Author: Ramchandra Bari

‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत चित्रपटगृह, जलतरण तलाव सुरु करण्यास परवानगी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करुन 5 नोव्हेंबर पासून  जिल्ह्यातील प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील जलतरण तलाव, योग प्रशिक्षण केंद्र, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स आणि काही इनडोर खेळांना सुरू करण्याची सुरु करण्यास जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी परवानगी दिली आहे. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी प्रतिबंधीत क्षेत्राबाहेरील जलतरण तलावांना परवानगी देण्यात आली आहे. यासाठी क्रीडा व युवक कल्याण विभागाच्या मार्गदर्शक सूचना व निर्देश लागू असतील.             प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर असलेल्या योगा संस्थांना पुन:श्च सुरु करण्यासाठीही परवानगी देण्यात येत असून सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना लागू राहतील.             बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश, इनडोर शूटिंग सारख्या इनडोर क्रीडा प्रकारांनाही शारीरिक अंतर आणि सॅनिटेशनसंबंधी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याच्या अटीवर 5 नोव्हेंबर पासून मुभा देण्यात आली आहे. चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स, ड्रामा थिएटर्स यांनाही 50 टक्के आसन व्यवस्था पालन करण्याच्या अटीवर प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर पुन्हा सुरू करण्यासाठीही अनुमती देण्यात आली आहे. परंतु चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्समध्ये कोणत्याही खाद्य पदार्थांना परवानगी नसेल. यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना सांस्कृतिक कार्य विभाग तथा स्थानिक प्रशासनाद्वारे लागू असतील. मास्कचा वापर, सामाजिक अंतर राखणे यासारख्या कोविड-19 प्रतिबंधक मार्गदर्शक निर्देशांचे पालन करणे आवश्यक असेल. आदेशाचे काटेकोरपणे पालन केले जात असल्याबाबत तपासणी करण्याचे अधिकारी त्या-त्या क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थाना देण्यात येत आहे. हे आदेश संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याच्या सीमा क्षेत्राकरीता लागू राहील. सदर आदेशाचे कोणत्याही व्यक्ती अथवा संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 , साथ प्रतिबंधक कायदा 1897 व भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम...

Read More

बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतीची पालकमंत्र्यांकडून पाहणी

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी नंदुरबार तालुक्यातील चौपाळे शिवारातील शेतात गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव असलेल्या कापूस पिकाची पाहणी केली. यावेळी माजी मंत्री पद्माकर वळवी, समाज कल्याण सभापती रतन पाडवी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, उपविभागीय कृर्षी अधिकारी निलेश भागेश्वर, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.एस.बी.खरबडे तालुका कृर्षी अधिकारी आर.एम.पवार, मंडळ कृर्षी अधिकारी आर.सी.हिरे उपस्थित होते. निसर्गांच्या लहरीपणामुळे यावर्षी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव जिल्ह्यात दिसून येत असल्याने गुलाबी बोंडअळी प्रादुर्भाव झालेल्या  शेतीचे सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी करावे, असे निर्देश ॲड.पाडवी यांनी दिले. त्यांनी शेतकऱ्यांना गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी फेरोमोन सापळे...

Read More

चला, जाऊया पक्ष्यांच्या दुनियेत…

 नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ‘किलबिल किलबिल पक्षी बोलती’, ‘नाच रे मोरा’, ‘एक होता पोपट’, ‘ चिऊताई चिऊताई दार उघड’, अशी गीते अजूनही कानाभोवती रुंजी घालतात.  लहानपणी आई हा घास काऊचा, चिऊचा म्हणत एकेक घास बाळाला भरवते.  आकाशात उडणाऱ्या, खिडकीत येऊन बसणाऱ्या किंवा झाडाच्या फांदीवर झोके घेणाऱ्या  पक्ष्यांचे आकर्षण आपल्याला बालपणापासूनच असते. शाळेत निसर्गसहली दरम्यानही पक्ष्यांच्या दुनियेतील आनंदाचा अनुभव अनेकांनी घेतला आहे. भारतात जलवायुमान आणि नैसर्गिक भूरचनेच्या विविधतेमुळे पक्ष्यांच्या 2100 जाती व उपजाती  आहेत. हंस, बदक, तितर, कबूतर, पोपट, साळूंकी मैना, कोकीळा, कावळा, चिमणी बगळा, पारवा आढळतात. सुतार, खंड्या, गिधाड, घार इ. पक्षी भारतात बहुतेक सर्वत्र आढळतात.  गिधाड, घार व...

Read More

कृषि औजारे बँकसाठी अर्ज करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कृषि विभागामार्फत कृषि कल्याण अभियान-3 मोहिमेंतर्गत सन 2020-2021 साठी  आकांक्षित जिल्ह्याकरिता कृषि औजारे बँक स्थापन करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकऱ्यांचे नोंदणीकृत गट, नोंदणीकृत शेतकरी बचत गट, विविध कार्यकारी संस्था यांना अनुदान देण्यात येते. इच्छुक गटांनी  26 नोव्हेंबर 2020 पर्यंत तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयात योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार विहीत प्रपत्रात अर्ज सादर करावे. भाडे तत्वावर कृषि यांत्रिकीकरण सुविधा देण्यासाठी कृषि औजारे बँक स्थापन करायची आहे. त्यासाठी 10 लाख खर्चाची मर्यादा असून 80 टक्के किंवा अनुदानाची उच्चतम मर्यादा 8 लाख यापैकी जी कमी असेल त्या मर्यादेपर्यंत अनुदान डिबीटी प्रणालीद्वारे पात्र गटास वितरीत करण्यात येईल. मार्गदर्शक सूचना कृषि विभागाच्या http://krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि  अधिकारी अनंत पोटे यांनी दिली...

Read More

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

नंदुरबार(जिमाका वृत्तसेवा) :  अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पात्र लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी www.mahadiscom.in/solar/ या संकेतस्थळास भेट द्यावी किंवा अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन समाज कल्याण  सहायक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!