नंदुरबार तालुका विधायक समितीचे विधी महाविद्यालय नंदुरबार आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर कोळदा येथे दिनांक 6 ते 12 फेब्रुवारी दरम्यान संपन्न होत आहे. आज दिनांक 10 फेब्रुवारी रोजी कोळदे गावात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी पथनाट्याच्या माध्यमातून मोफत कायदा सहाय्यता अधिकार या विषयावर पथनाट्य सादर केले. तसेच कृषी विज्ञान केंद्र, कोळदा येथे विधी साक्षरता व जागरूकता प्रशिक्षण, जिल्हा परिषद, नंदुरबार पंचायत प्रशिक्षण केंद्र, खिरोदा तालुका रावेर, जिल्हा जळगाव यांच्या शिबिरात देखील पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. प्रशिक्षणार्थ्यांना मोफत विधी सहाय्यतेचे धडे या माध्यमातून मिळाले. विधी महाविद्यालयाच्या स्वयंसेवकांनी हवामान सूचक यंत्राची पाहणी केली. तसेच स्वयंसेवकांना कोळदा कृषी विज्ञान केंद्रातील रेडिओ विकास भारती स्टेशनला देखील भेट देऊन तेथील उपकरणे, साधने यांची माहिती जाणून घेतली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना एककाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. किरण मराठे व सहाय्यक प्रा. विजय हेमाडे तसेच स्वयंसेवक उपस्थित होते.