Category: टेक्नोलॉजी

बी एड डिजिटल अँप न ता समितीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे लॉन्च

नंदुरबार (प्रतिनिधी) – नंदुरबार येथील न ता वी समितीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील प्रा डॉ कैलास चौधरी यांनी बी एड च्या विद्यार्थी शिक्षकांना व TET परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना उपयुक्त होईल असा अँप तयार केला आहे सदर अँप हा निशुल्क Google play store वरून डोवनलोर्ड करू शकतात त्यात बी एड चे सर्व विषय अध्यापन केले असल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व B Ed च्या अध्ययनर्थ्यांना प्रथम व द्वितीय वर्षाचे व्हिडीओ वाचन साहित्य, ऑनलाइन परीक्षेची तयारी इत्यादी .बाबी उपलब्ध करून दिल्या आहेत.सदर अँप मध्ये TET परीक्षेचे सर्व अभ्यासक्रमानुसार विडिओ व वस्तुनिष्ठ परीक्षेची तयारी करण्यात येणार आहे तसेच इंग्रजी व्याकरणाचेही विडिओ सदर अँप वर उपलब्ध आहे...

Read More

औद्योगिक उत्पादन निर्देशांक वेब पोर्टलचे

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : केंद्रीय सांख्य‍िकी कार्यालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या अधिपत्याखालील अर्थ व सांख्य‍िकी संचालनालय व उद्योग विभागाच्या अधिपत्याखालील उद्योग संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक तयार करण्यासाठी वेब पोर्टल तयार करण्यात आले आहे. या वेब पोर्टलचे अनावरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते  29 एप्रिल, 2021 रोजी सकाळी 10.30 वा. ऑनलाईन करण्यात येणार आहे, असे जिल्हा सांख्यिकी अधिकारी नंदुरबार यांनी कळविले...

Read More

जिल्हा सूचना विज्ञान केंद्रास सीएसआयचा पुरस्कार प्रदान

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया संस्थेतर्फे स्थानिक प्रशासनात संगणकीय प्रणालीच्या नाविन्यपूर्ण वापरासाठी देण्यात येणारा सीएसआय 2020  पुरस्कार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांच्या उपस्थितीत लखनऊ येथे जिल्हा सूचना  विज्ञान केंद्रास प्रदान करण्यात आला. जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी  धमेंद्र जैन यांनी हा पुरस्कार स्विकारला. कोरोनाकाळात संगणकीय प्रणालीचा उपयोग करीत आरोग्यदर्शक मॅप आणि प्रतिबंधीत क्षेत्र व रुग्णालयांचे जीआयएस मॅपिंग करण्यासाठी ही निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांना या यशाबद्दल श्री.जैन व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले...

Read More

ई-एपीक (इलेक्ट्रानिक ओळखपत्र) सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील नव्याने नाव नोंदणी केलेल्या मतदारांनी ई-एपीक अर्थात इलेक्ट्रॉनिक ओळखपत्र या सुविधेचा  लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 25 जानेवारी 2021 पासून ई-एपीक (इलेक्ट्रानिक ओळखपत्र )  सुविधेचा शुभारंभ  करण्यात आला आहे. 1 जानेवारी 2021 या पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत विशेष मोहिमेत नाव नोंदविलेल्या मतदारांना 25 जानेवारी ते 31 जानेवारी 2021 पर्यंत ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. आता ही सुविधा 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 1 जानेवारी 2021 या पुनरिक्षण कार्यक्रमापुर्वीच्या सर्व मतदारांसाठी केवासीची सुविधा आयोगामार्फत तारीख जाहीर केल्यानंतर उपलब्ध करुन देण्यात...

Read More

जिल्हा सूचना विज्ञान केंद्रास सीएसआयचा पुरस्कार

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया संस्थेतर्फे स्थानिक प्रशासनात संगणकीय प्रणालीच्या नाविन्यपूर्ण वापरासाठी देण्यात येणारा पुरस्कार जिल्हा सूचना विज्ञान केंद्रास जाहीर झाला आहे. कोरोनाकाळात संगणकीय प्रणालीचा उपयोग करीत आरोग्यदर्शक मॅप आणि प्रतिबंधीत क्षेत्र व रुग्णालयांचे जीआयएस मॅपिंग करण्यासाठी ही निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांच्या सूचनेनुसार जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी  धमेंद्र जैन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा सूचना विज्ञान केंद्राने जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रतिबंधीत क्षेत्राची माहिती मॅपिंगद्वारे उपलब्ध करून दिली होती. त्यासोबतच प्रत्येक रुग्णालयातील  खाटांची क्षमता, वापर, कोरोना बाधितांची माहितीदेखील आलेखाच्या रुपात उपलब्ध करून देण्यात आल्याने या माहितीचा प्रशासन आणि नागरिकांना चांगला उपयोग झाला. या कामगिरीची दखल घेऊन सीएसआयने जिल्हा सूचना विज्ञान केंद्राची पुरस्कारासाठी निवड केली आहे. या संस्थेतर्फे देशभरात संगणकाच्या सहाय्याने उत्तम सुविधा निर्माण करणाऱ्यांना दरवर्षी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. 12 फेब्रुवारी 2021 रोजी  लखनौ येथे या पुरस्कारांचे वितरण होणार...

Read More

कर्ज देणाऱ्या अनधिकृत मोबाईल ॲपबाबत आरबीआयचा सावधानतेचा इशारा

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जलद व विना अडचण कर्जे मिळण्याची खात्री देणाऱ्या अनधिकृत डिजिटल मंच किंवा  मोबाईल ॲप्सना व्यक्ती, छोटे उद्योजक वाढत्या प्रमाणावर बळी पडत असल्याचे निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने सावधानतेचा इशारा दिला आहे. या ॲपद्वारे कर्जदारांकडून अत्याधिक व्याज दर व छुपे आकार मागविण्यात येत असून कर्ज वसुलीसाठी अस्वीकार्य व दडपशाहीच्या रीती अनुसरण्यात येत असल्याचे आणि कर्जदारांच्या मोबाईल फोन्सवरील डेटा मिळविण्यासाठी कराराचा गैरवापर केला जात असल्याचेही संदर्भ मिळत आहे. आरबीआयकडे नोंदणी केलेल्या बँका, अबँकीय वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) आणि संबधित राज्यांच्या कर्ज देण्याबाबतच्या अधिनियमासारख्या वैधानिक तरतूदीखाली राज्य सरकारकडून विनियमित केल्या गेलेल्या इतर संस्था कर्ज देण्याच्या कायदेशीर कार्यकृती करु शकतात. नागरिकांनी बेकायदेशीर कार्यकृतींना बळी पडू नये आणि ऑनलाईन, मोबाईल ॲपद्वारे कर्ज देऊ करणाऱ्या कंपन्या, संस्थांचा खरेपणा आणि पूर्वइतिहास पडताळून पाहावा. याशिवाय ग्राहकांनी त्यांच्या केवायसी कागदपत्रांच्या प्रती अज्ञात व्यक्ती, सत्यांकन  न केलेल्या अनाधिकृत ॲपवर कधीही शेअर करु नये. असे ॲप्स आणि ॲप्सशी संबंधित बँक खात्यांची माहिती संबधित कायदा  अंमलबजावणी एजन्सीला कळवावी किंवा ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठी https://sachet.rbi.org.in या संकेतस्थळाचा उपयोग करावा. बँका व एनबीएफसींच्यावतीने वापरण्यात येणाऱ्या डिजिटल कर्जदायी प्लॅटफॉर्म्सनी त्यांच्या ग्राहकांना बँकाची किंवा एनबीएफसींची नावे सुरुवातीलाच सांगावीत असे निर्देश रिझर्व्ह बँकेने दिले आहे. रिझर्व्ह बँकेकडे पंजीकृत केलेल्या एनबीएफसींचीं नावे व पत्ते तसेच आरबीआयकडून विनियमित करण्यात आलेल्या संस्थांच्या विरुद्धच्या तक्रारी दाखल करण्यासाठी https://cms.rbi.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक जयंत देशपाडे यांनी केले...

Read More

जिल्ह्यातील आपले सरकार सेवा केंद्र व आधार केंद्रे सुरू

नंदुरबार : जिल्ह्यातील नागरिकांना विविध योजनाअंतर्गत लाभ घेण्यासाठी  अडचणी निर्माण होत असल्याने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण डॉ.राजेंद्र भारुड यांनी जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र व आधार केंद्रे सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. सर्व केंद्रातील उपकरणे नियमितपणे सॅनिटाईझर करावे. केंद्राच्या ठिकाणी सर्वांनी फेस मास्क/रुमाल वापरणे बंधनकारक राहील. केंद्राच्या ठिकाणी केंद्रचालक, ऑपरेटर यांना आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार सोशल डिस्टंन्सीग, साबणाने हात धुणे व सॅनिटाईझर वापर करणे बंधनकारक राहील. केंद्रातील कर्मचाऱ्यांनी काम करतेवेळी नाक,तोंड, डोळे यांना स्पर्श करु नये.  केंद्रात येणाऱ्या सर्व नागरिकांनी व्यक्तीगत स्वच्छता पाळावी. केंद्रातील कर्मचाऱ्यांनी प्रत्येक वेळी बायोमॅट्रीक उपकरणांचे वापरानंतर स्वच्छ करावे. एखाद्या व्यक्तीस खोकला, ताप तसेच श्वास घेण्यास त्रास होत असल्यास अशा व्यक्तींस केंद्रावर येण्यापासून परावृत्त करावे. प्रत्येक केंद्रावर युआयडीएआयने दिलेल्या मार्गदर्शक सूचना केंद्राच्या दर्शनी भागात लावाव्यात.  हॉटस्पॉटच्या ठिकाणी रहात असलेल्या कर्मचारी, नागरिक यांना अशा केंद्राच्या ठिकाणी जाण्यास मनाई राहील. पाचपेक्षा अधिक व्यक्ती केंद्रावर जमा होणार नाही याची जबाबदारी संबंधित केंद्र चालकाची राहील. ज्या क्षेत्रात कन्टेमेंन्ट झोन लागू असेल किंवा करण्यात येईल अशा क्षेत्रातील केंद्रे बंद राहतील. वरील सर्व सूचनांचे काटेकोर पालन करण्यात येवून केंद्र सुरुळीतपणे सुरु ठेवण्यात यावेत.  सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल असे आदेशात नमुद करण्यात आले...

Read More
Loading

सुंदर विचार

▬▬▬▬ 🎧🎵🎧 ▬▬▬▬
🎵 〇 सुंदर विचार – १४१८ 〇 🎵
═════ 🦋;🦋 ═════

समोरच्यातले शत्रु शोधण्यापेक्षा
आपल्यातले फितुर शोधा.
लढाई जिंकणे
अधिक सोपे जाईल !
➖➖➖➖➖➖➖➖➖
Find your imformers
rather than find the
enemy in front of you.
It will be easier
to win the battle !

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
घरीच रहा,
सुरक्षित रहा !
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी
सुरक्षित अंतराचे नियम पाळा !
➖➖➖➖➖➖➖➖➖
२१ जून
जागतिक योग दिन !
१९१२: लेखक, नाटककार
विष्णू प्रभाकर,
(मृत्यू: ११ एप्रिल २००९)
१९२३: कवी, कथाकार
सदानंद रेगे,
१९५८: अभिनेत्री
रीमा लागू
(मृत्यू: १८ मे २०१७)
यांचा जन्मदिन
१९२८: ऐतिहासिक कादंबरीकार
द्वारकानाथ माधव पितळे
उर्फ नाथमाधव,
(जन्म: ३ एप्रिल १८८२)
१९४०: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे
संस्थापक, सरसंघचालक
डॉ. केशवराव हेडगेवार,
(जन्म: १ एप्रिल १८८९)
१९८४: अभिनेते
अरुण सरनाईक,
(जन्म: ४ ऑक्टोबर १९३५)
२०१२: लेखक, पत्रकार
भालचंद्र दत्तात्रय खेर,
(जन्म: १२ जून १९१७)
२०१२: छायाचित्रकार, पत्रकार
सुनील जना,
(जन्म: १७ एप्रिल १९१८)
२०२०: आधुनिक घरवल
लोकसंगीताचे जनक
जीत सिंग नेगी,
(जन्म: २ फेब्रुवारी १९२५)
२०२०: क्रिकेटपटू
राजिंदर गोयल
(जन्म: २० सप्टेंबर १९४२)
यांचा स्मृतिदिन !
▪▪▪▪▪▪▪▪▪
टीप :- माहितीच्या महाजालावर
उपलब्ध माहितीनुसार
🍂🍂☘☘🍂☘☘🍂🍂
देवेंद्र बोरसे, नंदुरबार.
📱 9168232256 📱
📱 9422287633 📱
🍂🍂☘☘🍂☘ ☘🍂🍂
आपला दिवस मंगलमय होवो…!
🛑 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🛑
🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Number of visitors

0106946
Visit Today : 139
error: Content is protected !!