Category: संस्कृती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तिथीनुसार ) साध्या पद्धतीने साजरी करावी आणि शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दिनाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री 12 वाजता एकत्र येऊन साजरी केली जाते. परंतु यावर्षी कोरोनाच्या प्रार्श्वभूमीवर शिवजयंती साधेपणाने साजरी करतांना मोठ्या प्रमाणात सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाईन प्रेक्षपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.             दरवर्षीप्रमाणे प्रकारची प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नये. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करावा. त्याठिकाणी सामाजिक अंतराचे पालन करुन फक्त 100 व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यास परवानगी असेल.             यादिवशी आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. अशा उपक्रमांचे आयोजन करताना कोरोनाविषयक मार्गदर्शक सुचनांचे पालन करावे.             कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे करावे. कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असे परिपत्रकात नमूद...

Read More

गुड फ्रायडे व ईस्टर संडे साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता  गुड फ्रायडे आणि ईस्टर संडे हे सण साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद भारुड यांनी केले आहे. या सणासाठी 28 मार्च ते 4 एप्रिल 2021 या कालावधीत अर्थात ‘ होली वीक’ मध्ये प्रत्येक प्रार्थना सभेच्यावेळी चर्चमधील जागेनुसार उपस्थितीचे नियोजन करावे. मोठे चर्च असल्यास जास्तीत जास्त 50 आणि लहान जागा असल्यास 10 ते 25 लोकांच्या उपस्थितीत प्रार्थना सभेचे आयोजन करावे.  सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्यासाठी आवश्यकतेनुसार 4 ते 5 विशेष प्रार्थना सभांचे आयोजन करावे. ख्रिश्चन धर्मीय भावीक प्रार्थना सभेच्यावेळी मास्क व सॅनिटायझरचा वापर करतील याकडे विशेष लक्ष द्यावे. चर्चमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात...

Read More

होळी सण साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता  होळी सण साजरा करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद भारुड यांनी अटी-शर्तींच्या अधीन राहून 28 मार्च 2021 रोजी सायंकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत मुभा दिली असून सण साजरा करताना शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही प्रकारे गर्दी न करता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून  होळी सण साधेपणाने साजरा  करण्यात यावा. होळी सण साजरा करताना एकूण 5 जणाची उपस्थिती राहील याची दक्षता घ्यावी. होळी व धुलीवंदन उत्सवाच्या ठिकाणी मोठे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नये. याबाबतीत स्थानिक प्रशासनाने लादलेले निर्बंध लागू राहतील व या आदेशानंतरही कडक निर्बंध लादू शकतील,...

Read More

होळी, धु‍लीवंदन कार्यक्रम सार्वजनिक स्वरुपात घेण्यास मनाई

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोविड-19 विषाणू बाधित रुग्णाची संख्या वाढत असल्याने प्रतिबंधक उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्ह्यात होळी, धुलीवंदन, रंगपंचमी व तिथीनुसार शिवजंयती सण, उत्सव, मिरवणुक, मेळावे, रॅली व व्याख्याने हे कार्यक्रम सार्वजनिक स्वरुपात घेण्यास मनाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद भारुड यांनी दिले आहेत. जिल्ह्यात काठी येथील राजवाडी होळी व धडगाव तालुक्यातील धडगाव, सुरवाणी, दुकान मांडवी व बिलगांव येथीम सामूहिक मोठ्या होळ्यांना गर्दी होते. चालू वर्षी होळी सणासाठी व तिथीनुसार शिवजयंतीच्या मिरवणूकांसाठी  लोकांची गर्दी होऊ नये म्हणून सदर आदेश देण्यात आले आहेत. या कार्यक्रमात जमावास बंदी राहील. अभिभाषणे व व्याख्याने  आदी कार्यक्रमासाठी आवश्यकतेनुसार ऑनलाईन, सामाजिक माध्यमे यांचा वापर करण्यावर भर देण्यात यावा.  कोणत्याही व्यक्ती, समूह अथवा संस्था, मंडळ, संघटनांनी उल्लंघन केल्यास त्यांचे विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथ प्रतिबंधक कायदा 1897, फौजदारी प्रक्रिया संहिता 1973, भारतीय दंड संहिता 1860 मधील तरतुदी नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले...

Read More

नाताळ सणाच्या वेळी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा नाताळचा सण ख्रिश्चन बांधवांनी साध्या पद्धतीने साजरा करावा आणि नागरिकांनी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे.             नाताळच्या सणानिमित्ताने चर्चमध्ये जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीत विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करावे. चर्चेमध्ये त्यावेळी कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही व शारिरीक अंतर राखले जाईल यांची काळजी घेण्यात यावी.             चर्चेमध्ये निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. तसेच मास्क व सॅनिटायझरचा वापर होईल याकडे विशेष लक्ष देणे द्यावे.  नाताळ सणाच्या दिवशी चर्चमध्ये येशूंच्या जीवनावरील देखावे, ख्रिसमस ट्री अगर काही वस्तू ठेवण्याच्या ठिकाणी शारिरीक अंतराचे व स्वच्छतेचे नियम पाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात याव्यात.             चर्चमध्ये प्रभु येशू ख्रिस्त यांचे स्तुतीगीत गाण्यासाठी जास्तीत जास्त 10 गायकांचा समावेश करण्यात यावा. त्यावेळी वेगवेगळ्या माईकचा वापर करुन शारिरीक अंतराचे पालन करण्यात यावे. चर्चच्या बाहेर व परिसरात दुकाने, स्टॉल लावण्यात येऊ नयेत. 60 वर्षावरील नागरिकांनी तसेच 10 वर्षाखालील बालकांनी सुरक्षिततेच्या व आरोग्याच्यादृष्टीने शक्यतोवर घराबाहेर जाणे टाळावे व सण घरामध्येच साजरा करावा. आयोजकांनी त्यांच्यासाठी ऑनलाईन प्रार्थनेची सुविधा उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करावी.             सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मोठ्या संख्येने एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होईल अशा धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणूकांचे आयोजन करण्यात येऊ नये.             फटाक्याची आतिषबाजी करण्यात येऊ नये ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे काटेकोर पालन करण्यात यावेत. 31 डिसेंबर रोजी चर्चमध्ये आयोजित करण्यात येणारी प्रार्थना ही मध्यरात्री आयोजित न...

Read More

सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा नवरात्रौत्सव, दुर्गापुजा, दसरा हे उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या अनुषंगाने नागरिकांनी शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे.             सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी मंडळांनी महापालिका,नगरपालिका,स्थानिक प्रशासन यांची त्यांच्या धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता तसेच न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबत धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.   या वर्षीचा नवरात्रौत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मुर्तीची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी. देवीच्या मुर्तीची उंची सार्वजनिक मंडळाकरिता 4 फुट व घरगुती गणपती 2 फूटांच्या मर्यादेत असावी.  या वर्षी शक्यतो पारंपारीक देवीच्या मुर्तीऐवजी घरातील धातू, संगमवर आदी मुर्तींचे पूजन करावे. मुर्ती शाडूची/पर्यावरण पूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे.  विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे. उत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातींच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी. गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रक्तदानासारखे आरोग्य विषयक उपक्रम,शिबीरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.  आरती, भजन, किर्तन वा अन्य...

Read More

बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षीची बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्या अनुषंगाने नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी केले आहे.             कोविड 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता नागरिकांनी आपल्या घरीच अदा करावी.             सध्या कार्यान्वीत असणारे जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची असल्यास त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अथवा दूरध्वनीवरुन जनावरे खरेदी करावीत. नागरिकांनी शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी.             प्रतिबंधित क्षेत्रामध्ये...

Read More
Loading

सुंदर विचार

▬▬▬▬ 🎧🎵🎧 ▬▬▬▬
🎵 〇 सुंदर विचार – १४१८ 〇 🎵
═════ 🦋;🦋 ═════

समोरच्यातले शत्रु शोधण्यापेक्षा
आपल्यातले फितुर शोधा.
लढाई जिंकणे
अधिक सोपे जाईल !
➖➖➖➖➖➖➖➖➖
Find your imformers
rather than find the
enemy in front of you.
It will be easier
to win the battle !

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
घरीच रहा,
सुरक्षित रहा !
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी
सुरक्षित अंतराचे नियम पाळा !
➖➖➖➖➖➖➖➖➖
२१ जून
जागतिक योग दिन !
१९१२: लेखक, नाटककार
विष्णू प्रभाकर,
(मृत्यू: ११ एप्रिल २००९)
१९२३: कवी, कथाकार
सदानंद रेगे,
१९५८: अभिनेत्री
रीमा लागू
(मृत्यू: १८ मे २०१७)
यांचा जन्मदिन
१९२८: ऐतिहासिक कादंबरीकार
द्वारकानाथ माधव पितळे
उर्फ नाथमाधव,
(जन्म: ३ एप्रिल १८८२)
१९४०: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे
संस्थापक, सरसंघचालक
डॉ. केशवराव हेडगेवार,
(जन्म: १ एप्रिल १८८९)
१९८४: अभिनेते
अरुण सरनाईक,
(जन्म: ४ ऑक्टोबर १९३५)
२०१२: लेखक, पत्रकार
भालचंद्र दत्तात्रय खेर,
(जन्म: १२ जून १९१७)
२०१२: छायाचित्रकार, पत्रकार
सुनील जना,
(जन्म: १७ एप्रिल १९१८)
२०२०: आधुनिक घरवल
लोकसंगीताचे जनक
जीत सिंग नेगी,
(जन्म: २ फेब्रुवारी १९२५)
२०२०: क्रिकेटपटू
राजिंदर गोयल
(जन्म: २० सप्टेंबर १९४२)
यांचा स्मृतिदिन !
▪▪▪▪▪▪▪▪▪
टीप :- माहितीच्या महाजालावर
उपलब्ध माहितीनुसार
🍂🍂☘☘🍂☘☘🍂🍂
देवेंद्र बोरसे, नंदुरबार.
📱 9168232256 📱
📱 9422287633 📱
🍂🍂☘☘🍂☘ ☘🍂🍂
आपला दिवस मंगलमय होवो…!
🛑 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🛑
🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Number of visitors

0106860
Visit Today : 53
error: Content is protected !!