Author: Ramchandra Bari

चौथ्यां खेलो इंडिया युथ गेम्स 2022 करीता जिल्हा निवड चाचणीचे आयेाजन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :   चौथ्यां खेलो इंडिया युथ गेम्सचे आयोजन 5 ते 14 फेब्रुवारी 2022 या कालावधीत हरियाणा येथे होणार आहे. यास्पर्धेसाठी महाराष्ट्रातील खो-खो, कबड्डी व बास्केटबॉल हे खेळ पात्र ठरले असून 18 वर्ष वयोगटातील मुले व मुलीची राज्य संघ निवड करण्यासाठी जिल्हास्तरावर निवड चाचणीचे 22 नोव्हेंबर 2021 रोजी आयेाजन करण्यात आले आहे.             कबड्डी व खो-खो खेळासाठी यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे तर बास्केटबॉल खेळासाठी जी.टी.पाटील महाविद्यालय,नंदुरबार येथे सकाळी 9.30 वाजता निवड चाचणी होईल.             राज्य संघ निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी पात्रता अशी, कबड्डी खेळासाठी वजन गट मुले 70 किलो व मुलीसाठी 65 किलो असेल.खेळाडूचा जन्म हा 1 जानेवारी 2003 रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा. खेळाडूकडे आधारकार्ड, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र, जन्मप्रमाणपत्र (5 वर्षांपुर्वी काढलेले ) यापैकी कोणतेही दोन कागदपत्र असणे आवश्यक असेल.या निवड चाचणीत शाळा, क्लबच्या संघांना प्रवेश देण्यात येईल. तर शाळाबाह्य तसेच संघातुन सहभागी होवू न शकणाऱ्या खेळाडूंना निवड चाचणीसाठी संधी देण्यात येईल. स्पर्धा व चाचणी त्या त्या खेळाच्या अधिकृत संघटनेच्या नियमानुसार घेण्यात येईल. निवड चाचणीचे आयोजन खेलो इंडिया युथ गेम्ससाठी राज्य संघ निवड  करण्यासाठी करण्यात येत  असल्यामुळे यासाठी कोणतेही प्रमाणपत्र दिले जाणार नाही.             अधिक माहितीसाठी क्रीडा  मार्गदर्शक, जगदीश चौधरी ( 9422834187 ) यांच्याशी संपर्क साधावा. राज्य संघ निवड करण्यासाठी जिल्हा निवड चाचणीत जिल्ह्यातील शाळा,कनिष्ट महाविद्यालय, क्रीडा मंडळे यांनी जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये केले...

Read More

बालनाट्य व दिव्यांग बालनाट्य स्पर्धांसाठी, 30 नोव्हेंबर पर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन

मुंबई : शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या 1 फेब्रुवारी 2022 पासून सुरु होणाऱ्या बालनाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्था, शाळा, विद्यालयांकडून 30 नोव्हेंबर, 2021 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत आहेत.             18 व्या बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी 1 फेब्रुवारी, 2022 पासून महाराष्ट्र राज्यातील विविध स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच द्वितीय दिव्यांग बालनाटय स्पर्धेची अंतिम फेरी फेब्रुवारी 2022 मध्ये एका केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे. बालनाट्य व दिव्यांग बालनाटय स्पर्धेकरीता रु.1,000/- इतक्या अनामत रकमेचा धनाकर्ष स्पर्धक संस्थेने संचालक, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे नावे पाठवावयाचा आहे. प्रयोग सादर केल्यानंतर त्याच रकमेचा धनाकर्ष (डीडी) संस्थांना परत करण्यात येईल. गतवर्षी स्पर्धेत नियमांचे उल्लंघन केलेल्या तसेच कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रयोग न करणाऱ्या नाट्यसंस्थांना यावर्षी स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी बालनाटय स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका व नियम शासनाच्या www.mahasanskruti.org या वेबसाईटवर नवीन संदेश या मथळयाखाली उपलब्ध होतील. आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका दि. 30 नोव्हेंबर, 2021 पर्यंत खालील पत्त्यावर सादर कराव्यात. नाशिक विभागातील संस्थांनी संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, विस्तार भवन, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, मुंबई-32 (022-22043550) या पत्त्यावर प्रवेशिका सादर कराव्यात.             विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रवेशिका कोणत्याही परिस्थितीत स्विकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशिल भरला नसल्यास प्रवेशिका अपात्र ठरविण्यात येईल. प्रवेशिकेतील त्रुटींच्या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची सर्व स्पर्धक संस्थांनी कृपया नोंद घ्यावी.             स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने शासनाने...

Read More

जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांना शेतमाल सुरक्षित ठेवण्याचे आवाहन

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यात 18 नोव्हेंबर 2021 रोजी वादळीवारा (ताशी 40 ते 50 कि.मी ), विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त झाली आहे. शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी  शेतकऱ्यांनी आपला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवुन ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर मालाचे नुकसान होणार नाही अशी काळजी घ्यावी. विजा, गारांपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मोकळे मैदान, झाडाखाली, वीज वाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मजवळ थांबू नये, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी केले...

Read More

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लोकसहभागातून साजरा करावा -जिल्हाधिकारी महेश पाटील

नंदुरबार  (जिमाका वृत्तसेवा) :  भारतीय स्वांतत्र्याला पुढील वर्षी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. देशभरात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्त केंद्र सरकार व राज्य शासनाच्या निर्देश, संकल्पनेनुसार हा महोत्सव लोकसहभागातून साजरा करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी महेश पाटील यांनी दिल्या. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आज दुपारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, उपजिल्हाधिकारी कल्पना निळ-ठुबे, अमृत महोत्सव समितीचे समन्वयक तथा जिल्हा पुनर्वसन अधिकारी नितीन सदगीर, तहसीलदार उल्हास देवरे, गिरीश वखारे (तळोदा), भाऊसाहेब थोरात आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले की, जिल्ह्यातील  सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अमृत महोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने प्रत्येक विभागाने कृती  आराखडा तत्काळ सादर करावा. अमृत महोत्सवाचा कृती आराखडा सादर करताना प्रामुख्याने भारताचा स्वातंत्र्यसंग्राम, नावीण्यपूर्ण संकल्पना, स्वांतत्र्योत्तर फलनिष्पती, नवे संकल्प, अंमलबजावणी या पाच मुद्दयावर कार्यक्रम व उपक्रमावर आधारीत असावा. भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनिमित्त आयोजित करावयाच्या कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त स्थानिक, युवा, विद्यार्थी, खासगी संस्था, लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने आणि सहभागाने उत्साहाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमांचे आयेाजन करावे. प्रत्येक विभाग व नेहरु युवा केंद्र, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आदींच्या मदतीने रॅली, सायकल मोर्चा, चित्रकला स्पर्धा,  पथनाट्याचे आयोजन करावे. त्यामध्ये व्यसनमुक्ती भारत ,वारसास्थळे, पदयात्रा, भारतीय स्वातत्र्यांशी निगडित महत्वाच्या ठिकाणांची स्वच्छता, डागडुजी, रंगरंगोटी , रक्तदान शिबिर, श्रमदान, वृक्ष लागवड, वनराई बंधारा असे उपक्रम राबवावेत. स्वांतत्र्याशी निगडित महत्वाची ठिकाणे निवडून त्याठिकाणी कार्यक्रमाचे आयेाजन करावे. त्या स्थळांची माहिती द्यावी. नगरपालिका, नगरपंचायतींने आपापल्या कार्यक्षेत्रातील  स्वांतत्र्यांशी संबंधित स्थळांची, पुतळ्यांची डागडुजी व...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!