*नंदुरबार- (जगदीश ठाकुर)*
नंदुरबार जिल्हा परिषद व सहा  पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज दिनांक 7 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया होत आहे. सकाळपासूनच थंडीचा जोर असल्यामुळे मतदान केंद्रांवर सकाळच्या सुमारास मतदारांची अल्प गर्दी दिसुन आली. सकाळी साडेसात वाजेपासून सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेदरम्यान सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत नंदुरबार जिल्ह्यात केवळ 9.28 टक्के मतदान झाले आहे. यात नंदुरबार जिल्ह्यात अक्राणी तालुक्यात सर्वात कमी मतदान सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत झाल्याची नोंद आहे. याठिकाणी केवळ 7.7 टक्के इतके मतदान झाले आहे. दुसऱ्या स्थानावर शहादा तालुक्यात 8.4 टक्के मतदान, तिसऱ्या स्थानी नंदुरबार तालुक्यात 8.5 टक्के तर चौथ्या स्थानी तळोदा तालुक्यात 9.33 टक्के, अक्कलकुवा तालुक्यात 10.39 टक्के आणि सर्वाधिक मतदान नवापूर तालुक्यात 12.40 टक्के इतके सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत झाले आहे.