नंदुरबार(जिमाका वृत्तसेवा) : राज्य महिला आयोगाच्या सदस्या श्रीमती दीपिका चव्हाण व श्रीमती. उत्कर्षा रुपवते या नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम खालील प्रमाणे आहे.

मंगळवार 26 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय,नंदुरबार येथे आढावा बैठक. (बैठकीत महिलाविषयक प्रकरणाचा आढावा, महिलांच्या सुरक्षितेबाबत सद्यस्थिती, आयसीसी कमिटी, दक्षता समिती, निर्भया पथक, महिला सेल, कंट्रोल रुम, वात्सल्य समिती, महिला व मुलींसाठी शासकीय वसतिगृह, आश्रमशाळा, उपजिल्हा रुग्णालय, समुपदेशन केंद्र व विविध योजनांची माहिती घेणार आहेत. ) दुपारी 12 ते 12.30 वाजता जिल्हा पोलीस अधिक्षक, नंदुरबार येथे महिला सुरक्षा विभाग भरोसा सेलला भेट. दुपारी 12.30 ते 1.00 वाजता जिल्हा सामान्य रुग्णालय,नंदुरबार येथे महिला सामान्य (जनरल वार्ड )ला भेट. दुपारी 1 ते 2 वाजेदरम्यान राखीव. दुपारी 2 ते 2.30 वाजता मुलींचे वसतिगृह, नंदुरबार व आश्रमशाळा कोठली ता.जि.नंदुरबार येथे भेट.

दुपारी 3 वाजता शहादाकडे प्रयाण, दुपारी 3.30 ते 4 वाजेदरम्यान तहसिल कार्यालय,शहादा येथे आढावा बैठक. दुपारी 4.30 ते 5 वाजता मुलींचे आश्रमशाळा, चिरखाण,सुलतानपूर,ता.शहादा येथे भेट. सायंकाळी 5.15 ते 5.30 वाजता नगरपालिका शहादा येथे भेट. सायंकाळी 5.30 ते 6 वाजता शहादा शहर पोलीस स्टेशनला भेट. सायंकाळी 6 वाजता नंदुरबारकडे प्रयाण.

बुधवार 27 जुलै 2022 रोजी  सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय,तळोदा येथे आढावा बैठक.दुपारी 12 ते 12.30 वाजता तळोदा उपजिल्हा रुग्णालयास भेट. दुपारी 12.30 ते 1 वाजता तळोदा पोलीस स्टेशनला भेट. दुपारी 1 ते 1.30 वाजता तळोदा नगरपालिकेला भेट. दुपारी 1.30 ते 2 वाजता राखीव, दुपारी 2 ते 2.30 वाजता आश्रमशाळा लोभाणी ता.तळोदा येथे भेट.

दुपारी 3 वाजता अक्कलकुवा कडे प्रयाण. दुपारी 3.30 ते 4 वाजता तहसिल कार्यालय,अक्कलकुवा येथे आढावा बैठक. दुपारी 4.30 ते 5.00 वाजता अक्कलकुवा पोलीस स्टेशनला भेट. सायंकाळी 5.15 ते 5.30 वाजता अक्कलकुवा नगरपालिकेला भेट. सायंकाळी 5.30 ते 6 वाजता मुलींचे आश्रमशाळा,कुंभारखान ता.अक्कलकुवा येथे भेट. सांयकाळी 6 वाजता नंदुरबारकडे प्रयाण.