नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :- धुळे-नंदुरबार स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या पोट निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी मद्य विक्री अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत.  मतदानानिमित्त 29 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपासून ते 1 डिसेंबर 2020 रोजी (मतदानाच्या दिवशी )  सायंकाळी 5 वाजेपर्यंत तसेच 3 डिसेंबर 2020 रोजी ( मतमोजणीच्या दिवशी ) सकाळी 6 वाजेपासून  ते  सायंकाळी 5 वाजेपर्यंत  किरकोळ मद्य विक्री करणाऱ्या एफएल-2, एफएल-3, सीएल-3,सीएल / एफएल/ टीओडी-3 आणि एफएल/ बीआर-2 अशा सर्व अनुज्ञप्त्या बंद ठेवाव्यात. आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.