नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : खरीप हंगाम 2020-2021 मध्ये राज्यात नाफेडच्यावतीने केंद्र शासनाने  निश्चित केलेल्या हमीभावाने मूग, उडीद  व सोयाबीन खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

मूग (एफ.ए.क्यु) साठी 7 हजार 196 रुपये, उडीद (एफ.ए.क्यु) साठी 6 हजार  प्रती क्विंटल दर असून 15 सप्टेंबर पासुन खालील केंन्द्रावर नोंदणी सुरु होणार आहे. मूग, उडीद पिकांची खरेदी 1 ऑक्टोबर पासून करण्यात येणार आहे.

 सोयाबीन (एफ.ए.क्यु) साठी 3 हजार 880 प्रती क्विंटल दर असून शेतकऱ्यांनी 1 ऑक्टोंबर पासून खालील केंन्द्रावर नोंदणी सुरू आहे. तर सोयाबीन पिकांची खरेदी 15 ऑक्टोंबर पासून करण्यात येईल. नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आधारकार्ड, चालू हंगामाचा पिकपेरा नोंद असलेला सातबारा उतारा व बँकचे पासबुक इत्यादी कागदपत्रांची झेरॉक्स प्रत सोबत आणावी.

नोंदणीसाठी  धुळे तालुका खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी लि.धुळे येथे स्वप्नील देवरे (8888088483), शिरपुर तालुका सहकारी खरेदी विक्री सोसायटी लि.शिरपुर जि.धुळे येथे दर्शन देशमुख (9422123929), शिंदखेडा ता.सहकारी खरेदी विक्री संघ लि.दोंडाईचा ता.शिंदखेडा जि.धुळे येथे भगवान पाटील (9284429877), शेतकरी सहकारी संघ लि.नंदुरबार येथे दिपक पांढरे (9130809012) आणि शहादा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि.शहादा जि.नंदुरबार येथे  सागर पाटील (7770074177) यांच्याशी  संपर्क साधावा, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी  नंदुरबार यांनी कळविले आहे.