नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सन 2020-2021 या वर्षांच्या खरीप हंगाम 2020 साठी कापूस, मका, भात, ज्वारी, बाजरी, भुईमुग, सोयाबीन, मुग, उडीद, व तूर या पिकांसाठी लागू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 प्रतिकूल हवामान घटकांपासून पिकांची रेनणी किंवा लावणी न झाल्यामुळे नुकसान, पीक पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग,वीज, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ,पावसाचे खंड किड व रोग तसेच नैसर्गीक कारणामुळे इत्यादीमुळे मोठ्या आर्थिक नुकसानीस शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे होणारे नुकसान भरुन निघावे यासाठी शासनाने प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2020 लागू केली आहे.

ही योजना कर्जदार व बिगर कर्जदार  शेतकऱ्यांना ऐच्छिक राहील. तर अधिसूचीत क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी खातेदांराचे अतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत अर्ज  करू शकतात. शेतकऱ्यांनी 31 जुलै 2020 पर्यत ऑनलाईन अर्ज करावयाचा आहे. अधिक माहितीसाठी व सर्व पिकांच्या हेक्टरी विमा हप्ता दरासाठी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तसेच तालुका कृषि अधिकारी,मंडळ कृषि अधिकारी, कृषि विभागातील क्षेत्रीय कर्मचारी किंवा रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमीटेड यांच्या प्रतिनिधीशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी निलेश भागेश्वर यांनी केले आहे.

महसुल मंडळ निहाय अधिसूचित केलेली गावे व पीक

पीक व तालुकानिहाय अधिसूचित मंडळे अशी नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार, कोरीट, खोंडामळी, रनाळा, धानोरा आष्टे,शनिमांडळ या मंडळासाठी ज्वारी,बाजरी,भुईमूग,सोयाबीन मूग उडीद,तुर,कापुस,मका तर भात पिकासाठी धानोरा व आष्टे यांना पीक विमा योजना लागू राहील.खोंडामळी येथील मंडळास सोयाबीन व रनाळा व शनिमांडळ येथील मंडळास उडीद पिकास‍ विमा योजना लागू राहणार नाही.

नवापूर तालुक्यातील नवापूर,नवागांव,चिंचपाडा,विसरवाडी,खांडबारा या मंडळासाठी बाजरी पीक वगळता वरील उर्वरीत सर्व पिकास विमा योजना लागू राहील.

शहादा तालुक्यातील सारंगखेडा, वडाळी, मंदाणा, असलोद, शहादा, मोहिदे, कलसाडी, प्रकाशा, ब्राम्हणपुरी,म्हसावद या मंडळापैकी फक्त मंदाणा,असलोद,ब्राम्हणपुरी व म्हसावद मंडळातील भात पिकांना विमा योजना लागू राहील. उर्वरीत पिकास विमा योजना लागू राहील.

तळोदा तालुक्यातील तळोदा,बोरद,सोमावल,प्रतापुर,मंडळातील तळोदा,बोरद,सोमावल व प्रतापुर या मंडळांना बाजरी व भुईमूग पिकासाठी तर सोमावल मंडळास उडीद या पिकास विमा योजना लागू राहणार नाही. तर उर्वरीत पिकास विमा योजना लागू राहील.

अक्राणी तालुक्यातील रोषमाळ,चुलवड,खुंटामोडी,तोरणमाळ या मंडळांना मुग व कापूस पिक वगळता सर्व पिकांना पिक विमा योजना लागू राहील.

अक्कलकुवा तालुक्यातील अक्कलकुवा,खापर,मोरंबा,डाब,मोलगी,वडफळी या मंडळांना बाजरी पिक वगळता भात, सोयाबीन,ज्वारी, तूर आणि कापूस,मका पिकास ही योजना लागू राहील. अक्कलकुवास भुईमूग, उडीद, मोरंबा, डाब, मोलगी, वडफळीस मुग तर डाब,मोलगी,वडफळी या मंडळास कापूस पिकास योजना लागू राहणार नाही.