नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  रब्बी  हंगाम 2021-22 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या हमीभावाने मका,ज्वारी,बाजरी आदी भरडधान्य खरेदीकरिता शेतकऱ्यांची NeML पोर्टलवर 13 एप्रिल ते 30 एप्रिल 2022  या कालावधीत नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येत असून शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी एम. एस. सोनवणे यांनी केले आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पुढील ठिकाणी ऑनलाईन नोंदणी करता येईल. शेतकरी सहकारी संघ लि.नंदुरबार.  नोंदणीचे  ठिकाण संघ कार्यालय, नंदुरबार (कृष्णा पाटील 97632 86860), शहादा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लि.शहादा ‍जि.नंदुरबार नोंदणीचे  ठिकाण संघ कार्यालय, शहादा (सागर पटेल 7770074177 ) नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी  खरीप हंगाम 2021-2022 मधील ऑनलाईन पीकपेरा नमूद असलेला सातबारा उताऱ्यांची  मूळ प्रत, आधार कार्ड, बॅक खाते बुक, मोबाईल क्रमांक इत्यादीची माहितीची नोंदणी वरील ठिकाणी नोंदवावी. संयुक्त खात्यातील क्र.2 नंबर खातेदाराने नोंदणी करीता खातेचा तपशिल दिल्यास पीएफएमएस पोर्टलवरुन पेमेंट पडणार नाही यांची शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. शासनाचे खरेदी आदेश मिळाल्यावर शेतकऱ्यांना नोंदणी केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएसएसद्वारे शेतमाल घेवून येण्याचा दिनांक कळविण्यात येईल. प्रत्येक शेतकऱ्यांकडून फक्त त्यांच्या कुटूंबातीलच (आई, वडील, मुलगा,मुलगी, पत्नी,पती)  सातबारा उतारा ओळख पटविल्यानंतर स्विकारण्यात येईल. असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.