Author: Ramchandra Bari

दुकानांच्या वेळेत शिथीलतेचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

नंदुरबार : जिल्ह्यात नगरपालिका क्षेत्रातील व अक्कलकुवा ग्रामपंचायत क्षेत्रातील आस्थापना व दुकाने लॉकडाऊन कालावधीत अर्थात 17 मे 2020 पर्यंत सकाळी 7 ते दुपारी 12 आणि सायंकाळी 4 ते 7 या वेळेत सुरू राहतील, असे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी आदेशित केले आहे. लॉकडाऊनमध्ये वैद्यकीय सेवा, मेडीकल, भाजीपाला, किरणा दुकाने व दुध विक्रेते यांची दुकाने त्यांच्या परवाना परवानगीनुसार पूर्णवेळ सुरू राहतील. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आस्थापना व दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत त्यांच्या परवाना परवानगीनुसार सुरू राहतील. प्रतिबंधीत क्षेत्र घोषित झाल्यानंतर त्या क्षेत्राचे नियम लागू राहतील. कुठल्याही कार्यालयास वेळेत बदल करण्याचा अधिकार असणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांना या आदेशामुळे आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी पुरेसा कालावधी मिळणार आहे. नागरिकांनी दुकानाच्या ठिकाणी गर्दी करू नये. दुकानात जाताना व खरेदी करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे व चेहऱ्यावर मास्कचा वापर करावा. दुकाने व आस्थापनांनी देखील कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करावे व सॅनिटायझरची सुविधा करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले...

Read More

जिप अध्यक्षा कु. सीमा वळवी यांच्या कडून एक लक्ष रुपये मदत

नंदुरबार :- येथील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कु. सीमा वळवी व त्यांचे वडील माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी या दोघांनी मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये प्रत्येकी एक लक्ष रुपये रक्कमेचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडे सुपूर्द केला.जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा कु. सीमा वळवी यांनी त्यांच्या जिल्हा परिषद सदस्य मानधनाच्या रकमेतून एक लक्ष रुपये एवढी रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्याबरोबरच त्यांचे वडील माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी यांनीदेखील यांच्या मानधनातून एक लक्ष रुपये एवढी रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिली आहे. देश संकटात असतांना प्रत्येक व्यक्ती आपल्या परीने देशसेवा, समाजसेवा करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यात आपलाही खारीचा वाटा असावा, या भावनेतून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठीचे धनादेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड ज्यांच्याकडे सुपूर्द केल्याचे यावेळी माजी मंत्री ॲड. पद्माकर वळवी यांनी...

Read More

आरोग्य आणि रोजगार अशा दोन्ही पातळीवर काम करा- डॉ.राजेंद्र भारुड

नंदुरबार दि.14 : कोविड-19 चे संकट आणखी काही काळ असण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांचे आरोग्य आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून 50 हजार मजूरांना रोजगार उपलब्ध करून देणे अशा दोन्ही पातळ्यांवर विभाग प्रमुखांनी काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, सहायक जिल्हाधिकारी अविश्यांत पांडा, वसुमना पंत, उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, कैलास कडलग, महेश सुधळकर आदी उपस्थित होते. डॉ.भारुड म्हणाले, कोरोना दीर्घकाळ राहील यादृष्टीने नियोजन करावे. शासकीय रुग्णालयाची यंत्रणा अधिक परिपूर्ण करण्यावर भर द्यावा. मान्सूनपूर्व रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्तीची कामे करावी. एखाद्या भागात रुग्ण आढळल्यास त्या भागातील व्यवहार तातडीने बंद करावेत. ग्रामीण भागातील व्यवहार सुरळीतपणे सुरू राहतील याची दक्षता घ्यावी. लॉकडाऊनच्या काळात अनेकांना रोजगार नसल्याने मनरेगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचे व्यापक नियोजन करण्यात यावे. प्रत्येक गावाने योजनेअंतर्गत एक मोठे काम घ्यावे. शिक्षकांच्या माध्यमातून ग्रामस्थांना योजनेचे महत्व पटवून द्यावे. अक्कलकुवा आणि अक्राणी भागात वन व कृषी विभागाने विशेष पुढाकार घ्यावा. जिल्ह्यात किमान 100 कोटीपेक्षा अधिकची कामे होऊन 50 हजार मजूरांना रोजगार मिळेल असे प्रयत्न सर्व यंत्रणांनी मिळून करावे. मजूरी अदा करण्याच्या कामात उशिर करू नये, असे निर्देश त्यांनी दिले. कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून धान्यवाटपात गैरव्यवहार होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे प्रकार आढळल्यास कठोर कारवाई करावी. मान्सूनपर्वू रस्ता दुरुस्ती, गटार व नालेसफाई, विद्युत दुरुस्तीची कामे वेळेत करावी. कुठलेही नवे काम सुरू करू...

Read More

जुनागढ मधून 1500 मजूर जिल्ह्यात परतले

नंदुरबार दि.14 : गुजरात राज्यातील जुनागढ येथे मजुरीसाठी गेलेले जिल्ह्यातील 1500 आदिवासी मजूर श्रमीक एक्सप्रेसने नंदुरबारला परतले. या मजूरांना आपल्या गावी आणण्यासाठी पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी विशेष प्रयत्न केले. या सर्व मजूरांना राज्य परिवहन महामंडळाच्या 52 बसेसने त्यांच्या गावी पाठविण्यात आले. याप्रसंगी सहायक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविश्यांत पांडा, अतिरिक्त पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, तहसिलदार भाऊसाहेब थोरात, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जे.आर.तडवी, पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाळकर आदी उपस्थित होते. जिल्ह्याच्या विविध भागातील हे मजूर लॉकडाऊनमुळे अडकून पडले होते. लॉकडाऊनचा कालावधी वाढविल्यानंतर या मजूरांकडून आपल्या मुळ गावी जाण्याची मागणी करण्यात येत होती. त्यासर्व मजूरांना आणण्यासाठी विशेष श्रमीक रेल्वेची व्यवस्था करण्याचे निर्देश पालकमंत्री ॲड. के.सी.पाडवी यांनी राज्याच्या मुख्य सचिव आणि मदत व पुनर्वसन सचिवांना दिले होते. त्यांनी गुजरातमधील प्रशासनाशीदेखील संपर्क साधला होता. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी या संदर्भात जुनागढ प्रशासनाशी समन्वय साधला. या प्रयत्नांमुळे हे सर्व मजूर सुखरुप नंदुरबार रेल्वे स्थानकावर पोहोचले. बुधवारी रात्री 9.30 वाजता जुनागढ येथुन विशेष श्रमीक एक्सप्रेसने सर्व मजूर निघाले आणि गुरुवारी सकाळी 8.30 वाजता नंदुरबार रेल्वे स्थानकावर पोहोचले. रेल्वेस्थांनकावर आगमन झाल्यानंतर 10 डॉक्टर व 10 आरोग्य सेवकामार्फत बोगीनुसार प्रत्येक मजुरांचे थॅर्मल स्कॅनिंग करण्यात आले. त्यांच्या हातावर होम क्वॉरटाईनचा शिक्का मारुन त्यांची नोंद घेण्यात आली. सर्व मजूरांना तालुकानिहाय अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करीत त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात आले. त्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत 52 बसेसची व्यवस्था करण्यात आलेली होती. मुळ गावी परल्यानंतर सर्व मजूराना त्यांच्या घरी चौदा दिवस क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. यावेळी रेल्वे स्थानकावर गर्दी होऊ नये म्हणून...

Read More

अमरजितसिंह राजपूत यांना पीएचडी प्रदान

नंदुरबार (प्रतिनिधी):- येथील सेवानिवृत्त कृषी सहायक व मूळचे आमोदे ता . शिरपूर , धुळे , येथील रहिवाशी श्री पी. के. पाटील यांचे चिरंजीव श्री . अमरजितसिंह प्रेमसिंह राजपूत यांना नुकतीच पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे.” अल्झायमर रोगाच्या उपचारासाठी नॅनोकारेरिस्ट सिस्टमचा विकास ” या संशोधन कार्यासाठी , इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी , निरमा युनिव्हर्सिटी , अहमदाबाद यांच्या कडून ही पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांनी डॉ . शितल बुटानी , सहयोगी प्राध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन करण्यात आले. ते सध्या भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई ( IIT Bombay ) येथे पोस्ट – डॉक्टरेट फेलो ( Post Doc Fellow ) या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नी डॉ. स्मिता राजपूत यांनी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई येथून २०१४ साली पीएचडी पूर्ण केली आहे. सध्या त्या जर्मन आधारित कंपनीत ( Merck Life Sciences , India ) मार्केटिंग मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. दोघेही श्री. पी. के. पाटील, सेवानिवृत्त कृषी सहाय्यक , नंदुरबार यांचे मुलगा व सून असून श्री. शैलेंद्र राजपूत , पोलिस नाईक , नंदुरबार यांचे भाऊ आणि भावजई...

Read More

सुंदर विचार

▬▬▬▬ 🎧🎵🎧 ▬▬▬▬
🎵 〇 सुंदर विचार – ११२१ 〇 🎵
═══════ 🦋;🦋 ═══════

बुडणाऱ्यांना किनाऱ्यावरुन
सूचना देतात ते सामान्य
आणि
स्वत:चा जीव धोक्यात घालून
त्यांना वाचवतात
ते असामान्य !
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
It is normal to
give instructions to
the drowning people
from the shore
and it is unusual to
save them by risking
their own lives !

➖➖➖➖➖➖➖➖➖
घरीच रहा,
सुरक्षित रहा !
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी
सकस आहाराचे सेवन करा !
➖➖➖➖➖➖➖➖➖
२८ ऑगस्ट
१८९६: उर्दू शायर
रघुपती सहाय
ऊर्फ फिराक गोरखपुरी,
(मृत्यू: ३ मार्च १९८२)
१९०६: रंगभूमी अभिनेते
चिंतामणी गोविंद
तथा मामा पेंडसे,
१९१८: प्रसिद्ध संगीतकार
राम कदम,
(मृत्यू: १९ फेब्रुवारी १९९७)
१९२८: पदार्थवैज्ञानिक
एम. जी. के. मेनन,
१९२८: सुप्रसिद्ध सतारवादक
उस्ताद विलायत खाँ,
(मृत्यू: १३ मार्च २००४)
१९३४: न्यायमूर्ती, राष्ट्रीय
मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षा
सुजाता मनोहर,
१९६६: माजी खासदार
प्रिया दत्त
यांचा जन्मदिवस !
१६६७: जयपूर चे राजे
मिर्झाराजे जयसिंग,
(जन्म: १५ जुलै १६११)
१९६९: स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत
रावसाहेब पटवर्धन,
२००१: लेखक, चित्रकार
व्यंकटेश माडगूळकर
(जन्म: ६ जुलै १९२७)
यांचा स्मृतिदिन !
▪▪▪▪▪▪▪▪▪
टीप :- माहितीच्या महाजालावर
उपलब्ध माहितीनुसार
🍂🍂☘☘🍂☘☘🍂🍂
देवेंद्र बोरसे, नंदुरबार.
📱 9168232256 📱
📱 9422287633 📱
🍂🍂☘☘🍂☘ ☘🍂🍂
आपला दिवस मंगलमय होवो…!
🛑 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🛑
🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Number of visitors

0038056
Visit Today : 190
error: Content is protected !!