*नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात पोलीस वर्धापन दिनानिमित्त शस्त्रांचे प्रदर्शन*

नंदुरबार/ प्रतिनिधी- (जगदीश ठाकुर)

पोलीस वर्धापन दिनानिमित्त नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात रेझिंग डे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना पोलीस शस्त्रांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या शस्त्र प्रदर्शनात शालेय विद्यार्थ्यांनी स्वतः पोलीस शस्त्रे हाताळली. या कार्यक्रमाला शहर पोलीस निरीक्षक सुनिल नंदवाळकर, राजपूत, पोना. जयेश गावित यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या शस्त्र प्रदर्शनात शहरातील विविध शाळा व महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.

नंदुरबार येथील शहर पोलीस ठाण्यात आयोजित शस्त्र प्रदर्शनात शस्त्रे हाताळून माहिती जाणून घेताना विद्यार्थी व विद्यार्थिनी.