नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पुर्व परीक्षा-2020  नंदुरबार येथे 11 एप्रिल 2021  रोजी रोजी सकाळी 8.30 ते दुपारी 12 या वेळेत नंदुरबार शहरातील 9 उपकेंद्रांवर घेण्यात येणार असल्याने परीक्षा केंद्राच्या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये,  शांतता व सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) नुसार परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रवेशास बंदीचे आदेशीत केले आहे.

शहरातील श्रीमती एच.जी.श्रॉफ हायस्कूल आणि ज्यु.कॉलेज मोठा मारुती मंदिराजवळ नंदुरबार, जी.टी.पाटील महाविद्यालय नंदुरबार, दुर्गाबाई रघुवंशी हायस्कुल मुख्य डाक कार्यालय जवळ शनि मंदिर रोड नंदुरबार, कमला नेहरु कन्या विद्यालय नेहरु चौक स्टेशन रोड नंदुरबार, डॉ.काणे गर्ल्स हायस्कूल मुख्य डाक कार्यालय जवळ अंधारे स्टॉप, नंदुरबार, एकलव्य विद्यालय व ज.ग.नटावदकर महाविद्यालय नंदुरबार,एस.ए.मिशन मराठी  शाळा नंदुरबार, एस.ए.मिशन इंग्रजी शाळा तळोदा रोड नंदुरबार, पी.के.पाटील विद्यालय व महाविद्यालय  नवापूर रोड नंदुरबार अशा 9 उपकेंद्रावर परीक्षा घेण्यात येणार आहे

सदर परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात 11 एप्रिल 2021  रोजी सकाळी 8 वाजेपासून ते दुपारी 1 वाजेपर्यंत कोणीही प्रवेश करू नये. सदरचे आदेश परिक्षार्थी, नियुक्त कर्मचारी, अधिकारी, पोलीस, होमगार्ड यांचेसाठी लागू होणार नाही. तसेच परीक्षा केंद्राच्या जवळच्या 200 मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलीफोन, एस.टी.डी, आय.एस.डी, फॅक्स केंद्र, झेरॉक्स दुकाने, कॉम्प्युटर दुकाने व ध्वनीक्षेपक परीक्षेच्या कालावधीसाठी बंद ठेवण्यात यावेत, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.