नंदुरबार; (प्रतिनिधी) :- येथील उपनगर पोलीस ठाणे परीसरात कोरोना लॉकडाऊन काळात विनाकारण फिरणान्या ४ इसमांना न्यायालयाने प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊनचे आदेश पारीत केले असतांना, या काळात दि . १४ / ०४ / २०२० रोजी संध्याकाळी ०७ . ०० वाजता नंदुरबार शहरातील उपनगर पोलीस ठाणे हद्यीतील मिशन हायस्कुल ते सिंधी कॉलनी दरम्यान सायंकाळी फिरणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत विनाकारण शहरात फिरणारे मनोज अशोक गायकवाड वय – ५३, सुधीर डेव्हीड साने, वय – ४४, राकेश शलमोन पंजाबी वय – ४०, भिवसन अशोक नाईक वय – ४० सर्व रा . बेथेल कॉलनी नंदुरबार ता . जि . नंदुरबार असे सर्व जण जाणीवपुर्वक मनाई प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करत नाकातोंडावर कोणतेही मास्क तोंड झाकणेसाठी न लावता विनाकारण रस्त्यावर फिरतांना मिळुन आले होते. म्हणुन त्याच्याविरुध्द उपनगर पोलीस ठाण्यात भा . द . वि . कलम २६८ , २६९ , २९० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता . त्यांना मा . श्रीमती एस . ए . विराणी, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी नंदुरबार यांचे कोर्टात हजर केल्याने प्रत्येकी रुपये २००० / – दंड तसेच दंड न भरल्यास ५ दिवस साध्या कारावासाची शिक्षा दिली आहे. नंदुरबार उपनगर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, पोलीस कर्मचारी आणि तपास अधिकारी सपोनि धनराज निळे यांचे पोलीस अधीक्षक श्री. महेंद्र पंडीत व अपर पोलीस अधीक्षक श्री. चंद्रकांत गवळी यांनी अभिनंदन केले आहे.