शिक्षक भारती संघटनेची नंदुरबार व नवापूर तालुका कार्यकारणी जाहीर

नंदुरबार (प्रतिनिधी):- शिक्षक भरती संघटनेच्या नंदुरबार तालुकाध्यक्षपदी राहुल वादनेरे तर नवापूर तालुकाध्यक्षपदी विनायक सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे.

शिक्षक भारती संघटनेची नंदुरबार जिल्हा कार्यकारिणीची ऑनलाइन बैठक नुकतीच पार पडली. यामध्ये नविन शैक्षणिक धोरण २०२० ची शिक्षक भारती विनाअनुदान विरोधी संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष जयवंत भाबड यांनी अतिशय सुंदर मांडणी केली. महेश नांद्रे, तुषार सोनवणे, राजेश जाधव, आशिष दातीर इकबाल शेख यांनी मार्गदर्शन केले. सतिष मंगळे यांनी सूत्रसंचालन केले. याच बैठकीत जिल्हा उपाध्यक्ष महेश नांद्रे यांनी नंदुरबार व नवापूर या दोन्ही तालुक्याची कार्यकारणी जाहीर केली. नंदुरबार तालुकाध्यक्षपदी राहुल वडनेरे, उपाध्यक्षपदी मनोज पाटील, सचिव वैभव पाटील, कार्याध्यक्ष सौ.चेतना पाटील, कार्यवाह सौ. सुनिता भोसले, सहकार्यवाह सौ विजया पाटील, संघटक मुकेश शहा, प्रसिद्धी प्रमुख सौ शारदा पाटील, तसेच नवापूर तालुकाध्यक्ष विनायक सूर्यवंशी, उपाध्यक्ष राजेश भामरे, कार्याध्यक्ष संजय ठोसरे, कार्यवाह शरद पवार, सहकार्यवाह रवींद्रनाथ महिरे, संघटक महेंद्र वसावे,प्रसिद्धी प्रमुख गणेश महाजन, प्रताप साळुंके, राकेश पाटील, राम अहिरराव, कैलास राजधर न्याहळदे यांची एकमताने निवड करण्यात आली.
नवनियुक्त पदाधिकारी यांंचा गेल्या अनेक वर्षांपासून जुनी पेन्शन, विनाअनुदानित शाळा, अतिरिक्त शिक्षक, जिल्ह्यातील शिक्षकांचे विविध प्रश्न या चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे, जुनी पेंशन, विनाअनुदानित शाळांना अनुदान, शिक्षकांचे अनेक ज्वलंत प्रश्न मार्गी लागावे यासाठी मुंबई, नागपूर या ठिकाणी होणाऱ्या आंदोलनात त्याचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न ते संघटनेचे मार्गदर्शक आमदार कपिल पाटील व राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, जिल्हाध्यक्ष राहुल पाटील यांच्या मार्फत ते सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल शिक्षक भारतीचे मार्गदर्शक आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, शिक्षक भारती संघटनेचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष राहुल पाटील, इकबाल शेख उमर, आशिष दातीर, राजेश जाधव, महेश नांद्रे, तुषार सोनवणे, सतिष मंगळे, गोरख पाटील, संजय पाटील, आदिंनी अभिनंदन केले आहे.