Month: January 2020

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी पालिकेकडून होणाऱ्या खर्चावर नगरसेवकांचा आक्षेप

नंदुरबार (जगदीश ठाकुर)- नगरपालिकेच्या विविध विकास कामांचे उदघाटन व भूमिपूजन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नंदुरबारात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी पालिकेकडून होणारा खर्च न करता मुख्यमंत्री हे शासनाच्या खर्चातून येतात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी पालिकेकडून होणारा खर्च करण्यात येऊ नये, असा आक्षेप भाजपच्या नगरसेवकांनी पालिकेच्या सभेत घेतला. सदरचा खर्च रकमेतून लोकांची घरपट्टी माफ करावी आणि विकास कामे करणाऱ्या ठेकेदारांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाचा खर्च करावा, अशी मागणी यावेळी नगरसेवकांनी केली. या सभेत मुख्यमंत्र्यांच्या खर्चाचा विषय चांगला घातला. नंदुरबार नगरपालिकेची विशेष सभा प्रभारी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष भारती अशोक राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेत दहा विषयांना मंजुरी देण्यात आली. असली तरी भाजपच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विकास कामांच्या कार्यक्रमावर होणाऱ्या खर्चाबाबत आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्री हे शासनाच्या पैशांनी कार्यक्रमासाठी येतात. त्यामुळे नंदुरबार पालिकेने कार्यक्रमासाठी खर्च न करता कामांचा ठेका घेणाऱ्या ठेकेदाराने तो करावा अगोदरच पालिकेकडे निधी नसून खर्च करण्याची पालिकेची परिस्थिती नाही. म्हणून सदर खर्च करण्याचे टाळून त्याऐवजी लोकांची ज्यादा घरपट्टी माफ करावी अशी मागणी करून भाजपच्या नगरसेवकांनी सूचनाही मांडल्या मांडत विषयांना मंजुरी दिली. तसेच सहा वर्षापासून एकाच कंपनीला पाइप लीकेज दुरुस्तीचा ठेका दिला जात असून सदर ठेकेदाराने एकही काम केलं नसल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी करून चौकशी करण्याची मागणी सत्ताधाऱ्यांचा विरोधी नगरसेवकांनी यावेळी केली. या सभेतील या सभेतील शहराच्या सुशोभीकरण अंतर्गत महिलांचे पूर्ण कृती पुतळे उभारण्यात येणार असल्याने भारताच्या माजी विदेश मंत्री स्वर्गीय सुषमा स्वराज, नंदुरबारच्या स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय कमलाताई मराठे यांचा पुतळा उभारण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पालिकेची सभा झाल्यानंतर नंदुरबार नगरपालिकेच्या वतीने...

Read More

परवानगी निवासाची आणि इमारतीचे बांधकाम कमर्शियल?

नंदुरबार येथील सर्व्हे नं.451 वरील अनधिकृत इमारत तोडण्याच्या पालिकेच्या आदेशाला तिलांजली नंदुरबार- (जगदिश ठाकूर) शहरातील नगरपालिकेच्या मागील परिसरात असलेल्या सर्व्हे नं.451 याठिकाणी व्यापारी गाळ्यासह इमारतींचे अनधिकृतपणे बांधकाम करण्यात येत आहे. या बांधकामासंदर्भात दाखल असलेल्या तक्रारीनुसार तत्कालीन मुख्याधिकार्‍यांनी सदरचे बांधकाम तोडण्याचे आदेश दिले होते. परंतू, असे असतांनाही पालिका मुख्याधिकार्‍यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून संबंधित मालकांनी व्यापारी गाळ्यांसह इमारतीचे बांधकाम सुरुच ठेवले असल्याचे दिसून येते. विद्यमान मुख्याधिकार्‍यांनी संबंधित मालकांना पालिकेत बोलवून इमारतीचे अनधिकृत सुरु असलेले बांधकाम थांबविण्याच्या सूचना दिल्या असल्यास तरी, नियमबाह्य असलेली अनधिकृत इमारत बांधकाम करणार्‍या मालकावर काय कार्यवाही होईल? याकडे लक्ष लागून आहे. नंदुरबार शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालय इमारत म्हणजे सध्याची नगरपालिका इमारतीच्या पाठीमागील भागात परदेशीपूरालगत सर्व्हे नं.451 या जागेवर इमारतींचे बांधकाम करण्यात येत आहे. या इमारतीच्या बांधकामासाठी नंदुरबार नगरपालिकेने निवास म्हणजे रेसीडेन्सीसाठी परवानगी दिली होती. परंतू, संबंधितांनी त्या परवानगीला तिलांजली देत त्या जागेवर व्यावसायिक म्हणजे कमर्शियल दृष्टीने इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. या इमारतीचे निवासाच्या नियमानुसार बांधकाम न करतांना व्यापारी गाळे काढून बांधकाम करण्यात येत आहे. यासंदर्भात पालिकेकडे सदर बांधकाम अनधिकृतपणे सुरु असल्याची यापूर्वीच तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे मध्यंतरी हे बांधकाम थांबविण्यात आले होते. प्राप्त तक्रारीनुसार तत्कालीन मुख्याधिकारी सर्व्हे नं.451 याठिकाणी निवासाऐवजी व्यवसायिकदृष्टीने बांधकाम होणारी इमारत तोडण्याचे आदेश जारी केले होते. परंतू, या आदेशाला काही कालावधी लोटताच पुन्हा सदर मालकांनी इमारतीचे बांधकाम व्यवसायिक दृष्टीने सुरु केले आहे. टोलेजंग उभारण्यात आलेली ही इमारत पालिकेने दिलेल्या परवानगी ऐवजी नियमबाह्य बांधण्यात येत आहे. निवास ऐवजी कर्मर्शियल...

Read More

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

error: Content is protected !!