Category: निवडणूक

तिलाली ग्रामपंचायत सरपंचपदी स्मिता मधुकर पाटील यांची निवड

नंदुरबार (प्रतिनिधी) – नंदुरबार तालुक्यातील तिलाली (शनिमांडळ) ग्रामपंचायत सरपंच पदावर महाविकास आघाडीच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सौ. स्मिता मधुकर पाटील यांची निवड झाली आहे, पालकमंत्री अँड. के. सी. पाडवी, माजी आमदार चंद्रकांतजी रघुवंशी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजितदादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली व माजी कृ.उ.बा.समिती चेअरमन डॉ. सयाजी मोरे, माजी जि.प. उपाध्यक्ष शंकरराव मोरे व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते संतोष उत्तम पाटील, शिवसेना जिल्हा उपप्रमुख सोमूभैय्या गिरासे, माजी जि.प. सदस्य प्रविण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते लाला माला भिल, प्राचार्य डॉ.सी.पी.सावंत, जगन पाटील, दिपक पाटील यांच्या सहकार्याने ही निवडणूक संपन्न झाली. यावेळी तिलाली ग्रामस्थ...

Read More

जिल्हा परिषद व पंचायत समिती, पोट निवडणूक 2022 प्रारुप मतदार यादी प्रसिद्धीचा कार्यक्रम जाहीर

नंदुरबार, (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्हा परिषदेतील निवडणूक विभाग क्र.52 चितवी ता.नवापूर व अक्राणी पंचायत समितीमधील निर्वाचक गण क्रमांक 29 असली ता.अक्राणी मधील रिक्त जागेच्या पोटनिवडणूकीसाठी  मा.राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीत प्रसिद्ध करण्याचा कार्यक्रम जाहीर केला आहे. असे नायब तहलिसदार (सामान्य) रामजी राठोड  यांनी कळविले आहे.             सदर कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, तहसिलदार कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालयातील सूचना फलकावर व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद कार्यालयातील संकेतस्थळावर 28 एप्रिल 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार यादीवर काही चूका असतील तर त्यासंदर्भात 28 एप्रिल 2022 ते 5  मे 2022 पर्यंत संबंधितांकडून हरकती व सूचना तहसिल कार्यालयात मागविण्यात आल्या आहेत. प्राप्त हरकती व सूचना विचारात घेऊन अधिसूचित केलेल्या तारखेस 11 मे 2022 रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात...

Read More

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करावे – जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी 2022  रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त व्यापक उपक्रमांचे आयोजन करून मतदारांमध्ये जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिल्या. राष्ट्रीय मतदार दिवसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या. याबैठकीस उपजिल्हा निवडणूक अधिकारी संजय बागडे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात तसेच विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती खत्री  म्हणाल्या की, मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा, मतदारांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी  25 जानेवारी  रोजी देशभरात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी मतदारांना विशेषत: नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे.  मतदार यादीत मतदारांना आपले नाव शोधण्याबाबत मार्गदर्शन करावे. मतदार जनजागृतीसाठी स्थानिक बोलीभाषेत पोस्टर व बॅनर लावण्यात यावेत. शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी निंबध, वक्तृत्व, रांगोळी, चित्रकला, स्पर्धां आयोजित कराव्यात. या दिवशी मताधिकार, लोकशाही संबंधी व्याख्याने, परिसंवादाचे आयोजन करावे. विद्यार्थी आणि नागरिकांसाठी सेल्फी पॉइंट तयार करावेत. दिव्यांग, तृतीयपंथी, तसेच  18 वर्षांवरील नवमतदारांना या दिवशी ई-एपिक कार्डचे वाटप करावेत. उत्कृष्ट कामगिरी करणारे मतदान केंद्रस्तीय अधिकारीचा सत्कार करावा.असे विविध उपक्रमांद्वारे राष्ट्रीय मतदार दिवसाचे आयोजन करण्यात यावेत. उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री.बागडे म्हणाले की,  नंदुरबार जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये 25 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्याबाबत  ग्रामविकास विभागाने निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्व ग्रामपंचायतींनी गावातील महत्वाच्या ठिकाणी राष्ट्रीय मतदान दिनाचे बॅनर, फ्लेक्स लावावेत. ग्रामस्थांमध्ये विशेषत: नवमतदारांमध्ये मताधिकार, निवडणूक लोकशाही याविषयी जनजागृती करावी. राष्ट्रीय मतदार दिवसाविषयी जनजागृती व्हावी म्हणून मताधिकार, लोकशाही याविषयावर रांगोळीचे रेखाटन करावे. ग्रामस्थांसमवेत लोकशाहीवर...

Read More

नंदुरबार जिल्ह्यातील 45 ग्रामपंचायतीच्या 57 रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम घोषित

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्य निवडणूक आयोगाच्या 17 नोव्हेंबर 2021 रोजीच्या आदेशानुसार निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे जिल्ह्यातील  45 ग्रामपंचायतीमधील 57  रिक्त जागासाठी पोटनिवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आलेला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पोटनिवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायती पुढील प्रमाणे आहेत. अक्राणी तालुक्यातील  वरेखेडी बु., अक्कलकुवा तालुक्यातील कोवलीमाळ, खापर, शहादा तालुक्यातील पिंप्री, कमरावद, मलोणी, कर्जोत, सावळदा, लक्कडकोट, करजई, गोदीपूर, शिरुडदिगर, बुपकरी, पाडळदा बु., सोनवल त.बो, मनरद, कोठली त.सा, कानडी त.श, श्रीखेड, सुलतानपूर, कुऱ्हावद त.सा.,वर्ढे त.श, नागझिरी, उधळोद, सारंगखेडा, म्हसावद, विरपूर.  तळोदा तालुक्यातील राजविहीर, मालदा, नंदुरबार तालुक्यातील पिंपळोद, धानोरा, ओसर्ली, समशेरपूर, धामळोद, नाशिंदे, लोणखेडा, शिदगव्हाण, कोरीट, घोटाणे, नगांव, करणखेडा, बोराळा. तर नवापूर तालुक्यातील खोलविहीर, बंधारपाडा, निंबोणी या 45 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. ग्रामपंचायतीतील रिक्त पदांच्या पोटनिवडणूक कार्यक्रम असा राहील नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणून अधिसूचित करण्यासाठी  पूर्वी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिध्द केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसूचनेच्या सुधारणा करण्याचा दि.सोमवार 22 नोव्हेंबर 2021 पर्यंत राहील. तहसिलदार सोमवार 22 नोव्हेंबर 2021 रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द करतील, नमुना ‘अ’ अ मध्ये नमूद ठिकाणी  30 नोव्हेंबर 2021 (मंगळवार)  ते 6 डिसेंबर 2021 (सोमवार) रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागविता व सादर करता येतील. मंगळवार 7 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजेपासून नामनिर्देशनपत्र  छाननी करण्यात येईल. गुरुवार 9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत नामनिर्देशपत्र मागे घेता येईल. गुरुवार 9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेनंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येतील. तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी...

Read More
Loading

[ditty_news_ticker id="624"]

Loading

All

Latest

शैक्षणिक

Latest

जिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

नंदुरबार (प्रतिनिधी) :- येथील जिजामाता शिक्षण संस्थेचे जिजामाता शिक्षणशास्त्र महाविद्यालय नंदुरबार व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ( ८ मे २०२२) रोजी ” मराठी विज्ञानसाहित्य :– स्वरूप व्याप्ती व बदलते परिप्रेक्ष्य ” या नाविन्यपूर्ण विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे ऑफलाईन आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्राचे उद्घाटन अमरावती विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख डॉ. मोना चिमोटे हे करणार आहेत तर यावेळी ज्येष्ठ विज्ञानसाहित्याचे अभ्यासक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय ढोले बीजभाषण करणार आहेत. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई दिलीपराव मोरे राहणार आहेत.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. आर. एस. पाटील व शिक्षणशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ.ए.आर. राणे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. विक्रांत दिलीपराव मोरे, सचिव डॉ. अभिजीत दिलीपराव मोरे, जिजामाता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतीश वेडू देवरे, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र पाटील हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहे हे चर्चासत्र चार सत्रात होणार आहे पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर फुला बागुल उपप्राचार्य एस पी डी एम महाविद्यालय शिरपूर हे आहेत यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर सचिन गिरी नांदेड वंदना लव्हाळे जळगाव डॉक्टर युवराज पवार शिरपूर डॉक्टर सुरेश मालचे नाशिक यांचे निबंध वाचन होणार आहे दुसऱ्या सत्राच्या अध्यक्ष विज्ञान साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर सुरेंद्र सुदर्शन दिवसे चंद्रपूर हे राहणार आहेत श्री संतोष पाटील शिरपूर दत्तात्रय शिंदे नाशिक डॉक्टर...

पावसाळ्यापूर्वीच आवश्यक धान्य व औषधांचा साठा करून ठेवावा – जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : मोसमी पावसाच्या आगमनास आता महिनाभराचा कालावधी राहिला आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागासह सर्वच ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा, अन्नधान्य व औषधांचा आतापासूनच पुरेसा साठा करून ठेवावा. पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी प्रत्येक विभागाने कृती आराखडा तयार करावा, 24 तास कार्यरत राहील असा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात आज दुपारी मान्सून पूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, डॉ. मैनक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीद खांदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वसंत बोरसे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी सांगितले, नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश भाग हा डोंगराळ आहे. त्यामुळे मान्सून कालावधीत उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत. आपापल्या विभागावर सोपविलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. नैसर्गिक आपत्तीबाबत मागविलेली माहिती सर्व विभागांनी वेळेत सादर करावी. गावनिहाय आराखडे तयार करावेत. त्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील रहिवाशांसाठी स्वस्त धान्य वेळेत उपलब्ध होईल यासाठी आवश्यक साठा उपलब्ध करून ठेवण्याची दक्षता घ्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांमध्ये सर्पदंश प्रतिबंधक लशीसह औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांची निगा राखावी. आपत्कालिन उपयोगासाठी पथके तयार ठेवावीत. वीज वितरण कंपनीने वीज वाहक तारांची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. सर्व नगरपालिकांनी पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरिनचा किमान सहा महिने पुरेल एवढा साठा उपलब्ध करुन ठेवावा. गावांमध्ये जलशुद्धीकरणासाठी...

Read More
Loading

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Number of visitors

0150563
Visit Today : 103
error: Content is protected !!