Category: आरोग्य

पावसाळ्यापूर्वीच आवश्यक धान्य व औषधांचा साठा करून ठेवावा – जिल्हाधिकारी मनीषा खत्री

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : मोसमी पावसाच्या आगमनास आता महिनाभराचा कालावधी राहिला आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यातील दुर्गम आणि डोंगराळ भागासह सर्वच ठिकाणी आवश्यक सोयीसुविधा, अन्नधान्य व औषधांचा आतापासूनच पुरेसा साठा करून ठेवावा. पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी प्रत्येक विभागाने कृती आराखडा तयार करावा, 24 तास कार्यरत राहील असा नियंत्रण कक्ष कार्यान्वित करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील रंगावली सभागृहात आज दुपारी मान्सून पूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, डॉ. मैनक घोष, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीद खांदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वसंत बोरसे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती खत्री यांनी सांगितले, नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश भाग हा डोंगराळ आहे. त्यामुळे मान्सून कालावधीत उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत. आपापल्या विभागावर सोपविलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. नैसर्गिक आपत्तीबाबत मागविलेली माहिती सर्व विभागांनी वेळेत सादर करावी. गावनिहाय आराखडे तयार करावेत. त्यासाठी समन्वयक अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील रहिवाशांसाठी स्वस्त धान्य वेळेत उपलब्ध होईल यासाठी आवश्यक साठा उपलब्ध करून ठेवण्याची दक्षता घ्यावी. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांमध्ये सर्पदंश प्रतिबंधक लशीसह औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांची निगा राखावी. आपत्कालिन उपयोगासाठी पथके तयार ठेवावीत. वीज वितरण कंपनीने वीज वाहक तारांची पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. सर्व नगरपालिकांनी पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरिनचा किमान सहा महिने पुरेल एवढा साठा उपलब्ध करुन ठेवावा. गावांमध्ये जलशुद्धीकरणासाठी...

Read More

मोदलपाडा नूतन प्राथमिक आरोग्य केंद्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  मोदलपाडा येथे उभारण्यात आलेल्या नूतन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीमुळे परिसरातील नागरिकांना चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असून या भागातील आरोग्याच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य देण्यात येत असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले. तळोदा तालुक्यातील मोदलपाडा (सतोना ) येथील नूतन प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीच्या लोकार्पण प्रसंगी तसेच भव्य दंत व सर्व रोग निदान शिबीर कार्यक्रमात ते बोलत  होते. यावेळी जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, आमदार राजेश पाडवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, माजी मंत्री पद्माकर वळवी, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती निर्मलाताई राऊत, समाजकल्याण सभापती रतनदादा पाडवी, शिक्षण व आरोग्य सभापती...

Read More

दुर्गम भागातील नागरिकांच्या आरोग्य सुविधांसाठी शिबिराचे आयोजन पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी

नंदुरबार(जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्य़ातील अतिदुर्गम असलेल्या तोरणमाळ व परिसरातील नागरिकांना स्थानिक पातळीवर आरोग्य सुविधा मिळाव्यात, याकरिता राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत. या शिबीराचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी केले. तोरणमाळ येथे आयोजित आरोग्य शिबीर कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, खासदार डॉ. हिना गावित, जि.प.समाजकल्याण सभापती रतन पाडवी, कृषी व पशुसंवर्धन सभापती गणेशदादा पराडके, जि. प. सदस्य सुहास नाईक, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.वि) के.एफ.राठोड, तहसिलदार ज्ञानेश्वर सपकाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी, डॉ.राजेश वसावे,...

Read More

पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते अक्कलकुवा येथील ऑक्सीजन प्लॅन्टचे उद्घाटन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जामिया मिलीया हॉस्पीटल, अक्कलकुवा येथील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि.प.अध्यक्षा सीमा वळवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, माजी मंत्री पद्माकर वळवी, जि.प.सदस्य सी.के.पाडवी, प्रताप पाडवी, मकराजी आरीफ, जामिया संकुलाचे अध्यक्ष मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवी, उपाध्यक्ष हुसेफा गुलाब मोहम्मद वस्तानवी, सहायक जिल्हाधिकारी डॉ. मैनक घोष, तहसिलदार सचिन म्हस्के आदी उपस्थित होते. यावेळी ॲड. पाडवी म्हणाले की, कोविड काळात पहिल्या व दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता होती. ती आपण सर्वांनी बघीतली त्यामुळे या ऑक्सिजन निर्मिती प्लॅटन्चा अक्कलकुवा तसेच धडगाव व मोलगी...

Read More
Loading

[ditty_news_ticker id="624"]

Loading

All

Latest

नंदूरबार जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी सहकार्याचे प्रशासनाचे आवाहन

नंदूरबार (जिमाका) – अक्षय तृतीयेच्या दिवशी भारतातील काही भागात मोठ्या प्रमाणावर विवाह आयोजित केले जातात. यावेळी बालविवाह सुद्धा होण्याची शक्यता असते. नंदूरबार जिल्ह्यातही यादिवशी बालविवाह होणार नाही, यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साईनाथ वंगारी यांनी केले आहे. बालविवाह प्रतिबंधक कायदा, 2006 संपूर्ण महाराष्ट्रात राज्यात लागू करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात बालविवाह होऊ नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी पोलीस विभाग, बालकल्याण समिती, बालविकास प्रकल्प अधिकारी, ग्राम बाल संरक्षण समिती, तालुका बाल संरक्षण समिती, जिल्हा बाल संरक्षण समिती, चाईल्ड लाईन, ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक, पोलीस पाटील व अंगणवाडी सेविका इत्यादी यंत्रणेची मदत घेण्यात येईल. बालविवाह प्रतिबंधक कायदा, 2006 च्या कलम 9 नुसार प्रौढ पुरुषाने अल्पवयीन मुलीशी विवाह केल्यास दोन वर्षे पर्यंत सक्षम कारावास व एक लाखापर्यंत दंडाची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. कलम दहा नुसार बाल विवाह जुळवून आणणे किंवा जबरदस्तीने बालविवाह लावण्यास प्रवृत्त करणाऱ्यास दोन वर्षापर्यंत सश्रम कारावास व एक लाखापर्यंत दंडाची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. कलम 11 नुसार बालविवाहास प्रोत्साहन देणाऱ्या किंवा बालविवाहास परवानगी देणाऱ्यास दोन वर्षापर्यंत सश्रम कारावास व एक लाखापर्यंत दंडाची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. अक्षय तृतीया या सणाच्या दिवशी जिल्ह्यात बालविवाह होणार नाहीत, होत असल्यास याविषयी नागरिकांनी प्रशासनास सूचित करावे. असे आवाहन श्री. वंगारी यांनी केले...

Read More
Loading

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Number of visitors

0150565
Visit Today : 105
error: Content is protected !!