नंदुरबार (प्रतिनिधी) – राज्यस्तरीय इंग्रजी विषय परिसंवादात नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी सहभाग नोंदवून नंदुरबार जिल्ह्याची मान उंचावली आहे नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील पाच शिक्षकांनी या परिसंवादात सहभाग नोंदवला.
राज्य आंग्लभाषा संस्था, औरंगाबाद व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे द्वारे आयोजित राज्यस्तरीय इंग्रजी सिम्पोसियम ( परिसंवाद) 2023 साठी नंदुरबार जिल्ह्यातून श्री. नितीन महाजन (जि. प.शाळा दलेरपुर,तळोदा) यांनी Best practices in English, mooc and tag coordinators activities in taloda याचे सादरीकरण केले. श्री प्रवीण लवटे (जि. प. शाळा कालीबेल, तळोदा) यांनी best practices in english, what’s app blackboard याचे सादरीकरण केले. श्री प्रवीण गंडे (जि.प.शाळा लोणखेडा, शहादा) यांनी new trends in english याचे सादरीकरण केले. श्रीमती सीमा पाटील (जि. प.शाळा मोड, ता. तळोदा ) यांनी NAS, FLN मध्ये इंग्रजी विषयाचे महत्त्व याचे सादरीकरण केले. श्रीमती सुनिता पाटील (जि. प.शाळा भोणे, नंदुरबार) यांनी new trends in english teaching, learning and evaluation याचे सादरीकरण केले. श्रीमती सपना हिरे (जि. प.शाळा अंबापुर , नंदुरबार) यांनी best practices in english, aims and objectives used in class work याचे सादरीकरण केले.
तसेच इंग्रजी विभाग प्रमुख, डाएट नंदुरबार येथील अधिव्याख्याता श्रीमती डॉ. वनमाला पवार यांनी importance of Tag meetings and it’s impact on tag members and student याचे सादरीकरण केले.
हे सिम्पोसियम मंगळवेढा, जिल्हा सोलापूर या ठिकाणी दि. 20 जानेवारी 2023 रोजी संपन्न झाले असून , वरील शिक्षकांनी उपस्थित राहून इंग्रजी विभागाचे नंदुरबार जिल्ह्यातील TAG, MOOC व Spoken English इत्यादी उपक्रमाचे यशस्वीपणे व उत्तम सादरीकरण केले.
त्याबद्दल प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था नंदुरबार, जिल्हा परिषद (शिक्षण विभाग), नंदुरबार व इंग्रजी विभाग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, नंदुरबार यांच्या वतीने सर्व सहभागी शिक्षक, संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, गटशिक्षणाधिकारी यांचे अभिनंदन करण्यात आले.