 वाजता शहादाकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता शहादा येथे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या समवेत शासकीय विश्रामगृह शहादा येथे जिल्ह्यातील कायदा व सुरक्षा व्यवस्थेचा आढावा, त्यानंतर सोईनुसार नंदुरबारकडे प्रयाण.             सोमवार 2 नोव्हेंबर 2020 रोजी नंदुरबार येथे राखीव. गुरुवार 5 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11.00 वाजता नंदुरबार येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे आयोजित रॅलीत सहभाग. सायंकाळी 4.00 वाजता वाहनाने जळगावकडे...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!