Month: April 2020

अत्यावश्यक कामे पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

नंदुरबार :  जिल्ह्यात पावसाळ्यापूर्वीची अत्यावश्यक कामे  तात्काळ पूर्ण करण्याचे निदे्रश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य व प्रमुख महामार्गाची कामे आणि दुरुस्ती करणे, जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगर परिषद, स्थानिक स्वराज्य संस्था यांचे कार्यक्षेत्रांतर्गत रस्ते, मलनि:स्सारणाची कामे, सांडपाणी व्यवस्थापन, ग्रामीण रस्ते तसेच पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत रस्त्यांच्या कामांचा यात समावेश आहे. या संदर्भात पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करण्याची कामेदेखील वेळेत करण्याचे आदेशीत करण्यात आले आहे.  महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प उभारणीचे काम आणि इतर विद्युत विषयक कामे व दुरुस्ती, बीएसएनएल आणि इतर दूरसंचार कंपन्यांकडील दूरसंचार आणि इंटरनेट सेवा संचालन, लाईन दुरुस्ती आदी कामे पूर्ण करावीत. त्याबाबत खाजगी संस्थांना कामे पूर्ण करण्याबाबत बीएसएनएलने लेखी आदेश द्यावेत. रेल्वे विभागाची पावसाळ्यापूर्वीची  रेल्वे मार्गावरील करावयाची अत्यावश्यक कामे, तसेच स्टेश्न परिसरातील कामे, तसेच विविध विभागांची  पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे आवश्यक असलेली कामे सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. बांधकामावरील मजूरांना बांधकामाचे ठिकाण सोडून इतरत्र फिरता येणार नाही, याची जबाबदारी साईट इंजिनिअर यांची असेल. राज्याच्या मुख्य सचिवांकडील 17 एप्रिल 2020 अन्वये अटी शर्तीच्या अधीन राहून ही कामे तात्काळ पूर्ण करावीत. संबंधित विभागाचे जिल्हास्तरीय प्रमुख अधिकाऱ्यांनी कर्मचारी व वाहने यांच्यासाठी त्यांच्यास्तरावरून आदेश काढावेत व त्याची एक प्रत पोलीस विभागाकडे द्यावी. कर्मचाऱ्यांना आदेशाची प्रत आणि ओळखपत्र जवळ बाळगण्याच्या सूचना देण्यात याव्यात , असे आदेशात नमूद करण्यात आले...

Read More

खाजगी दवाखाने बंद ठेवल्यास कारवाई

नंदुरबार :  आजारी नागरिकांच्या सोईसाठी जिल्ह्यातील सर्व मेडीकल दुकाने, सर्व रुग्णालये व क्लिनीक दैनंदिन वेळेनुसार सुरू ठेवण्यात यावेत. आपत्कालीन परिस्थितीत खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी दवाखाना बंद ठेवल्यास त्यांची नोंदणी रद्द करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी आपल्या दवाखान्यात रुग्णांची होणारी गर्दी टाळावी. दोन व्यक्तींमध्ये सहा फुटाचे अंतर ठेवावे. रुग्णांची दूरध्वनीद्वारे नोंदणी करावी. एका वेळेस एकच रुग्णास तपासणीसाठी बोलवावे. तपासणीस येणाऱ्या रुग्णाची तपासणी करताना शरीराचा कमीत कमी संपर्क येईल याबाबत दक्षता घ्यावी. रुग्णाची तपासणी करताना ग्लोव्हज व मास्क वापरावे. रुग्णाशी कमीत कमी संपर्क येण्याच्यादृष्टीने रक्तदाब तपासणीस शक्यतो डिजीटल रक्तदाब तपासणी यंत्र वापरावेत. रुग्णांना रुग्णालयात येण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून येण्याबात सूचना द्याव्यात. प्रत्येक रुग्णाच्या तपासणीनंतर हात स्वच्छ धुवून घ्यावे. कोरोना संशयित रुग्णास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय अथवा जिल्हा रुग्णालय येथे तपासणीसाठी पाठविण्याची दक्षता घ्यावी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वांनी प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करावा. आदेशाचा उल्लंघन करणारी व्यक्ती संस्था अथवा संघटना महाराष्ट्र (कोविड-19) उपाययोजना नियम 2020, भारतीय दंड संहितेमधील तरतूदीनुसार आणि भारतीय साथ रोग नियंत्रण कायदा 1897 नुसार दंडनीय तसे कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले...

Read More

जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

नंदुरबार : अक्कलकुवा येथील आणखी एक व्यक्तीचा स्वॅब अहवाल कोवडि-19 पॉझिटीव्ह आल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी अक्कलकुवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. डॉ.भारुड यांनी अंबाबारी चेकनाक्यालाही भेट दिली आणि अक्कलकुवा येथील प्रतिबंधीत क्षेत्राची पाहणी केली. त्यांनी नवोदय विद्यालय येथे क्वॉरंटाईन केंद्राचीदेखील पाहणी केली. त्यांच्यासमवेत अपर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे, उपविभागीय अधिकारी अविश्यांत पंडा, उपजिल्हाधिकारी महेश सुधळकर आणि तहसीलदार  विजय कच्छवे होते. डॉ.भारुड यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजना कठोरपणे राबविण्याच्या सुचना दिल्या. ते म्हणाले, जिल्ह्याच्या सीमेबाहेरील व्यक्तीला कोणत्याही प्रकारे प्रवेश देऊ नये. वैद्यकीय कारणासाठी जिल्ह्याच्या सीमेत येणाऱ्या व्यक्तीला क्वॉरंटाईन करण्यात यावे. प्रतिबंधात्मक क्षेत्रातील नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व सेवा घरपोच मिळतील याचे निट नियोजन करावे. प्रतिबंधीत क्षेत्रातील कोणतीही व्यक्ती बाहेर जाणार नाही व बाहेरील व्यक्ती आत येणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी. कोविड-19 बाधीत व्यक्तीची संपर्क साखळी त्वरीत शोधून त्याच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींना त्वरीत क्वॉरंटाईन करण्यात यावे व त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी. क्वॉरंटाईन केंद्रात आरोग्याच्यादृष्टीने आवश्यक दक्षता घेण्यात याव्यात. नागरिकांना जीवनावश्यक धान्य व जीवनावश्यक व्सतू मिळण्यात कोणताही त्रास होणार नाही आणि वैद्यकीय सुविधा तात्काळ मिळतील याकडे विशेष लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी...

Read More

व्हीएसटीएफ आणि प्लॅन इंडियातर्फे पीपीई किट्सची मदत

नंदुरबार : कोविड-19 प्रतिबंधक उपाययोजनांसाठी पोषण इंडिया कार्यक्रमांतर्गत व्हीएसटीएफ आणि प्लॅन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने पीपीई किट्स आणि इतर साहित्य जिल्हा प्रशासनाला उपलब्ध करून देण्यात आले. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी प्रातिनिधीक स्वरुपात हे साहित्य स्विकारले. यावेळी खासदार डॉ.हिना गावीत, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते. साहित्यात 250 पीपीई किट्स, 250 एन-95 मास्क, 3000 ट्रीपल लेयर मास्क, अल्कोहल हँड रब (500 मिली) 500, अल्कोहल हँड रब (100 मिली) 500,  1 लाख साबण, 5 थर्मल स्कॅनर आदींचा समावेश आहे. कोविड-19 प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या साहित्यामुळे सुरक्षेच्यादृष्टीने चांगली मदत होईल, असा विश्वास डॉ.भारुड यांनी यावेळी व्यक्त...

Read More

संपर्क साखळीतील व्यक्तींच्या वैद्यकीय तपाणीवर भर द्या-खासदार हिना गावीत

नंदुरबार : कोविड-19 चा संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करून जास्त जोखिमीच्या व्यक्तींचे स्वॅब चाचणीसाठी पाठविण्यात यावेत, असे प्रतिपादन खासदार डॉ.हिना गावीत यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस आमदार डॉ.विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदी उपस्थित होते. श्रीमती गावीत म्हणाल्या, राज्य सीमेवर नाकाबंदी अधिक कडक करण्यात यावी. बाहेरील जिल्ह्यातील नागरीक येणार नाही याची दक्षता घ्यावी. बाहेरच्या राज्यातून आलेल्या जिल्ह्यातील मजूरांना क्वॉरंटाईन करण्यात यावे. आरोग्य कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीची विशेष काळजी घेण्यात येऊन त्यांना आवश्यक सुरक्षा साधने देण्यात यावीत. बचत गटांना मास्क तयार करण्याचे काम देण्यात यावे. बँकेतने गर्दी टाळण्यासाठी टोकन पद्धती सुरू करावी,  असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.भारुड यांनी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. ते म्हणाले, जिल्ह्यात 5 व्हेंटीलेटर असून आणखी 10 व्हेंटीलेटर लवकरच उपलब्ध होतील. सॅनिटायझार आणि एन-95 मास्क पुरेशा प्रमाणात आहेत. कोविड-19 बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेऊन त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.  मनरेगाच्या माध्यमातून 282 ग्रामपंचायतींनी कामे सुरू केली असून 8 हजार मजूर कामावर आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांच्या रोजगारावर प्रभाव पडू नये यावर विशेष लक्ष देण्यात येत आहे. गतवर्षी पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट 40 टक्के पूर्ण झाले असताना यावर्षी विशेष मोहिमेच्या माध्यामातून ते 80 ते 90 टक्क्यापर्यंत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मोहिमेअंतर्गत्‍ एकही वेळेस कर्ज न घेतलेल्या पात्र शेतकऱ्यांना कर्ज मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. रस्त्यांच्या व रुग्णालय दुरुस्तीच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. सार्वजनिक...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!