नंदुरबार : कोविड-19 च्या संसर्ग ओळखण्यासाठी व त्यापासून बचावासाठी तयार करण्यात आलेले ‘आरोग्य सेतू’ ॲप  जिल्ह्यातील 57 हजार 627 नागरिकांनी डाऊनलोड केले आहे. केंद्र सरकारने हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून दिले आहे. या ॲपवर आपली माहिती भरल्यास गर्दीच्या ठिकाणी कोरोनाची लक्षणे असलेली व्यक्ती असल्यास ॲपद्वारे पूर्वसुचना मिळू शकते. त्यासोबत कोरोनापासून बचाव कसा करावा याची माहितीदेखील या ॲपवर देण्यात आली आहे.

नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत या अॅपचा वापर करणे आवश्यक आहे. विशेषत: बाधित क्षेत्रातून आलेल्या नागरिकांनी ॲप डाऊनलोड करणे आवश्यक आहे. कोरोना बाधिकताची संपर्क साखळी ओळखण्यासाठीदेखील या ॲपचा उपयोग होणार असल्याने नागरिकांनी ॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी केले आहे.