नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : खरीप हंगाम 2020-2021 मध्ये राज्यात नाफेडच्यावतीने केंद्र शासनाने  निश्चित केलेल्या हमीभावाने मूग, उडीद या कडधान्याच्या खरेदीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरु करण्यात आली आहे.

नोंदणीसाठी  धुळे तालुका खरेदी विक्री आणि प्रक्रिया सोसायटी लि.धुळे येथे स्वप्नील देवरे (8888088483), शिरपुर तालुका सहकारी खरेदी विक्री सोसायटी लि.शिरपुर जि.धुळे येथे दर्शन देशमुख (9422123929), शिंदखेडा ता.सहकारी खरेदी विक्री संघ लि.दोंडाईचा ता.शिंदखेडा जि.धुळे येथे भगवान पाटील (9284429877), शेतकरी सहकारी संघ लि.नंदुरबार येथे दिपक पांढरे (9130809012) आणि शहादा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि.शहादा जि.नंदुरबार येथे  सागर पाटील (7770074177) यांच्याशी  संपर्क साधावा, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी  नंदुरबार यांनी कळविले आहे.