नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) :  सरदार सरोवर प्रकल्पांतर्गत उपजिल्हाधिकारी, सरदार सरोवर सरदार सरोवर प्रकल्प, तळोदा या कार्यालयासाठी इनोव्हा या प्रकारातील प्रत्येकी 1 डिझेल वाहन वाहनचालकासह व विना इंधन मासिक भाडेतत्वावर लावण्यासाठी सीलबंद लिफाफ्यात दरपत्रक मागविण्यात आले होते. परंतू यासाठी एकही दरपत्रक प्राप्त न झाल्यामुळे द्वितीय अंतिम मुदतवाढ  देण्यात येत असून दरपत्रक धारकांनी  18 एप्रिल 2022 पर्यंत उपजिल्हाधिकारी, सरदार सरोवर प्रकल्प यांचे कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, नंदुरबार येथे डिझेल वाहन लावण्यासाठी दरपत्रक सादर करावे.अटी व शर्ती जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. असे जिल्हा पुनर्वसन अधिकारी नितीन सदगीर यांनी  एका प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.