Author: Amit Kapadne

मिनी मंत्रालयासाठी नंदुरबार जिल्ह्यात सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत 9.28 टक्के मतदान

*नंदुरबार- (जगदीश ठाकुर)* नंदुरबार जिल्हा परिषद व सहा  पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज दिनांक 7 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया होत आहे. सकाळपासूनच थंडीचा जोर असल्यामुळे मतदान केंद्रांवर सकाळच्या सुमारास मतदारांची अल्प गर्दी दिसुन आली. सकाळी साडेसात वाजेपासून सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत नंदुरबार जिल्ह्यात केवळ 9.28 टक्के मतदान झाले आहे. यात नंदुरबार जिल्ह्यात अक्राणी तालुक्यात सर्वात कमी मतदान सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत झाल्याची नोंद आहे. याठिकाणी केवळ 7.7 टक्के इतके मतदान झाले आहे. दुसऱ्या स्थानावर शहादा तालुक्यात 8.4 टक्के मतदान, तिसऱ्या स्थानी नंदुरबार तालुक्यात 8.5 टक्के तर चौथ्या स्थानी तळोदा तालुक्यात 9.33 टक्के, अक्कलकुवा तालुक्यात 10.39 टक्के आणि सर्वाधिक मतदान नवापूर तालुक्यात 12.40 टक्के इतके सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत झाले...

Read More

बस थांबली नाही, म्हणून एसटी बसवर केली दगडफेक

नंदुरबार/प्रतिनिधी- बस थांबा असतांनाही त्याठिकाणी बस न थांबली नसल्याचा राग आल्याने तिघांनी बसवर दगडफेक केली. यात बसच्या काचा फुटून बसमधील चार प्रवासी विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत. शहादा येथील आगारातील बसचालक किशोरकुमार वामनराव ठाकूर हे एसटी बस (क्रं.एम.एच.14-बीटी.1868) विद्यार्थी व प्रवासी बसवून कलमाडी ते शहाद्याकडे येत होते. परंतू, बस ही ठरल्या ठिकाणी न थांबल्याचा राग येवून संशयित तिघांनी बसवर दगड मारुन प्रवाश्यांच्या जिवीतास धोका निर्माण होईल, असे कृत्य केले. या दगडफेकीत बसच्या पाठीमागील काचा फुटून बसमध्ये बसलेल्या अंजी आसाराम कोळी, वैशाली जागो कोळी, गायत्री मनोहर पाटील, सेजल युवराज पाटील (सर्व.सोनवल ता.शहादा) हे चौघेही जखमी झाले आहेत. याबाबत बसचालक किशोरकुमार ठाकूर यांनी शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश गोपाळ कोळी, गणेश राजू धनगर (रा.कलमाडी) व त्यांचा अन्य जण या तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोना.संदीप लांडगे करीत...

Read More

नंदुरबारची शिवसेना आता माजी आ.रघुवंशींच्या सैनिकांची सेना!

शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख रमेश पाटील यांचा पत्रपरिषदेत आरोप जि.प.निवडणूकीत शिवसेनेच्या सच्चा सैनिकांवर अन्याय! नंदुरबार/ प्रतिनिधी- (जगदिश ठाकूर) काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देवून माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळेच जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत शिवसेनेच्या उमेदवारीपासून सच्चा शिवसैनिक वंचित राहिला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेनाही आता शिवसैनिकांची सेना नसून ती आता माजी आ.रघुवंशी यांच्या सैनिकांची शिवसेना झाली आहे. रस्त्यांवर आंदोलने करुन शिवसेना टिकवून ठेवणार्‍या खर्‍या शिवसैनिकांवर अन्याय झाला असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी नंदुरबार तालुका प्रमुख रमेश पाटील यांनी पत्रपरिषदेतून केला आहे. नंदुरबार येथील शिवसेनेचे तालुकाप्रमुख रमेश पाटील यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करुन भाजपात प्रवेश केला आहे. त्यानिमित्त रमेश पाटील यांनी पत्रपरिषद घेतली. यावेळी पाटील म्हणाले की, आम्ही तळागाळातील शिवसैनिक असून खर्‍या अर्थाने शिवसेनेसाठी कार्य केले. परंतू, जिल्हा परिषदेच्या निवडणूकीतून सच्चा शिवसैनिक डावलला गेला आहे. आणि नुकतेचे शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी आ.रघुवंशी यांच्या सैनिकांना उमेदवारी देवून संधी देण्यात आली आहे. नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील अनेक शिवसैनिक नाराज असून सुरुवातीपासून पक्षाचे संघटन करणार्‍या सच्चा शिवसैनिकाला जि. प. निवडणूकीपासून वंचित रहावे लागले आहे. हे केवळ माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे सच्चा शिवसैनिकांवर अन्याय झाला आहे. यासाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात हे देखील जबाबदार असल्याचा आरोपही पाटील यांनी करीत शिवसेनेला जय महाराष्ट्र केला करुन भाजपात प्रवेश केला आहे. गट व गणातील सच्चा शिवसैनिकाला उमेदवारी मिळावी, यासाठी जिल्हाप्रमुखांनीही प्रयत्न केले. परंतू त्यांच्या हातात पक्षाचे एबी फॉर्म नसल्याने तेही काही करु शकले नसल्याचे पाटील यांनी पत्रपरिषदेत सांगितले. नंदुरबार येथे पत्रपरिषदेत बोलताना शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख...

Read More

*रेझिंग डे निमित्त शालेय विद्यार्थ्यांनी हाताळली शस्त्रे*

*नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात पोलीस वर्धापन दिनानिमित्त शस्त्रांचे प्रदर्शन* नंदुरबार/ प्रतिनिधी- (जगदीश ठाकुर) पोलीस वर्धापन दिनानिमित्त नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात रेझिंग डे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना पोलीस शस्त्रांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या शस्त्र प्रदर्शनात शालेय विद्यार्थ्यांनी स्वतः पोलीस शस्त्रे हाताळली. या कार्यक्रमाला शहर पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाळकर, राजपूत, पोना. जयेश गावित यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शस्त्र प्रदर्शनात शहरातील विविध शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. नंदुरबार येथील शहर पोलीस ठाण्यात आयोजित शस्त्र प्रदर्शनात शस्त्रे हाताळून माहिती जाणून घेताना विद्यार्थी व...

Read More

जिभाऊ करंडकमुळे जिल्ह्यातील नाट्य चळवळीला नवसंजीवनी-मनोज रघुवंशी

नंदुरबार-जिभाऊ करंडक स्पर्धेमुळे महाराष्ट्र राज्याच्या नाट्य चळवळीत नंदुरबारचे नाव कोरले गेले आहे, असे आम्हास वाटते. या स्पर्धेमुळे नंदुरबार जिल्ह्यातील नाट्य चळवळीला नवसंजीवनी प्राप्त झाली आहे, असे प्रतिपादन नंदुरबार तालुका विधायक समितीचे उपाध्यक्ष तथा जिल्हा कल्चरल ऍकेडमीचे अध्यक्ष मनोज रघुवंशी यांनी केले. ते येथील जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. गाडगे बाबा शैक्षणिक व सांस्कृतिक सेवा मंडळ, शिंदे यांच्यातर्फे एम स्न्वेअर वेल्थ मॅनेजमेंट नाशिक प्रायोजित राज्य पुरस्कृत शिक्षक जयदेव लिंबा पेंढारकर उर्फ जिभाऊ यांच्या स्मरणार्थ जिभाऊ करंडक राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धा नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे संपन्न होत आहे. सदर स्पर्धेचे उद्घाटन मनोज रघुवंशी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व प्रतिमेस माल्यार्पण करुन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यीक दिनानाथ मनोहर, सिने दिग्दर्शक शाम रंजनकर, किरण तडवी, मिलिंद पहुरकर, शितलभाई पटेल, नगरसेवक रविंद्र पवार, डॉ.राजकुमार पाटील, संजय चौधरी, पत्रकार रमाकांत पाटील, रणजीत राजपूत, रोटरी नंदनगरीचे अध्यक्ष प्रितिष बांगड, डॉ.चेतन चौधरी, प्रभाकर भावसार, मिरा मनोहर आदी उपस्थित होते. यावेळी नाटककार रविंद्र लाखे मनोगतातून म्हणाले, की जिभाऊ करंडक या राज्यस्तरीय स्पर्धेत सातत्य ठेवल्यास नक्कीच नंदुरबार येथून कलावंत व नाट्य तंत्रज्ञ उदयास येतील. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नागसेन पेंढारकर यांनी केले. सूत्रसंचालन तुषार ठाकरे यांनी तर आभार एन.टी.पाटील यांनी मानले. या स्पर्धेचे परिक्षण नाटककार रविंद्र लाखे, नाट्य लेखक दत्ता पाटील, नाटककार अजित भगत हे करीत आहेत. आज स्नेहयात्री प्रतिष्ठान (भुसावळ)-वारी जावा, मॅड स्टुडीओ (धुळे)-रात्र वैराची आहे, जनायक थिएटर्स (जळगांव)-करट छबी, समर्थ बहुउद्देशीय संस्था (एरंडोल)-लाल चिखल, प्रताप महाविद्यालय (अमळनेर) असणं-नसणं, सिद्धांत बहुउद्देशीय संस्था...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!