नंदुरबार (प्रतिनिधी) – दिनांक ८ मार्च २०२३ रोजी नंदुरबार तालुका विधायक समितीचे विधी महाविद्यालय, कायदेविषयक शिक्षण व संशोधन संस्था, नंदुरबार येथे “जागतिक महिला दिन” कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात नंदुरबार न्यायालयातील वकील मा. ॲड.शारदा पवार या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात महिला जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्यांचे कायद्याने दिलेले अधीकार या विषयी मार्गदर्शन केले. महीला सक्षमीकरण हे केवळ ज्या दिवशी महिला आपल्या अधिकारबद्दल जागृत होतील, आपल्या अधिकाराविषयी बोलतील, आपले स्वतःचे मत मांडतील त्या वेळेस होईल असे नमूद केले. नंदुरबार तालुका विधायक समितीचे वरिष्ठ महाविद्यालय समन्वयक मा. डॉ. एम. एस. रघुवंशी यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात जगात महिलांचे स्थान किती व कोणत्या ठिकाणी आहे याचा उहापोह केला. जागतिक महिला दिनाचे कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.आशा आर. तिवारी यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी जागतिक महिला दिन साजरा करण्यामागील उद्दिष्टे स्पष्ट केले व महीलांच्या अधिकाराची जनजागृती करण्यात यावी या विषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रा. से.यो. स्वयंसेविका मिनाक्षी दांडवेकर यांनी केले व आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. किरण मराठे यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयांच्या विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. आशा आर. तिवारी व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. किरण मराठे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.