Author: Ramchandra Bari

अखिल भारतीय गुर्जर महासभेचे राष्ट्रीय अध्यक्षपदी दीपकभाई पुरुषोत्तम पाटील यांची निवड.

शहादा (प्रतिनिधी ) –  अखिल भारतीय गुर्जर महासभा जनरल कार्यकारिणीची बैठक शनिवार दि.३०मे रोजी राजस्थानातील पुष्करच्या गुर्जर भवन इमारतीत आयोजित करण्यात आली होती.यावेळी सातपुडा साखर कारखाना शहादाचे चेअरमन बापूसाहेब दीपकभाई पाटील यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली.  बैठकीच्या प्रारंभी स्व. रामसरण भाटी (माजी अध्यक्ष) यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यासोबतच समाजातील कोरोना योद्धा यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.  तद्नंतर राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक प्रभारी म्हणून माजी आ. गोपीचंद गुर्जर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी उपस्थित असलेल्या कार्यकारणी सदस्य व कोरोना साथीच्या आजारामुळे उपस्थित नसलेले सदस्यांची मते दूरध्वनीने जाणून घेतले.त्यानंतर माजी राष्ट्रीय अध्यक्ष सहकार महर्षि पी.के.अण्णा पाटील यांचे सुपुत्र आणि ज्येष्ठ राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पुरुषोत्तम पाटील यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित केले.श्री.पाटील यांना पुढील पाच वर्षे राष्ट्रीय कार्यकारिणी स्थापन व विस्तार करण्याची जबाबदारी देण्यात आली.यावेळी एकमताने सुरेंद्रकुमार नागर, (खासदार, राज्यसभा) यांना गुर्जर महासभेचे संरक्षक बनवले गेले. राष्ट्रीय अध्यक्ष श्री.पाटील यांनी त्यांच्या कार्यकारिणीच्या पदाधिका-यांची घोषणा केली.  यांत मुख्यत: राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी गोपीचंद गुर्जर (माजी आमदार), नेपालसिंग कसाना, (प्रसिद्ध समाज सेवी), राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून मुकेश गुर्जर, अहमदाबाद गुजरात, बच्चूसिंह गुर्जर जयपुर राजस्थान  यांचेसह काळजीवाहू राष्ट्रीय अध्यक्ष रामकिशोर दोगणे यांना मध्य प्रदेशच्या अध्यक्षांची जबाबदारी कायम करण्यात आली. यावेळी राजस्थान कार्यकारिणीचे अध्यक्ष रामप्रसाद धाबाई यांनी सर्व पाहुण्यांचे पुष्पहार व शाल देऊन स्वागत केले. यावेळी अँड.रमेश धाबाई प्रदेशाध्यक्ष कायदा प्रकोष्ठ, अजमेर जिल्हा अध्यक्ष नथुलाल बजाड,  हरचंद पटेल अध्यक्ष अखिल भारतीय वीर गुर्जर सुधार समिती समिती पुष्कर ,रामअवतार गुर्जर नसीराबाद, शिवप्रकाश खटाणा, भागचंद चोपडा, गोपालकृष्ण डोई ,गोपाल गुर्जर...

Read More

मृदा, जल आणि वृक्ष संवर्धनावर भर द्या-डॉ. राजेंद्र भारुड हरित सातपुडा अभियान राबविण्याचे आवाहन

नंदुरबार : जिल्ह्यातील सातपुड्याच्या परिसराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ‘हरित सातपुडा अभियान’ राबविण्यात येणार असून या अभियानाच्या माध्यमातून मृदा, जल आणि वृक्ष संवर्धनावर भर द्यावा, तसेच ही जनचळवळ व्हावी यासाठी शिक्षकांची विशेष योगदान द्यावे, असे  आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात ‘हरित सातपुडा अभियाना’च्या नियोजनाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस सहायक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अविश्यांत पांडा, उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, संदीप कदम, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी दयानंद जगताप, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे आदी उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, गावपरिसरातील मोकळ्या जागेत मृदसंधारणाची कामे घेण्यात यावीत आणि पावसाळ्यात याठिकाणी वृक्षारोपण करण्यात यावे. वृक्षारोपण करताना स्थानिक पर्यावरणानुसार रोपांची निवड करावी. कृषी आणि वन विभागाने ‘गाव तेथे नर्सरी’ उपक्रम राबवावा. नर्सरीसाठी नाविन्यपूर्ण योजना किंवा सीएसआरमधून निधी उपलब्ध करून देण्यात येईल. शाळेच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमाची माहिती प्रात्यक्षिकांसह द्यावी. प्रत्येक गावाचे सूक्ष्म नियोजन करण्यात यावे. माथा ते पायथा जलसंधारणाचे काम करून वृक्षारोपण करावे. जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळेच्या शिक्षकांनी जनजागृतीचे काम करावे. वृक्ष संवर्धनाची नवी संस्कृती निर्माण व्हावी यासाठी प्रत्येक घटकाचे योगदान महत्वाचे आहे. असे केल्यास गावातून होणारे स्थलांतर कमी होऊन जंगलातील उत्पादनाचा आर्थिक लाभ स्थानिकांना होऊ शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अक्कलकुवा, धडगाव, तळोदा आणि शहादा या भागातील वृक्षारोपण अभियानाचे संनियंत्रण तीन अधिकाऱ्यांच्या समितीमार्फत करण्यात येऊन गावपातळीपर्यंत प्रत्येक घटकाची आणि यंत्रणेची अभियानातील भूमीका निश्चित करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. वृक्षतोडीपासून होणारे नुकसान जनतेला समजावून सांगावे, 14 वा वित्त आयोग आणि पेसातील निधीच्या 25 ते 40 टक्के हिस्सा मृद, जल आणि वन संवर्धनासाठी उपयोगात...

Read More

नंदुरबार जिल्हा पारिषदेची २८ भरारी पथके

नंदुरबार(प्रतिनिधी) :- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाची पार्श्वभूमी लक्षात घेता जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य व इतर सुविधा सुरळीतपणे मिळत आहेत किंवा नाही? हे पाहण्यासाठी नंदुरबार जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हाभरात अचानक २८ भरारी पथके पाठवून एकाच वेळी प्राथमिक आरोग्य केंद्र, पशुवैद्यकीय दवाखाने, ग्रामपंचायती आणि रोजगार हमी योजनेच्या कामाची पहाणी केली. यामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण होऊन, सर्व कर्मचारी नेमून दिलेल्या कामाच्या ठिकाणी पूर्णवेळ उपस्थित राहतील, अशी अपेक्षा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विनय गौडा जी सी यांनी व्यक्त केली आहे.जिल्ह्यात नागरिकांचा प्रत्यक्ष संपर्क येणाऱ्या ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच पशुवैद्यकीय दवाखाने यातील कामकाज कोरोना विषाणूच्या (covid-19) अनुषंगाने देण्यात आलेल्या सूचनांनुसार सुरू आहे किंवा नाही? हे पाहण्याबरोबरच प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची संख्या व उपस्थिती, आरोग्य केंद्रांमधील भौतिक सुविधा, स्वच्छता, तेथील उपकरणे, केंद्रांच्या प्रशासकीय दप्तराची परिस्थिती; त्याचबरोबर औषधांचा उपलब्ध साठा, याबाबत माहिती घेण्यात येत असून, ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये मासिक सभा नियमानुसार नियमित होतात काय?, ग्रामसभा नियमांनुसार पार पडत आहेत काय?, ग्रामपंचायतीने विविध नोंदवह्या अद्ययावत ठेवल्या आहेत काय?, ग्रामपंचायतींची कर वसुली योग्यरीत्या केली जात आहे का?, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध योजनांची कामे योग्यरीत्या केली जात आहेत काय?, अशा पद्धतीची पाहणी या भरारी पथकाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये सुद्धा उपस्थित कर्मचारी वर्ग, त्यातील तांत्रिक कामाचा आढावा, साथीच्या रोगाबाबत दवाखान्यात ठेवण्यात आलेल्या नोंदवह्या, तसेच ग्रामस्थांसाठी दवाखान्याची माहिती भिंतीवर लावण्यात आली आहे काय? या बाबींचा भेटीतील पाहणी मुद्द्यांमध्ये समावेश आहे. रोजगार हमी योजनेच्या कामावरही या पथकांकडून भेटी देण्यात आल्या असून, कामावरील मजूर उपस्थिती तपशील, मजुरांना पुरवण्यात येणाऱ्या...

Read More

दररोज 100 वाहनांच्या कापसाची खरेदी करावी-जिल्हाधिकारी

नंदुरबार :  कापूस खरेदी प्रक्रीयेला वेग देऊन दररोज 100 वाहनातील कापसाची खरेदी होईल असे नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले. शहदा येथील कापूस खरेदी केंद्र आणि कॉटन मीलला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासमवेत उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपविभागीय अधिकारी चेतन गिरासे, पोलीस उप अधीक्षक सपकाळे, परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी दयानंद जगताप, तहसीलदार मिलींद कुलकर्णी, गट विकास अधिकारी सी.टी.गोसावी  आदी होते. डॉ.भारुड म्हणाले, शेतकऱ्यांकडील शिल्लक कापसाचे सर्वेक्षण करण्यात यावे. शेवटच्या शेतकऱ्याचा कापूस खरेदी होईपर्यंत ही प्रक्रीया सुरू ठेवावी. योग्य नियोजन करून खरेदी प्रक्रीयेला वेग  देण्यात यावा. जिल्हाधिकाऱ्यांनी  कृषी उत्पन्न बाजार समिती येथे भेट देऊन आडत विक्रेत्यांशी चर्चा केली. त्यांनी तहसील कार्यालयातील बैठकीत मनरेगा योजनेचा आढावा घेतला. शेतकऱ्यांचे ग्रुप करून कंपार्टमेंन्ट बंडींगची कामे घेण्यात यावी. सीसीटीची कामे घेताना सोबत वृक्षारोपणाची कामे घेण्यात यावी, असे निर्देश त्यांनी दिले.  मानमोडे आणि भुलाणे येथील कामांना डॉ.भारुड यांनी भेट दिली. त्यांच्या हस्ते मजूरांना टोप्यांचे वाटप करण्यात आले. स्थानिक प्रशासनाने या टोप्या उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यांनी स्वयंसेवी संघटनांच्या प्रतिनिधींशीदेखील चर्चा केली. कोविड संकटानंतर शासनाच्या विविध योजनांमध्ये स्वयंसेवकांचे चांगले सहकार्य घेता येईल. संकट आणखी काही काळ चालणार असल्याने स्वयंसेवकांनी उत्साह कायम ठेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. डॉ.भारुड यांनी नगर पालिकेला भेट देऊन पावसाळ्यापूर्वीच्या कामांचा आढावा...

Read More

दीड हजार विद्यार्थी व मजूर श्रमीक एक्स्प्रेसने गावाकडे रवाना

नंदुरबार :  लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या जामिया संकुल येथील 1518 विद्यार्थी तसेच जिल्ह्यातील अन्य 70 मजूर असे 1588 प्रवाशांना विशेष श्रमीक एक्स्प्रेसने  झारखंड, बंगाल व आसामला पाठविण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत,अविश्यांत पांडा, अप्पर जिल्हाधिकारी महेश पाटील,उपजिल्हाधिकारी कैलास कडलग,अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, उपशिक्षणअधिकारी डॉ.युनूस पठाण, रेल्वेचे सहायक परीचालन प्रबंधक गुलाबसिंग गहलोत, जामिया संकुलाचे अध्यक्ष मौलाना गुलाम वस्तानवी, प्रिन्सिपल रफीक जहागिरदार,  मौलाना जावेद पटेल आदी उपस्थित होते.  रेल्वेने प्रवास करणाऱ्या मजूरांमध्ये नंदुरबार येथील 26, तळोदा 7, नवापुर 18 , शहादा 12 तसेच साक्री येथील 7 अशा 70 मजूरांचा समावेश आहे. या सर्व विद्यार्थी व मजूराची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. दुपारी 1 वाजेच्या सुमारास रेल्वे नंदुरबार स्थानकात दाखल झाली. प्रवाशांसह ही रेल्वे विद्यार्थी व मजूरांना घेवून गोहाटीच्या दिशेने 2 वाजून 40 ‍मिनीटांनी रवाना झाली. यावेळी श्री.पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने नागरिकांना बसमधून उतरवून सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत सर्वांना रेल्वेत बसविण्यात...

Read More

सुंदर विचार

▬▬▬▬ 🎧🎵🎧 ▬▬▬▬
🎵 〇 सुंदर विचार – ११६१ 〇 🎵
═══════ 🦋;🦋 ═══════

प्रत्येक चांगल्या विचाराची
पहील्यांंदा चेष्टाच होते,
मग त्याला विरोध होतो,
आणि
शेवटी त्याच विचारांचा
स्वीकार होतो !
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
Every good thought
is mocked at first,
then it is opposed,
and in the end
the same thought
is accepted !

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
घरीच रहा,
सुरक्षित रहा !
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी
मास्कचा नियमित वापर करा !
➖➖➖➖➖➖➖➖➖
७ ऑक्टोबर
आंतरराष्ट्रीय
त्रिज्यात्मक मज्जातंतुवेदना
जागरूकता दिन !
१८६६: मराठी काव्याचे प्रवर्तक
कृष्णाजी केशव दामले
तथा केशवसुत,
(मृत्यू: ७ नोव्हेंबर १९०५)
१९१४: गझल, ठुमरी गायिका
बेगम अख्तर,
(मृत्यू: ३० ऑक्टोबर १९७४)
१९१७: बालकुमार साहित्यिक
विनायक महादेव
तथा वि. म. कुलकर्णी,
(मृत्यू: १३ मे २०१०)
१९६०: शास्त्रीय गायिका
आश्विनी भिडे-देशपांडे,
१९७८: क्रिकेटपटू
जहीर खान
यांचा जन्मदिन !
१७०८: शिखांचे १० वे गुरू
गुरू गोबिंद सिंग,
(जन्म: २२ डिसेंबर १६६६)
१९७५: कवी, विचारवंत
देवनहळ्ळी गुंडप्पा
तथा डी. व्ही. जी.,
(जन्म: १८ जानेवारी १८८९)
१९९८: महसूलमंत्री, काँग्रेस नेते
पद्मश्री भाऊसाहेब वर्तक,
१९९९: बाल साहित्यिक
उमाकांत निमराज ठोमरे
(जन्म: १५ ऑगस्ट १९२९)
यांचा स्मृतिदिन !
▪▪▪▪▪▪▪▪▪
टीप :- माहितीच्या महाजालावर
उपलब्ध माहितीनुसार
🍂🍂☘☘🍂☘☘🍂🍂
देवेंद्र बोरसे, नंदुरबार.
📱 9168232256 📱
📱 9422287633 📱
🍂🍂☘☘🍂☘ ☘🍂🍂
आपला दिवस मंगलमय होवो…!
🛑 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🛑
🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Number of visitors

0046309
Visit Today : 126
error: Content is protected !!