नंदुरबार – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपला जीव धोक्यात घालून जनसेवा करणाऱ्या यंत्रणेसाठी येथील माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या परिवारातर्फे पीपीई किटचे वाटप करण्यात आले.
शहरातील डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, नंदुरबार नगरपरिषदेचे अधिकारी, सफाई कामगार हे अत्यंत युध्द पातळीवर कोविङ – 19 या महाभयंकर रोगाशी आपला जिव धोक्यात टाकुण जिल्हयाच्या व शहराच्या जनतेला वाचविण्याच्या प्रयत्न करत आहेत. त्यांच्याही सरंक्षणाची व सर्वतोपरी सहकार्याची भूमिका जनतेने व सर्व लोकप्रतिनीधींनीसुध्दा घेतलीच पाहिजे. किंबहूना ते आपले कर्तव्यच आहे. नंदुरबार जिल्हा रुग्णालय हेसुध्दा कोविड – 19 या आजारावर यशस्वीपणे काम करत आहे आणि तेथील डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी यांचे कोविड – 19 आजारापासुन सरंक्षण होण्यास मदत व्हावी म्हणून माजी आमंदार चंद्रकांत रघुवंशी, नंदुरबारच्या नगराध्यक्षा सौ. रत्ना रघुवंशी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राम रघुवंशी, नंदुरबार नगरपरिषदेचे नगरसेवक किरण रघुवंशी, यशवर्धन रघुवंशी व रघुवंशी परिवाराच्या वतीने जिल्हा रुग्णालयाला चांगल्या प्रतीचे धुवुन परत वापरता येतील ( वॉशेबल ) असे 50 PPE किट आज 1 में महाराष्ट्र दिनी भेट देण्यात आले. तसेच धुळे येथिल भाऊसाहेब हिरे वैद्यकिय महाविद्यालय येथे सुध्दा 50 PPE किट देण्यात आले. नंदुरबार नगरपरिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी 25 PPE किट रघुवंशी परिवाराच्या वतीने देण्यात आले .