नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य अनंत नायक  हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

श्री.नायक यांचा दौरा असा : शुक्रवार 11 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री 19.55 वाजता सुरत येथे आगमन व मोटारीने नंदुरबारकडे प्रयाण. रात्री 23 वाजता नंदुरबार येथे आगमन व  शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम. शनिवार 12 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 11 वाजता अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे आयोजित 56 व्या परिषदेच्या उद्घाटन समारंभास उपस्थिती. (स्थळ छत्रपती शिवाजी महाराज नाटय मंदिर,नंदुरबार ) दुपारी 13.30 वाजता राखीव व भोजन. दुपारी 15.30 वाजता मौजे तलावीपाडा ता.नवापूर व मौजे खांडबारा ता.नवापूर येथे भेट. सायंकाळी 17 वाजता नंदुरबार शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम. रविवार 13 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 8 वाजता नंदुरबार येथून जव्हारकडे प्रयाण.