नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत वयोवृद्ध व्यक्तींसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

सावली, सीएफआर, हेल्पेज इंडिया, फेस्कॉम व एएससीओपी या संस्थेमार्फत आणि  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या समन्वयातून ज्येष्ठत्वाची ओळख, ज्येष्ठ व्यक्तींना भेडसावणाऱ्या समस्या व उपाययोजना, ज्येष्ठ नागरिकांसाठी असणाऱ्या कायद्यांची ओळख, ज्येष्ठ नागरिकांसाठी योजनांची ओळख या विषयावर  प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

शिबिरात 30 व्यक्तिंना प्रशिक्षण देण्यात येणार असून या प्रशिक्षणाचा कालावधी 4 दिवस आहे. प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्यासाठी 9860964323 या क्रमांकावर संपर्क साधावा. प्रशिक्षणासाठी जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरीक व दिव्यांग व्यक्तिंनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण, नंदुरबार यांनी केले आहे.