शिरपूर (वृत्तसंस्था) :- महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवर धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील पळासनेर फाटा येथे हजारो युपी बिहारी मजुर दोन दिवसापासून अडकून पडले आहेत. आपल्याला आपल्या घरी जाण्याची परवानगी मिळावी, यासाठी या मजुरांनी आज मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे या मार्गावरील आधीच तुरळक स्वरूपात सुरू अस्लरली अत्यावश्यक सेवेची वाहतूक बराच वेळ खोळंबली.


लॉक डाऊन थ्री नंतर महाराष्ट्रातील शेकडो परप्रांतीय मजूर आपापल्या गावी जाण्यासाठी धडपडत आहेत. वाहनांची सोया नसल्याने हे मजूर पायीच आपल्या गावासाठी रवाना झाले होते. यांच्यासोबत दोन – दोन, तीन – तीन वर्षाची बालके तसेच ऐंशी वर्षाचे वृद्ध सुद्धा आहेत. मात्र एमपी पोलिसांतर्फे यांना दोन दिवसांपासून पळासनेर फाटा येथे राज्य सीमेवर रोखण्यात आले असून, पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांची स्क्रीनिंग करून पुढील प्रवासासाठी पाठवण्याची सोय करण्यात येणार आहे. मात्र दोन दिवसांनंतरही कुठलीही व्यवस्था न झाल्याने या मजुरांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले. आंदोलनादरम्यान या मजुरांनी एमपी सरकारद्वारे आपल्याला आपल्या स्वगृही परत जाण्याची परवानगी मिळनेसाठी विनंती केली. शासकीय काम हे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याची खंतदेखील या मजुरांनी व्यक्त केली.

स्थानिक आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल कार्यकर्त्यांनी त्यांची जेवणाची व पाण्याची व्यवस्था केली. मात्र, वाढता मजुरांचा आकडा पाहता ती मदत तोकडी पडली. प्रशासनाच्या पुढील आदेशावर या मजुरांचे भविष्य अवलंबून असून, लवकरात लवकर यांना स्वगृही परत जाण्याची परवानगी मिळावी, म्हणून या मजुरांनी मध्यप्रदेश शासनाकडे मागणी केली आहे.

राज्य सीमेवर मजुरांचे रास्ता रोको शिरपूर (वृत्तसंस्था) :- महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवर धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील पळासनेर फाटा येथे हजारो युपी बिहारी मजुर दोन दिवसापासून अडकून पडले आहेत. आपल्याला आपल्या घरी जाण्याची परवानगी मिळावी, यासाठी या मजुरांनी आज मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे या मार्गावरील आधीच तुरळक स्वरूपात सुरू अस्लरली अत्यावश्यक सेवेची वाहतूक बराच वेळ खोळंबली.लॉक डाऊन थ्री नंतर महाराष्ट्रातील शेकडो परप्रांतीय मजूर आपापल्या गावी जाण्यासाठी धडपडत आहेत. वाहनांची सोया नसल्याने हे मजूर पायीच आपल्या गावासाठी रवाना झाले होते. यांच्यासोबत दोन – दोन, तीन – तीन वर्षाची बालके तसेच ऐंशी वर्षाचे वृद्ध सुद्धा आहेत. मात्र एमपी पोलिसांतर्फे यांना दोन दिवसांपासून पळासनेर फाटा येथे राज्य सीमेवर रोखण्यात आले असून, पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्यांची स्क्रीनिंग करून पुढील प्रवासासाठी पाठवण्याची सोय करण्यात येणार आहे. मात्र दोन दिवसांनंतरही कुठलीही व्यवस्था न झाल्याने या मजुरांनी रस्ता रोको आंदोलन सुरू केले. आंदोलनादरम्यान या मजुरांनी एमपी सरकारद्वारे आपल्याला आपल्या स्वगृही परत जाण्याची परवानगी मिळनेसाठी विनंती केली. शासकीय काम हे अत्यंत संथ गतीने सुरू असल्याची खंतदेखील या मजुरांनी व्यक्त केली.स्थानिक आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल कार्यकर्त्यांनी त्यांची जेवणाची व पाण्याची व्यवस्था केली. मात्र, वाढता मजुरांचा आकडा पाहता ती मदत तोकडी पडली. प्रशासनाच्या पुढील आदेशावर या मजुरांचे भविष्य अवलंबून असून, लवकरात लवकर यांना स्वगृही परत जाण्याची परवानगी मिळावी, म्हणून या मजुरांनी मध्यप्रदेश शासनाकडे मागणी केली आहे.

Posted by NsevenNews Ndb on Sunday, May 3, 2020