Category: दिनविशेष

राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :स्वातंत्र्य दिन साजरा करताना वैयक्तिकरित्या वापरण्यात येणाऱ्या राष्ट्रध्वजाचा योग्य मान राखला जाईल याची दक्षता  नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले आहे. जनतेच्या वैयक्तीक वापरासाठी छोट्या कागदी राष्ट्रध्वजाचा उपयोग करण्यात यावा. राष्ट्रध्वज रस्त्यावर वा अन्य ठिकाणी टाकण्यात येणार नाही याची दक्षता घ्यावी. राष्ट्रध्वज खराब झाले असतील तर त्याचा योग्य मान राखून ध्वज संहितेतील तरतूदीनुसार नष्ट करण्याची कार्यवाही करण्यात यावी. अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात प्लॅस्टिकचे राष्ट्रध्वज विक्रीस प्रतिबंध करावा. अशी विक्री होताना आढळल्यास संबंधितावर फौजदारी गुन्हे दाखल करावे. जाणीवपूर्वक राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आल्यास राष्ट्रीय अवमान प्रतिबंधक कायदा 1971 नुसार कार्यवाही करावी. सर्व शासकीय यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था आणि महामंडळांनी प्लॅस्टिक ध्वजाच्या वापरास पायबंद घालावा. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता स्वातंत्र्य दिनाचा संपुर्ण कार्यक्रम सामाजिक अंतर संदर्भातील सर्व नियम पाळून संपन्न करावा. याची संपूर्ण जबाबदारी आयोजकांची असेल हा कार्यक्रम साजरा करतांना कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या गृह मंत्रालय तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचना व तत्वांचे काटेकोरपणे पालन करावे, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले...

Read More

आदिवासी दिनानिमित्त रानाभाज्या महोत्सवाचे आयोजन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) –  जागतिक आदिवासी दिनानिमित्त जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नंदुरबार आणि प्रकल्प संचालक आत्मा कार्यालयाच्यावतीने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या शेतकरी प्रशिक्षण सभागृहात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महोत्सवाचे उद्घाटन आमदार डॉ.विजयकुमार गावीत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार शिरीषकुमार नाईक, नवापूर पंचायत समिती सभापती रतिलाल कोकणी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी एन.बी.भागेश्वर आदी उपस्थित होते.             रानभाज्या योग्य ब्रँडींग आणि मार्केटींग करून शहरी भागात पोहोचविण्याची आवश्यकता असल्याचे डॉ.गावीत यांनी यावेळी सांगितले.             रानभाज्या महोत्सवाचा उपक्रम स्तुत्य असून या उपक्रमात सातत्य ठेवावे आणि अधिकाधीक नागरिकांपर्यंत या भाज्यांचे महत्व पोहोचवावे असे श्री.नाईक यांनी सांगितले.             कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता एस.बी....

Read More

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी महेश पाटील यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, उपजिल्हाधिकारी बबन काकडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित...

Read More

महिला लोकशाही दिनाचे 20 रोजी आयोजन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): समस्याग्रस्त व पीडीत महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची सोडवणूक शासकीय यंत्रणेकडून करण्यासाठी व समाजातील पीडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी याकरीता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे 20 जुलै 2020 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून तक्रारदार महिलांनी लोकशाही दिनात प्रत्यक्ष उपस्थित न राहता आपले तक्रार अर्ज wcdnandurbar@gmail.com  या ईमेलवर किंवा 9420372067 या व्हॉट्सॲप क्रमांकावर 20 जुलै  रोजी सकाळी 10.30 वाजेपर्यंत पाठविण्यात यावेत.   सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी,अधिक माहितीसाठी जिल्हास्तरावर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,रुम नंबर 226, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,टोकरतलाव रोड,नंदुरबार (दूरध्वनी क्रमांक 02564-210047) येथे संपर्क साधावा, असे सदस्य सचिव, महिला लोकशाही दिन समिती तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नंदुरबार यांनी कळविले...

Read More

योगा केल्यामुळे मानवी शरीर निरोगी राहते प्रा. डॉ. डी. झेड. चौधरी

नंदुरबार (प्रतिनिधी) : येथील नंदुरबार तालुका विधायक समितीचे शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या बहिस्थ बीएड 2019-21 च्या छात्राध्यापकांसाठी योग दिनानिमित्त ऑनलाईन मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला यचममुवि नाशिकच्या शिक्षणशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मनीषा साळूखे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. महाविद्यालयाचे प्रा. डॉ. डी. झेड. चौधरी यांनी यावेळी सविस्तर मार्गदर्शन केले. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ व नं. ता. वी. स. चे शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील बी. एड. अभ्यासकेंद्रच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने ऑनलाइन मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते प्रा. डॉ. डी. झेड. चौधरी मार्गदर्शन करताना म्हणाले की, मानवी शरीरात जर रोग प्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर रोज मनुष्याने योगा केलाच पाहिजे. योगा केल्यामुळे शरीर व मन निरोगी राहते, दैनंदिन ताण तणाव कमी करता येतो, असे प्रतिपादित करून सूक्ष्म व्यायाम, ताडासन, सूर्यनमस्कार, त्रिकोणासन, धनुरासन, सर्वांगासन इत्यादी आसने त्यांनी करून दाखविली. कपालभाती, अनुलोम विलोम इत्यादी प्राणायामचे प्रकार , ध्यानाबद्दल माहिती दिली तसेच यावेळी छात्र अध्यापकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुक्त विद्यापीठ बी. एड. नंदुरबार केंद्राचे समन्वयक प्रा.मोईन शेख यांनी प्रस्तावना करतांना आंतरराष्ट्रीय योग दिनाचे महत्व सांगून रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सर्वांनी योगा केला पाहिजे, असे प्रतिपादन केले. मार्गदर्शन वर्गाच्या प्रमुख अतिथी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या प्रभारी संचालक डॉ. कविता साळुंखे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, योग ही एक साधना आहे. ती आम्हाला प्राचीन काळापासून ऋषीमुनींकडून मिळालेली देणगी आहे. देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदींच्या पुढाकारानेच 21 जून या दिवसाला आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिन...

Read More

महिला लोकशाही दिनाचे 15 रोजी आयोजन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  समस्याग्रस्त व पीडीत महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या न्याय हक्कांचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा. यादृष्टीने महिलांच्या तक्रारी/अडचणी यांची सोडवणूक शासकीय यंत्रणेकडून करण्यासाठी व समाजातील पीडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी याकरीता जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे 15 जून 2020 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे. सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे सदस्य सचिव, महिला लोकशाही दिन समिती तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, नंदुरबार यांनी कळविले...

Read More

मनरेगा आणि वृक्ष संवर्धनाची सांगड घालावी-डॉ.राजेंद्र भारुड पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वटवृक्षाची लागवड

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’ आणि वृक्ष संवर्धनाची सांगड घातल्यास ग्रामीण जनतेला आर्थिक लाभ होण्यासोबत पर्यावरणाचे रक्षण चांगल्यारितीने करता येईल. त्यादृष्टीने वन विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागाने आर्थिक लाभ देणारी झाडे लावण्यासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहीत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड  यांनी केले. टोकरतलाव येथील रोपवाटीकेत पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. वटपौर्णिमेचे औचित्य साधून वड आणि पिंपळाची झाडे यावेळी लावण्यात आली. यावेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, तृप्ती धोडमिसे, उप वनसंरक्षक सुरेश केवटे, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वनअधिकारी ए.के. धानापुणे,  वनक्षेत्रपाल एम.के.रघुवंशी, वनक्षेत्रपालक एस.सी.अवसरमल, सहायक वनसरंक्षक टि.डी.नवले, वन परिक्षेत्र अधिकारी रघुवंशी,  सरपंच महिपाल गावीत आदी उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, शेतकऱ्यांना सागाची झाडे लावल्याने होणाऱ्या दीर्घकालीन लाभाविषयी त्यांच्या भाषेत माहिती देण्यात यावी. त्यासोबत शेताच्या बांधावर आंबा, महूआ, बांबू अशी आर्थिक उत्पन्न देणारी झाडे लावण्यासाठी प्रोत्साहीत करावे. स्थानिकरित्या रोपवाटीका तयार करण्याची माहितीदेखील ग्रामीण भागातील जनतेला देण्यात यावी. तीन वर्षापर्यंत मनरेगाच्या माध्यमातून वृक्ष संवर्धनाची व्यवस्था होणार असल्याने शेतकऱ्यांना वृक्ष लागवडीतून चांगले उत्पन्न मिळू शकेल, असे त्यांनी सांगितले.रोपवाटीकांची संख्या वाढवावी आणि प्रत्येक रोपवाटीकेत, वड, पिंपळ, साग, आंबा आदी लाभदायक वृक्षांची रोपे निश्चित प्रमाणात असतील याकडे विशेष लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी यावेळी वृक्षारोपणात सहभाग...

Read More

हरिओम नगर साई भक्तांनी रक्तदान शिबिरातून साजरा केला मंदिराचा वर्धापन दिन

नंदुरबार (प्रतिनिधी ) – कोरोणा विषाणुमुळे उद्भवालेल्या परिस्थीतीमध्ये साई मदीराचा वर्धापनदिन कार्यक्रम साजरा करत येणार नसल्याने हरिओम नगर परिसरातील रहिवाश्यांनी आणि साईप्रेमीनी रक्तदान शिबिराचे आयोजन करत सामाजीक बांधीलकी जोपासत नवा आदर्श निर्माण केला आहे.       हरिओम नगर मधील साईबाबा मंदीर हे अनेक साईभक्तांचे आस्थाकेंद्र आहे. दरवर्षी या ठिकाणी 31 मे रोजी या मंदीराच्या वर्धापण दिनानिमित्त अनेक धार्मिक विधींचे आयोजन करत भंडाऱयाचा कार्यक्रम केल्या जातो. मात्र यंदा कोरोणा विषाणुच्या अनुशंगाने निर्माण झालेली परिस्थीती आणि त्यातच सोशल डिस्टसिंग सह अन्य नियमांचे पालन करावयाचे असल्याने साई भक्तांनी पुढे येत या दिनाचे औचित्य साधत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात परिसरातील 40 साई भक्तांनी रक्तदान करत सामाजीक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. साई बाबांची सर्वधर्म समभावाची शिकवन रक्तदान सारख्या उपक्रमापेशा काय वेगळी असु शकते याचमुळे परिसरातील नागरीकांनी गरजु रक्तापासुन वंचीत राहुनये या भावनेतुन हा उपक्रम राबवला आहे.          या शिबिरात दिगंबर उपाध्ये, ऋत्विक चव्हाण, लक्ष्मीकांत बयानी, वैभव तांबोळी, अजय केदार, निसर्गदत्त बारी, गणेश मोरे, घनश्याम बारी, हितेश तांबोळी, स्वप्निल तांबोळी, प्रशांत तांबोळी, भारत मोरे, अथर्व रत्नाकर, प्रितेश कुवर, कल्पेश तांबोळी, राकेश तांबोळी, नरेंद्र ठाकूर, अजय मोरे, प्रमोद शिंदे, राहुल गायकवाड, नितीन जोशी, विजय तांबोळी, राजेश दुबे, तृप्ती बयानी, नीलिमा रत्नाकर, सागर मोरे, जितेंद्र सोनार, लखन सोनार, ऋषिकेश पाटील,  अविनाश गवळी अशा  एकूण 40 रक्तदात्यांनी रक्तदान...

Read More

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त 71 रक्तदात्यांनी रक्तदान

नंदुरबार (प्रतिनिधी) – पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 295 जयंतीचे औचित्य साधत आज नंदुरबारमध्ये आयोजीत रक्तदान शिबिरात तब्बल 71 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे. श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने धनगर समाज महासंघ प्रणित मल्हार सेना व कर्मचारी संगठना तसेच अहिल्या वाहिनी नंदूरबार जिल्हा यांच्यातर्फे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.   रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी धनगर समाजाचे सर्व पदाधिकारी आणि समाज बांधवांनी परिश्रम घेतले. या रक्तदान शिबिर प्रसंगी धनगर समाज महासंघ जिल्हाध्यक्ष आनंदा कुंवर, मल्हार सेना जिल्हाध्यक्ष कन्हैयालाल भिमराव धनगर, खासदार डॉ हिनाताई गावित, आमदार डॉ विजय कुमार गावित जिल्हापरिषद उपाध्यक्ष रामभैय्या रघुवंशी, सागर तांबोळी, विरेंद्र अहीरे, आदिवासी क्रांती दल जिल्हाध्यक्ष प्रवीण बागूल,  दीपक धनगर तसेच श्री छत्रपती ब्लड फाऊंडेशन चे जीवन माळी, रामकृष्ण पाटील, अरुण साळुंखे,महेंद्र झंवर, अजय देवरे. हितेश कासार. आकीब धोबी उपस्थित...

Read More

पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त अन्नधान्य वाटप

नंदुरबार (प्रतिनिधी) – मे रोजी राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या २९५ व्या जयंतीनिमित्त धनगर समाज युवा मल्हार सेनेतर्फे नवापूर चौफुली भागातील गरजू व्यक्तींना अन्नधान्य वाटप करण्यात आले. देशात कोरोना विषाणुचे संकट लक्षात घेता संपूर्ण देशात अहिल्याबाई होळकर जयंती अत्यंत साधेपणाने मात्र मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अहिल्याबाई होळकर अत्यंत दानधर्मी, प्रजावत्सल व लोककल्याणकारी शासनकर्त्या होत्या. त्यांच्या सेवाभावी व दानधर्मी या गुणांचा आदर्श घेत धनगर समाज युवा मल्हार सेनेतर्फे शहरातील नवापूर चौफुली भागातील गरीब गरजू लोकांना धान्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी धनगर समाज युवा मल्हार सेनेच्या प्रदेशाध्यक्षा धनश्री आजगे, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्‍वर धनगर, योगेश बोरसे, लक्ष्मण धनगर, प्रकाश धनगर, किसन धनगर, मुकेश आजगे, प्रमोद रजाळे, उज्वल धनगर, दिपक धनगर, विकास बोरसे, मनोज महाले, भुषण महाले आदी समाज बांधव उपस्थित...

Read More

महाराणा प्रताप जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा): महाराणा प्रताप जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या प्रसंगी उपजिल्हाधिकारी कैलास कडलग, महेश सुधरकर, संदीप कदम, स्वीय सहायक सुभाष शिंदे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित...

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयात दहशतवाद व हिंसाचारविरोधी प्रतिज्ञा

नंदुरबार : जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या उपस्थितीत  ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिना’ निमित्त दहशतवाद व हिंसाचारविरोधी प्रतिज्ञा घेण्यात आली.  या प्रसंगी सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत,अविश्यांत पांडा, तृप्ती धोडमिसे, निवासी उपजिल्हाधिकारी धनंजय गोगटे, कैलास कडलग यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या वेळी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनी दहशतवादविरोधी प्रतिज्ञा घेतली. अहिंसा व सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात...

Read More
Loading

सुंदर विचार

☘☘

▬▬▬▬ 🎧🎵🎧 ▬▬▬▬
🎵 〇 सुंदर विचार – ११०२ 〇 🎵
═══════ 🦋;🦋 ═══════

प्रत्येक सकाळ म्हणजे
भूतकाळाच्या वलयातुन
बाहेर येऊन ,
भविष्य सुंदर करण्याची
सुवर्णसंधी होय !

➖➖➖➖➖➖➖➖➖
घरीच रहा,
सुरक्षित रहा !
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी
गर्दी टाळा, नियम पाळा !
➖➖➖➖➖➖➖➖➖
६ ऑगस्ट
जागतिक
अण्वस्त्रविरोधी दिन !
अणुशस्त्र जागृती दिन !
१९२५: लेखिका
योगिनी जोगळेकर,
(मृत्यू: १ नोव्हेंबर २००५)
१९५९: पर्यावरणवादी
राजेंद्र सिंग,
१९६५: दिग्दर्शक
विशाल भारद्वाज,
१९७०: निर्माते, दिग्दर्शक
एम. नाईट श्यामलन,
यांचा जन्मदिवस !
१९२५: काँग्रेसचे एक
संस्थापक , राष्ट्रगुरू
सुरेंद्रनाथ बॅनर्जी,
(जन्म: १० नोव्हेंबर १८४८)
१९६५: संगीतकार
वसंत पवार,
१९९७: साहित्यिक
वीरेन्द्रकुमार भट्टाचार्य,
(जन्म: १४ ऑक्टोबर १९२४)
१९९९: काँग्रेसचे नेते
कल्पनाथ राय,
(जन्म: ४ जानेवारी १९४१)
२००१: नौदल प्रमुख
आधार कुमार चॅटर्जी,
२०१९: भाजपा नेत्या
सुषमा स्वराज
(जन्म: १४ फेब्रुवारी १९५२)
यांचा स्मृतिदिन !_
▪▪▪▪▪▪▪▪▪
टीप :- माहितीच्या महाजालावर
उपलब्ध माहितीनुसार
🍂🍂☘☘🍂☘☘🍂🍂
देवेंद्र बोरसे, नंदुरबार.
📱 9168232256 📱
📱 9422287633 📱
🍂🍂☘☘🍂☘ ☘🍂🍂
आपला दिवस मंगलमय होवो…!
🛑 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🛑
🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Number of visitors

0029514
Visit Today : 107
error: Content is protected !!