Author: Ramchandra Bari

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नवमतदारांना नाव नोंदविण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  भारत निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार 1 जानेवारी 2021 या दिनांकास वयाची 18 वर्ष पुर्ण करणाऱ्या युवकांसाठी 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर  2020 या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमातंर्गत मतदार नोंदणी मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत जास्तीत जास्त नवमतदारांनी आपले नावे नोंदवावीत असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे. या मोहिमेदरम्यान वंचित मतदार आपली नाव नोंदणी अर्ज क्र. 6 भरुन करु शकतील. मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांना  आपल्या नावामध्ये, वय, पत्ता इतर काही त्रुटी असतील बीएलओकडे कागदपत्रे देऊन स्वत:च्या व कुटुंबातील सदस्यांच्या मतदार यादीतील नोंदी, फोटो, तपासणी करुन आवश्यकता असल्यास अर्ज क्र. 8 भरुन सुधारणा करता येणार आहे. तसेच कुटुंबातील मयत व कायमस्वरुपी स्थलांतरीत मतदारांची नावे फॉर्म नंबर 7 भरुन वगळणी करता येतील. नमुना अर्ज क्र. 6 , 7 , 8 व 8 अ www.nvsp.in या संकेतस्थळावर किंवा मोबाईद्वारेही सादर करता येतील. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक मंगळवार 17 नोव्हेंबर 2020 रोजी नवीन कार्यक्रमानुसार एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर 2020 पर्यंत दावे व हरकती स्विकारल्या जातील. दावे व हरकती स्विकारण्याच्या कालावधीत मुख्य निवडणुक अधिकारी यांनी निश्चित केलेल्या दोन शनिवार व रविवारी विशेष मोहिम राबविण्यात येईल.  5 जानेवारी 2021 रोजी दावे व हरकती निकालात काढण्यात येतील. त्यानंतर 14 जानेवारी 2021 रोजी प्रारुप मतदार यादीच्या मापदंडाची तपासणी आणि मतदार यादीच्या अंतिम प्रसिद्धी करण्याकरीता आयोगाची परवानगी घेतली जाईल व 15 जानेवारी 2021 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध...

Read More

बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  नोव्हेंबर महिन्यातील वातावरण कपाशीवरील बोंडअळीच्या वाढीसाठी अत्यंत पोषक असल्याने आणि गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक उपाययोजना कराव्‍यात.  कापसाला कमी बोंडे असून ते पक्व होण्याच्या अवस्थतेत असल्यास मिळणारे उत्पन्न लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी फवारणीचा निर्णय घ्यावा. जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी कपाशीचे पीक चार ते पाच फुट उंचीचे असून त्याच्या फाद्याही दाटलेल्या आहेत. अशा परिस्थितीत किटकनाशकाची फवारणी करतांना विषबाधा होऊ शकते त्यामुळे कपाशीवर फवारणी करताना शेतकऱ्यांनी फवारणी किटचा वापर करावा. फवारणी करताना सकाळी वाऱ्याच्या दिशेने फवारणी करावी. शेताचे सर्वेक्षण करतांना बोंडामध्ये गडद गुलाबी रंगाची तिसऱ्या ते चौथ्या अवस्थेतील अळी तीन ते चार दिवसात कोष अवस्थेत जावून पुढील 10...

Read More

शहादा विधानसभा मतदारसंघात 4 नवीन मतदान केंद्रांना मान्यता

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांनी 1 जानेवारी 2021 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने नंदुरबार जिल्ह्यातील 02-शहादा (अ.ज) विधानसभा मतदार संघातील नावात बदल करण्याचा प्रस्ताव व मतदान केंद्रात बदल करण्याच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. मतदान केंद्राच्या नावात बदल करण्याचा प्रस्तावीत यादीत 02-शहादा (अ.ज) विधानसभा मतदार संघातील 79 नवलपूर मतदान केंद्राच्या नावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इमारत खोली नं.1 नवलपूर असा बदल करण्यात आला आहे. तसेच 02-शहादा (अ.ज) विधानसभा मतदार संघातील 3-कोटबांधणी (नागझिरी) मतदान केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागझिरी पुर्व इमारत , 175- शहादा, वसंतराव नाईक हायस्कुल शहादा उत्तरेकडून पूर्व-पश्चिम इमारत पुर्वकडून खोली क्र. 2 (महिला कक्ष ), 179- शहादा शारदा कन्या विद्या मंदिर शहादा पुर्वेकडून उत्तर-दक्षिण खोली क्र.2, 199- शहादा नगर पालिका प्राथमिक न्यू इंग्लिश स्कूल, पूर्वकडील उत्तर दक्षिण इमारत उत्तरेकडुन खोली क्र.2 शहादा या नवीन केंद्रांना मान्यता देण्यात आल्याचे  जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी नंदुरबार यांनी कळविले...

Read More

गाव बाल संरक्षण समितीची कार्यशाळा संपन्न

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  जिल्हा महिला व बाल विकास विभाग नंदुरबार अंतर्गत जिल्हा बाल कक्षाच्या मार्फत चौपाळे येथे गाव बाल संरक्षण समितीची कार्यशाळा संपन्न झाली. बाल कल्याण समितीचे अध्यक्ष विठ्ठल कदम यांनी बालकांचे हक्क, अधिकार आणि बालकांसंदर्भातील विविध कायदे पालकांनी मुलांसाबत वागतांना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. बाल संरक्षण अधिकारी संस्थात्मक गौतम वाघ यांनी गाव बाल संरक्षण समितीची गरज, कार्यप्रणाली व भूमिका तसेच बालविवाह, स्थलांतर, शिक्षणाचा हक्क आणि एकदंरीत मुलांच्या समस्यांबाबत गाव बाल संरक्षण समितीची कार्य, भूमिका आणि अहवालाबाबत माहिती दिली. यावेळी जिल्ह्यातील प्रत्येक महसूली गावात बाल संरक्षण समिती स्थापन करण्याचे आवाहन जिल्हा बाल संरक्षणाच्या वतीने करण्यात आले. या कार्यशाळेत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुजित इंगवले, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी उमेश पाडवी, बाल संरक्षण अधिकारी रेणुका मोघे, समुपदेशक गौरव पाटील, अंगणवाडी सेविका रत्ना पवार, अल्का माळी, अरुणा राठोड हे उपस्थित...

Read More

पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते नेत्र रुग्ण कक्षाचे उद्घाटन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा रुग्णालय नंदुरबार येथील नवे डायलिसीस यंत्र, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प  आणि नेत्ररुग्ण कक्ष व नेत्रशस्त्रक्रियागृहचे  उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, आमदार शिरीषकुमार नाईक, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, उपविभागीय अधिकारी वसुमना पंत, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.रघुनाथ भोये, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके आदी उपस्थित होते. या सर्व सुविधांसाठी जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी या सर्व सुविधा उपयुक्त ठरतील आणि दुर्गम भागातील आदिवासी बांधवांना चांगले उपचार...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!