Author: Ramchandra Bari

प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध अभियानाअंतर्गत अधिक क्षयरुग्ण आढळलेल्या परिसरात होणार आरोग्य तपासणी

नंदुरबार ( प्रतिनिधी) :- प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध अभियानासाठी जिल्हास्तरीय समन्वय समिती गठित करण्यात आली असून सदर समितीची सभा दि. 29/10/2021 रोजी  मा. जिल्हाधिकारी मनीषा खत्री  यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे संपन्न झाली.  सदर सभेत मा. जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी जनतेस आवाहन केले कि पूर्ण उपचार घेतल्यास क्षयरोग पूर्णपणे बरा होतो तरी क्षयरोगाची लक्षणे आढळल्यास ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी. क्षयरोगाची तपासणी व उपचार पूर्णपणे मोफत आहेत, त्यांचा लाभ घ्यावा तसेच  गेल्या पाच वर्षात अधिक क्षयरुग्ण आढळलेल्या गावातील प्रत्येक घरात आरोग्य तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी दिले व अभियान यशस्वी होणेसाठी मार्गदर्शन केले.  या अभियाना अंतर्गत जिल्हयातील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि आशा कार्यकर्त्या व स्वयंसेवक यांच्याद्वारे  प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध अभियाना अंतर्गत एकुण  3,21,359 इतक्या लोकसंख्येतील 64,272 घरांपर्यंत 161 पथके पोचणार असून घरोघरी भेट देऊन क्षयरोगाच्या लक्षणांची माहिती देणे व तसेच संशयित...

Read More

राष्ट्रीय संपादणूक चाचणीस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नंदुरबार ( प्रतिनिधी) :- केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयातील केंद्रीय शिक्षण बोर्डामार्फत आज दिनांक 12 नोव्हेंबर रोजी देशभरातील इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी व दहावीच्या निवडक विद्यार्थ्यांसाठी पार पडलेल्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणीमध्ये नंदुरबार जिल्ह्यातील 181 शाळातील 5 हजार 793 विद्यार्थ्यांनी (90.92 %) उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. अत्यंत शिस्तप्रिय वातावरणात पार पडलेल्या या सर्वेक्षणाबाबत केंद्रस्तरावरून आलेल्या निरीक्षकांनी समाधान व्यक्त केले.केंद्र शासनामार्फत दर तीन वर्षांनी देशभरातील इयत्ता तिसरी, पाचवी, आठवी व दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी निवडक विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणीचे आयोजन केले जाते. यंदाच्या सर्वेक्षणासाठी नंदुरबार जिल्ह्यातील 181 शाळांची निवड करण्यात आली होती. संपूर्ण जिल्ह्यातील 181 शाळांमधून इयत्ता तिसरीचे 885...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!