पहारेकरी- सफाई कामगारपद मानधनावर भरण्याबाबत
नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्हा सैनिक कार्यालय धुळे येथील बहुउद्देशिय हॉल येथे दरमहा रुपये 8911 इतक्या मानधनावर कंत्राटी पद्धतीने पहारेकरी- सफाई कामगारकरीता एक जागा भरावयाची आहे. हे पद माजी सैनिक मधून भरले जाणार आहे. या पदासाठी इच्छुक माजी सैनिकांनी आपल्या वैयक्तीक बायोडाटा, तसेच सैन्यसेवेचे सेवापुस्तक तसेच शैक्षणिक प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रासह 19 जानेवारी 2021 रोजी दुपारी 3 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, माजी सैनिक विश्रामगृह आवार, संतोषी माता मंदिर चौकाजवळ, धुळे येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड यांनी केले...
Read More