नंदुरबार (जगदीश ठाकुर)-
नगरपालिकेच्या विविध विकास कामांचे उदघाटन व भूमिपूजन करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नंदुरबारात येणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी पालिकेकडून होणारा खर्च न करता मुख्यमंत्री हे शासनाच्या खर्चातून येतात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी पालिकेकडून होणारा खर्च करण्यात येऊ नये, असा आक्षेप भाजपच्या नगरसेवकांनी पालिकेच्या सभेत घेतला. सदरचा खर्च रकमेतून लोकांची घरपट्टी माफ करावी आणि विकास कामे करणाऱ्या ठेकेदारांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाचा खर्च करावा, अशी मागणी यावेळी नगरसेवकांनी केली. या सभेत मुख्यमंत्र्यांच्या खर्चाचा विषय चांगला घातला. नंदुरबार नगरपालिकेची विशेष सभा प्रभारी नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष भारती अशोक राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या सभेत दहा विषयांना मंजुरी देण्यात आली. असली तरी भाजपच्या नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या विकास कामांच्या कार्यक्रमावर होणाऱ्या खर्चाबाबत आक्षेप घेतला आहे. मुख्यमंत्री हे शासनाच्या पैशांनी कार्यक्रमासाठी येतात. त्यामुळे नंदुरबार पालिकेने कार्यक्रमासाठी खर्च न करता कामांचा ठेका घेणाऱ्या ठेकेदाराने तो करावा अगोदरच पालिकेकडे निधी नसून खर्च करण्याची पालिकेची परिस्थिती नाही. म्हणून सदर खर्च करण्याचे टाळून त्याऐवजी लोकांची ज्यादा घरपट्टी माफ करावी अशी मागणी करून भाजपच्या नगरसेवकांनी सूचनाही मांडल्या मांडत विषयांना मंजुरी दिली. तसेच सहा वर्षापासून एकाच कंपनीला पाइप लीकेज दुरुस्तीचा ठेका दिला जात असून सदर ठेकेदाराने एकही काम केलं नसल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी करून चौकशी करण्याची मागणी सत्ताधाऱ्यांचा विरोधी नगरसेवकांनी यावेळी केली. या सभेतील या सभेतील शहराच्या सुशोभीकरण अंतर्गत महिलांचे पूर्ण कृती पुतळे उभारण्यात येणार असल्याने भारताच्या माजी विदेश मंत्री स्वर्गीय सुषमा स्वराज, नंदुरबारच्या स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय कमलाताई मराठे यांचा पुतळा उभारण्याची मागणी यावेळी करण्यात आली. पालिकेची सभा झाल्यानंतर नंदुरबार नगरपालिकेच्या वतीने अपंगांना तीनचाकी सायकलींचे वाटप करण्यात आलं. याप्रसंगी याप्रसंगी पालिकेच्या परिसरात प्रभारी नगराध्यक्षा तथा उपनगराध्यक्षउपनगराध्यक्षा भारती राजपूत अशोक राजपूत, नगरसेवक परवेज खान, किरण रघुवंशी, रवींद्र पवार, दीपक दिघे, मोहितसिंग राजपूत, कैलास पाटील, कमल ठाकूर, दिलीप बडगुजर मुख्याधिकारी आदी उपस्थित होते