Month: March 2020

नागरी व ग्रामिण भागातील संस्थामध्ये निर्जतुकीकरण नंदुरबार जिपचे मुकाअ श्री विनय गौडा यांच्या सूचना

नंदुरबार (प्रतिनिधी):- जिल्हयात कोरोना कोविड – 19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरी व ग्रामिण भागातील संस्था व इतर संस्थामध्ये निर्जतुकीकरण करण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा यांनी मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत. याअंतर्गत नागरी भागातील संस्था – ट्रव्हल्स बसेस, रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, खाजगी दवाखाने, सार्वजनिक उद्याने, सार्वजनिक बेचेस , तसेच ग्रामिण भागातील संस्था – ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, शासकीय दवाखाने, पोस्ट ऑफीस, सर्व शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक वाचनालये आदी कार्यालय, सार्वजनिक स्थळे व शासकीय वाहने एकत्रितरित्या निर्जतुकीकरण केले जात आहेत. या निर्जंतुकिकरण कार्यासाठी काही मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यात म्हटले आहे की, 1 % सोडीयम हायपो क्लोराईड सोल्युशनचा वापर करण्यात यावा. सदर सोल्युशन तयार करतांना 1 किलो ग्राम ब्लिचींग पावडर ( TCL ) ही 30 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे व त्याचा निर्जतुकीकरण करण्यासाठी वापर करावा. सद्यास्थितीत बाजारात 5 % सोडीयम हायपो क्लोराईड सोल्युशन उपलब्ध असल्याने व त्याचा वापर करावयाचा असल्यास 1 लिटर सोडीयम हायपो क्लोराईड सोल्युशन ( 5 % ) व 4 लिटर पाणी मिसळून त्याचे द्रावण निर्जतुकीकरण करण्याकरिता वापरावे. नॅपसॅक पंपमध्ये हे द्रावण भरुन कार्यालयातील व सार्वजनिक स्थळावरील छत, भित व तळ यावर फवारणी करण्यात यावी. फवारणी किमान 1.5 मीटर अंतरावरुन करण्यात यावी. फवारणी केल्यानंतर किमान 10 मिनीट सदर वस्तुचा वापर करण्यास टाळावा. याप्रमाणे कार्यालय व सार्वजनिक स्थळे दिवसातुन किमान 2 वेळेस (सकाळी 8.00 ते 9.00 वाजता व सायंकाळी 5.00 ते 6.00 वाजता) फवारणी करण्यात यावी. संपूर्ण गावातील घरांची व जनावरांच्या गोठयाची फवारणी करावयाची...

Read More

जीवनावश्यक वस्तू व सेवा घेण्यासाठी वेळा निश्चित

नंदुरबार (प्रतिनिधी) दि. 25 : ‘करोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीतदेखील अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून त्यासाठी प्रशासनाने वेळा निश्चित केल्या आहेत. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी संयुक्तपणे निर्गमित केले आहेत.केमीस्ट, मेडीकल दुकान, किरणा व भाजीपाला, पिठाची गिरणी, पेट्रोल पंप, डिझेल पंप, एलपीजी गॅस एजन्सी, इंटरनेट सुविधा पुरविणारे, पुरवठा साखळी गोडाऊन, गोदाम, वेअर हाऊस यावर कोणतेही निर्बंध नाहीत. बेकरी, रेस्टॉरंट व हॉटेल्स सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत, दूध विक्री केंद्र सकाळी 7 ते 9 आणि सायंकाळी 6 ते रात्री 8 या कालावधीत सुरू राहतील. अंडी, चिकन, मटन व मासे विक्रेते आठवड्यातून मंगळवार, बुधवार, शुक्रवार व रविवार असे चार दिवस प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनुसार विक्री करतील.पशु उपचाराची औषध व दुकाने सकाळी 9 ते दुपारी 2 आणि कृषी विषयक खते व खाद्यतेलाची दुकाने सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहतील. स्वस्त धान्य दुकाने नियमित वेळेनुसार सुरू राहतील. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर  कोणतेही निर्बंध नाहीत. अशा वाहनांवरील चालक व इतर कर्मचाऱ्यांनी वाहन सोडून इतरत्र फिरू नये व गर्दी करू नये.हातगाडीवरील फळ विक्रेते व भाजीपाला विक्रेते हे गरजेनुसार गावात फिरून फळ व भाजीपाला विक्री करू शकतील. तसेच एका वेळी एकाच व्यक्तीस माल देतील. अशावेळी नागरिकांची गर्दी होणार नाही याची दक्षता घेतली जावी. किराणा दुकानदारांनी शक्यतो व्हॉट्सॲपवर यादी घेऊन घरपोच सेवा देण्यास प्राधान्य द्यावे. ग्राहक गर्दी करून उभे राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. वर नमूद सर्व दुकानावरून साहित्य...

Read More

शिरिषकुमार मंडळातर्फे शहिदांना अभिवादन।

नंदुरबार (प्रतिनिधी):– भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या ८९ व्या स्मृतिदिनानिमित्त येथील बालवीर चौकात मोजक्या नागरिकांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले. तसेच कोरोनाबाबत घरातच सुरक्षित राहून “मीच माझा रक्षक” याबाबत अंमलबजावणी करण्याचे आवाहन करण्यात आले. याचबरोबर रविवारी छत्तीसगड येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या १७ भारतीय जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार सेवानिवृत्त शिक्षक जी. एस. गवळी यांच्या हस्ते हुतात्मा भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. या अभिवादन प्रसंगी शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे यांनी कोरोनाबाबत जनतेने काळजी घेऊन आवश्यक असल्यासच घराबाहेर पडावे. शक्यतोवर गर्दीपासून लांब राहून घरातच सुरक्षित राहून ” मीच माझा रक्षक ” याबाबत अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले . याप्रसंगी मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार सेवानिवृत्त शिक्षक जी. एस. गवळी, सदस्य संभाजी हिरणवाळे, अरविंद खेडकर, गोपाळ हिरणवाळे, आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी मास्क लावून प्रबोधन...

Read More

क्षयरोग दिनी पोलिसांना हातरुमाल वाटप

नंदुरबार (प्रतिनिधी) – जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधत आज जिल्हा क्षयरोग केंद्रातर्फे गावात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यासाठी रुमाल वाटप करण्यात आले आहे. 24 मार्च 1882 रोजी क्षयरोगाच्या बॅकटेरीयाचा शोध लागला होता त्यामुळे हा दिवस क्षयरोग दिन म्हणुन ओळखला जातो. कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या संचारबंदीमुळे आज सुरवातीला जिल्हा क्षयरोग केंद्रातर्फे क्षयरोगाचे संशोधक रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पित करण्यात आली. यानंतर विभागाने संचारबंदीमध्ये शहरात विविध भागात तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याना रुमाल वाटप केले. कोरोना व्हायरस प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने तोंडाला बांधण्याजोगा हा रुमाल असून, यावर खोकतांना आणि शिंकतांना हातरुमालाचा उपयोग करा आणि सुरक्षित आणि क्षयमुक्त रहा ! असा संदेश देण्यात आला आहे. शहरभरात जवळपास अशा पद्दतीने पाचशेहुन अधिक रुमांलाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार, जिल्हा कार्यक्रम समन्वयक शिरीष भोजगुडे व कर्मचारी उपस्थित...

Read More

कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात औषध फवारणी नंदुरबार जि प चे मुकाअ श्री विनय गौडा यांची माहिती

नंदुरबार (प्रतिनिधी):- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा परिषद प्रशासनाने ग्रामीण भागात उपाययोजना सुरु केली आहे. याअंतर्गत प्रत्येक गाव व पाड्यात जंतुनाशक फवारणी करणे, गावांमध्ये आलेल्या बाहेरील व्यक्तींची माहिती संकलित करणे व त्या व्यक्तीला होम क्वारंटाइन करणे, अशा उपाय योजनांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विनय गौडा यांनी दिली. सबंध मानवजातीवर भयावह संकट बनुन आलेल्या करोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभर विविध उपाय योजना केल्या जात असून, गेल्या तीन महिन्यांपासून करोना विषाणूने जगभर थैमान घातले आहे. भारतात गेल्या काही दिवसांपासून हा विषाणू फैलावत असून, या आजाराच्या दुष्परिणामांचे गांभीर्य लक्षात घेऊन शासन विविध उपाययोजना करत आहे. देशातील अनेक राज्य लॉकडाऊन करण्यात आले असून, महाराष्ट्रात तर जिल्हा बंदीही लागू करण्यात आली आहे. याअनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या असून, नंदुरबार जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व गावांतील पान ठेले, पान टपऱ्या व गुटखा तंबाखू विक्रीची दुकाने सील करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये सोडियम हायड्रोक्लोराईड औषधाची फवारणी सुरू केली आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी शासनाच्या सूचना जनतेपर्यंत पोचाव्यात यासाठी प्रत्येक गावात दवंडी दिली जात आहे. शहरालगतच्या ग्रामपंचायतींमध्ये शहरात सुरू असलेल्या उपाययोजनांचीच अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक तालुकास्तरावर सहाय्यक गटविकास अधिकारी तसेच ग्राम विस्तार अधिकारी यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी सोपविलेल्या गावांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच औषध फवारणी व स्वच्छता याविषयी कार्यवाही सुरू केलेली आहे. नंदुरबार जिल्ह्यात बाहेरून आलेल्या नागरिकांची माहिती संकलित करून, अश्यांना होम क्वारंटाईन करण्याच्या सूचना...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!