Category: गणेशोत्सव

गणेश मंडळांनी एचआयव्ही/एड्स जनजागृतीसाठी बॅनर्स लावावेत- मनीषा खत्री

नंदुरबार : (जिमाका वृत्तसेवा) सार्वजनिक गणेश उत्सवामध्ये सर्व गणेश मंडळांनी एचआयव्ही/एड्स जनजागृतीसाठी 8 बाय 8 आकाराचे 2 बॅनर्स गणेश मंडळाच्या प्रदर्शनी भागात स्वखर्चाने लावावेत, असे आवाहन जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. याबाबत अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9822343863 व 9421480675 यावर संपर्क साधावा असेही श्रीमती खत्री यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले...

Read More

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेसाठी मंडळांनी 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत- जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार (जिमाका वृत्त) -राज्य शासनाच्यावतीने आयोजित करण्यात येणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेसाठी नोंदणी करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असून जिल्ह्यातील नोंदणीकृत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तातडीने नावनोंदणी करुन यामध्ये 15 सप्टेंबर 2023 पर्यंत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. राज्यात 19 सप्टेंबर 2023 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहेत. राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांना अनुक्रमे पाच, अडीच आणि एक लाख रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत अधिकाधिक नोंदणीकृत गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदवावा. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या [email protected] या ई- मेल आयडीवर अथवा जिल्हाधिकारी कार्यालयात 15 सप्टेंबर 2023 पर्यंत नोंदणी करावी. स्पर्धेची अधिक माहिती आणि अर्ज htttp://pldeshpandekalaacademy.org या संकेतस्थळावरही उपलब्ध करुन देण्यात आली आहे. स्पर्धेसाठीचे निकष व विषय या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी असलेल्या विविध निकषांनुसार, धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल. या स्पर्धेसाठी पर्यावरणपूरक मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट (थर्मोकोल, प्लास्टिक विरहीत), ध्वनिप्रदूषण रहित वातावरण, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्धा निर्मूलन आदी समाजप्रबोधन, सामाजिक सलोख्यासंदर्भातील सजावट, देखावा, स्वातंत्र्याच्या चळवळीसंदर्भात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक वर्षानिमित्ताने सजावट, देखावा, गणेशोत्सव मंडळाने रक्तदान शिबिर, वर्षभर गडकिल्ले संवर्धन, पर्यावरण रक्षण, सेंद्रीय शेती, सौर ऊर्जेबद्दल जागरुकता निर्माण करणे, रुग्णवाहिका (ॲम्ब्युलन्स) चालविणे, वैद्यकीय केंद्र चालविणे आदी सामाजिक कार्य, शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आरोग्य आदीबाबत केलेले...

Read More

उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सांस्कृतिक कार्य विभागामार्फत उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार असून या पुस्कारासाठी जिल्ह्यातील गणेश मंडळांनी प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांनी केले आहे. या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलीस स्टेशन यांची किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल. यासाठी खालील निकषाच्या आधारे पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल  पर्यावरणपुरक मुर्ती, पर्यावरणपुरक सजावट,(थर्माकाल, प्लॅस्टीक इत्यादी साहित्य विरहीत) ध्वनी प्रदुषण रहित वातावरण, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, अंधश्रद्वा निर्मुलन, सामाजिक सलोखा, समाज प्रबोधन देखावा, सजावट, स्वांतत्र्याच्या चळवळीसंदर्भातील देखावा/ सजावट, रक्तदान शिबीर, वैद्यकीय सेवा शिबिर इत्यादी कार्य. शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थिंनी यांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक इत्यादीबाबत केलेले कार्य, महिला, ग्रामीण भागातील वंचित घटक यांच्या शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक इत्यादीबाबत कार्य, पारंपारिक सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा, पांरपारिक देशी खेळाच्या स्पर्धा, गणेश भक्तासाठी देत असलेल्या प्राथमिक सुविधा आदी निकषानुसार गुणांकावर पुरस्कारासाठी निवड करण्यात येईल. गणेशोत्सव मंडळाने  करावयाच्या अर्जाचा नमुना  www.maharashtra.gov.in   पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांचे संकेत स्थळ www.pideshandekalaacademy.org   व दर्शनिका विभागाचे संकेत स्थळ https://mahagazetteers.com   वर उपलब्ध आहे. अर्जासाठी व सहभागासाठी कोणतेही शुल्क नाही. सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळाने सदर अर्ज भरुन [email protected]  या ईमेलवर ३० ऑगस्ट, २०२२ पूर्वी पाठवावेत. विजेत्यांची निवड जिल्हास्तरीय समितीमार्फत करण्यात येईल. राज्यातील पहिल्या तीन विजेत्या गणेशोत्सव मंडळाना शासनाकडून प्रथम क्रमांक 5 लाख, द्वितीय क्रमांक 2 लाख 50 हजार तर तृतीय क्रमांकास 1 लाखाचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येईल. तरी नंदुरबार जिल्ह्यातील जास्तीत जास्त...

Read More
Loading

[ditty_news_ticker id="624"]

Loading

All

Latest
Loading

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!