नदुरबार :-  विश्व रुहानी मानव केंद्र नवानगर  (वासधरा) नंदुरबार तर्फे आज  जिल्हा रुग्णालयात कोरोना आजारापासुन बचाव व सुरक्षेसाठी पिपिइ किटचे १०० नग, सॅनिटायझर ५ लीटरच्या १० नग , N-95 मास्क 100 नग , थ्री लेअर मास्क 1000 नग, मेडिक्लोर सोडिअम हायपोक्लाराईड 5 लिटर 50 नग असे साहित्य  देण्यात आले . तसेच पोलीस विभागालादेखील अशाच पद्धतीने मदत करण्यात आली आहे.