नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) : राज्याचे सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ, मराठी भाषा राज्यमंत्री  डॉ.विश्वजीत पतंगराव कदम हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

मंगळवार 6 ऑक्टोंबर 2020 सकाळी 9.30 वाजता शिरपुर येथून नंदुरबारकडे प्रयाण. 11.30 वाजता काँग्रेस कमिटी कार्यालय, नंदुरबार येथे आगमन व राखीव. 11.55 वाजता वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबारकडे रवाना. दुपारी 12.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे आगमन व आढावा बैठकीस उपस्थिती.

दुपारी 1.00 वाजता पत्रकार परिषद स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार. दुपारी 1.15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथुन शासकीय विश्रामगृह नंदुरबारकडे रवाना.

दुपारी 1.30 वाजता शासकीय विश्रामगृह नंदुरबार येथे आगमन व राखीव. दुपारी 2.00 वाजता शासकीय विश्रामगृह नंदुरबार येथून धुळ्याकडे प्रयाण.