नवी दिल्ली (वृत्तसेवा) : लॉकडाऊमध्ये महिला जनधन खातेधारकांसाठी महत्वाची बातमी आली आहे. देशातीन महिला जनधन खातेधारकांच्या खात्यात ५०० रुपयांचा दुसरा टप्पा सोमवारपासून मिळण्यास सुरुवात होईल.
कोरोनाच्या संकटात गरीबांच्या मदतीसाठी २६ मार्चपासून महिला जनधन खातेधारकांना दरमहा ५०० रुपये मदतीची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी केली होती.
प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत महिला खातेधारकांना बॅंक खात्यात मे पर्यंतचा पहिला टप्पा दिला गेल्याचे अर्थ मंत्रालयाचे सचिव देवाशीष पांडा यांनी सांगितले. लाभार्थ्यांनी हे पैसे काढण्यासाठीचे नियम जारी करण्यात आले आहेत. जनधन खातेधारक आपल्या बॅंकेची शाखा किंवा ग्राहक सेवा केंद्रात जाऊन पैसे काढू शकतात. हे पैसे एटीएममधून देखील काढता येऊ शकतात.
बॅंकेमध्ये गर्दी होऊ नये यासाठी ही रक्कम पाच दिवसांच्या टप्प्यांमध्ये मिळणार आहे.
ज्या महिलांच्या जनधन खात्याचा शेवटचा अंक शून्य किंवा एक आहे त्यांच्या खात्यात ४ मेला पैसे जमा होतील. ज्यांच्या अकाऊंटचा शेवटचा अंक दोन आणि तीन आहे त्यांना ५ मेला पैसे मिळतील. ६ मेला अकाऊंटचा शेवटचा नंबर चार आणि पाच तर सहा आणि सात शेवटचा अंक असलेल्यांना ८ मेला पैसे मिळतील. ज्यांच्या खात्याचा शेवटचा नंबर आठ आणि नऊ आहे त्यांना ११ मेला पैसे मिळतील.
कोणत्याही आपत्कालिन स्थितीत महिलांना हे पैसे काढता येणार आहेत. ११ मेनंतर आपल्या सोयीनुसार कधीही पैसे काढता येऊ शकतील. नंतरही तुम्ही ती रक्कम काढू शकता असी माहिती देण्यात आली आहे