नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा)  : कृषी विभागाने महा-डीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या सदराखाली शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टिने एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केली असून अर्ज करण्यासाठी 11 जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

 महाडीबीटी पोर्टलवर अद्याप अर्ज सादर न केलेल्या शेतकऱ्यांनी कृषिविषयक योजनाचा लाभ मिळवण्यासाठी आपले अर्ज 11 जानेवारी 2021 पर्यंत https://mahadbtmahait.gov.in/ या संकेतस्थळावर सादर करावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनंत पोटे यांनी केले आहे.