नंदुरबार : जिल्ह्यातील कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता वाढलेल्या रुग्ण संख्येमुळे रेमडीसीवर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे, त्या पार्श्वभूमीवर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पाठपुरावा करून शहर व ग्रामीण भागातील रुग्णांना रेमडीसीवर इंजेक्शन उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली व त्याचा पाठपुरावा केला. त्याची दखल घेत

1000 रेमडीसीवर इंजेक्शन नंदुरबार शहरातल्या सर्व शासन मान्य हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेल्या व आरटी-पीसीआर (RT-PCR) कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट असलेल्या व ऑक्सिजनवर असलेल्या गरजू रुग्णांना मा.आ.चंद्रकांत रघुवंशी व रोटरी वेलनेस रिटेल यांच्या वतीने फक्त ५५० रु. उपलब्ध करून दिलेले आहेत

अत्यल्प दरांमध्ये रुग्णांना रोटरी सेंटरच्या माध्यमातून इंजेक्शन पुरविण्यात येतील सदर मागणीचे पत्र जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारूड जिल्हा शल्य चिकित्सक डॉ आर डी भोये यांना देण्यात आले यावेळी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, ॲड. रामभैय्या रघुवंशी, विनय भाई श्रॉफ, सुनील चौधरी उपस्थित होते त्यासंदर्भात त्यांनी तात्काळ इंजेक्शनचा पुरवठा केला व रोटरी सेंटरला 1000 इंजेक्शन सुपूर्त केले.