नंदुरबार (प्रतिनिधी):- येथील आंबेडकर चौक परिसरातील मूळनिवासी व सध्या भिवंडी येथे कार्यरत असलेले श्री राजेंद्र शिंदे यांच्या मातोश्री गं.भा. सोजाबाई शेनपडू शिंदे (८२) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले.
त्यांच्या पश्चात श्री. राजेंद्र शिंदे, उपमुख्याध्यापक पद्मश्री अण्णासाहेब जाधव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भिवंडी, जिल्हा ठाणे व श्री संजय शिंदे, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर ही दोन मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शिंदे परिवाराप्रती आमच्या सहवेदना.