नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नंदुरबार येथील सफाईगाराची 3 पदे कंत्राटी पद्धतीने 8 महिन्याकरिता भरावयाची आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थांनी 27 जानेवारी 2021 पर्यंत  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टोकर तलाव रोड, तळ मजला रुम नं.27, नंदुरबार (दूरध्वनी क्रमांक 02564-210026) येथे संपर्क साधावा, असे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त वि.रा.रिसे यांनी कळविले आहे.